top of page
logo.png

प्लेटलेट्स कमी होणे

  • Writer: Abhishek Patil
    Abhishek Patil
  • May 31, 2024
  • 1 min read

Updated: Apr 25

मनुष्य शरीरात हाडांचे आतील पोकळीत असणा-या मज्जामध्ये (बोन मॅरो) प्लेटलेट्स तयार होतात आणि याचे प्रमुख कार्य म्हणजे रक्ताला गोठविणे. साधारणतः दिड लाख ते साडे चार लाख प्र्ति मायक्रो लिटर रक्तात त्या असतात. प्लेटलेट्स कमी होण्याच्या कारणांमध्ये प्रामुख्याने —

१. मज्जा – बोनमॅरो द्वारेच त्याचे उत्पादन कमी होणे.

२. अप्लॅस्टिक अ‍ॅनेमीया या आजारात प्लेटलेट्सचे उत्पादन थांबते.

३. कॅन्सर या आजारात बोनमॅरो वर आघात होऊन प्लेटलेट्स मृत होतात.

४. केमोथेरपी मुळे प्लेटलेट्स मृत होतात.

५. अनेक विषाणूजसे रुबेला, डेंग्यु इ. मुळे प्लेटलेट्स निर्मीती कमी होते आणि शरीर प्रतिकार क्षमतेद्वारे जेव्हा ह्या विषाणुंवर विजय मिळविला जातो तेव्हा त्या प्लेटलेट्स पुन्हा वाढतात.

 ६. काही अ‍ॅन्टिबायिटिक्स, मदय, काही औषधी ह्या प्लेटलेट्स चे उत्पादन कमी करतात.

७. काही संधीवाताच्या प्रकारात शरीर प्रतिकारक्षमताच चुकुन प्लेटलेट्स वर हल्ला करुन त्यांना नष्ट करते.

शरीरात पांथरी नावाचा एक अवयव असतो, त्यात प्लेटलेट्स थोडया प्रमाणात साठवल्या जातात परंतु काही कारणांनी पांथरीला सूज आल्यास भरपुर प्रमाणात प्लेटलेट्स साठविल्या जातात आणि रक्तातील त्याचे प्रमाण कमी होते.

प्लेटलेट्स कमी झाल्याची लक्षणे —

प्लेटलेट्सचे प्रमुख कार्य म्हणजे रक्त गोठवणे. प्लेटलेट्स कमी झाल्यास –

दात घासतांना थोडे देखील लागल्यास जखम होऊन रक्तस्त्राव होतो व लवकर बंद होत नाही.

शरीरावर कोठेही थोडा मुका मार लागला, दाबले तर त्वचेखाली रक्तस्त्राव झाल्याचे दिसते.

लघवी किंवा मलावाटेने रक्तस्त्राव होत असतांना बस्ती (एनिमा) किंवा रेचक औषधी घेऊ नये.

त्वचे खाली छोटे छोटे रक्ताचे डाग दिसू शकतात अशा वेळी सैल कपडे घालावेत.

शरीरात कोठेही रक्तस्त्राव होऊ शकतो जसे नाक, कान, मूत्र मार्ग, स्त्रीयांमध्ये योनी मार्ग इ.

ज्या स्त्रीयांची प्रसूतीची वेळ जवळ आली आहे अशा स्त्रीयांना प्लेटलेट्स कमी झाल्याचे अनेकदा आढळते आणि प्रसूती नंतर ते प्रमाण प्राकृत होते. याचे कारण अदयाप समजू शकले नाही परंतु या काळात प्लेटलेट्स बनविण्याचे प्रमाणात घट होते हे कळाले आहे.

Comments


bottom of page