top of page
logo.png

Prevent Cancer Through a Positive Lifestyle

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • 7 days ago
  • 4 min read

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा

नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे

cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - -

काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता. परंतु

आजच्या काळात तो तेवढा घातक नसला तरी

त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.

हा आजार झाल्या नंतर आपण बरे जरी झालोत तरी पुढील आयुष्यात पूर्ण निरोगी आरोग्याची खात्री देऊ शकत नाही. म्हणून

जीवनशैलीत बदल करून त्याला होऊ न देणे आपल्या हातात आहे.

मग नेमक आपण काय करायला हवं ?

१. व्यसनां पासून दूर राहणे – कोणत्याही प्रकारच्या व्यसनांना बळी पडू नये आणि व्यसनं असतील तर त्यांना तत्काळ सोडून द्यावे.

यात प्रामुख्याने मद्यपान, तंबाखू, धुम्रपान यांचा समावेश होतो.

मद्यपानामुळे मुख, अन्ननलिका, 

यकृत, स्तन, स्वरयंत्र इ. अवयवांवर

कर्करोगाचा प्रभाव पडू शकतो.

अगदी मध्यम प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना देखील

कर्करोगाचा धोका असतो असे संशोधनाने सिद्ध झाले आहे.

तंबाखू चघळणे किंवा धुराद्वारे शरीरात प्रवेशित झाल्याने

मुखाचा, स्वादुपिंडाचा, फुफ्फुसांचा इ. कर्करोग होत असतात.

परोक्ष धुम्रपान म्हणजे दुसऱ्याद्वारे ओढलेल्या धुम्रपानामुळे देखील

अनेक प्रकारचे कर्करोग होत असतात म्हणून

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास विरोध करावा.

२. व्यायाम - नियमित व्यायाम करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं

नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होत नाही

अतिरिक्त चरबी शरीरात असल्यास

स्त्रियांमध्ये स्तनाचा आणि सर्वांमध्ये 

कोलान    फुफ्फुस    स्वादुपिंड    मूत्रपिंड यांचा कर्करोग होण्याचा

धोका अधिक प्रमाणात असतो

आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहावे म्हणून

दररोज थोडा वेळ साधारणतः 20 ते 40 मिनिट पायी चालणं 

उत्तम असतं त्याचप्रमाणे योगासन हा देखील

अत्यंत उपयुक्त असणारा व्यायाम आहे

शक्यतो स्वच्छ मोकळ्या हवेमध्ये केले जाणारे व्यायाम हे

आपल्या शरीरासोबत मनाचे आरोग्य देखील वाढविते.

३. आयुर्वेदीय आहार संकल्पनाचे अवलंबन करावे -  

आयुर्वेदानुसार भूक लागल्यावर जेवण करणे

अवेळी जेवण करू नये तसेच

पोट एक चतुर्थांश रिकाम ठेवून आहार घेणे इत्यादी

आयुर्वेदाच्या नियमांना पाळल्यास निश्चितच आपण कर्करोगापासून दूर राहू शकतो कर्करोगावरील संशोधनात असे आढळले आहे की

प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात सेवन केल्याने

कर्करोगाचा धोका वाढतो तसेच जे व्यक्ती लठ्ठ आहेत

त्यांच्यात देखील कर्करोग होण्याची संभावना अधिक असते.

लाल मांस

प्लास्टिकच्या पात्रातील अनेक प्रकारचे द्रव किंवा घन पदार्थ

यांचा वापर देखील मर्यादित स्वरूपातच असावी

आहारात शक्यतो शाकाहार आणि सेंद्रिय पद्धतीच्या

भाज्यांचा आणि अन्नधान्याचा वापर असल्यास उत्तम

शक्यतो प्रिझर्वेटिव्ह टाकलेले

कृत्रिम रंग

कृत्रिम चव असणारे पदार्थ टाळावेत

हे विविध प्रकारचे कर्करोग रोखण्यासाठीचे उत्तम उपाय आहेत 

४. त्वचेचा कर्करोग हा देखील एक महत्त्वपूर्ण प्रकार

आपल्या देशात आढळतो हा कर्करोग होऊ नये म्हणून

अति सूर्यकिरण / / /  प्रखर उन असताना बाहेर जाणे टाळावे आणि

बाहेर जाणे टाळणे शक्य नसल्यास

सुती कपडा म्हणजे कॉटनचे वस्त्र घालून

सनस्क्रीन लावून

पूर्ण डोक्याला कानाला आणि चेहऱ्याला

कॉटनच्या कपड्यांद्वारे आच्छादन करून बाहेर निघावे म्हणजे

सूर्यकिरणांद्वारे जो घातक परिणाम होणार आहे त्याची तीव्रता

कमी होईल आणि आपण त्वचेच्या कर्करोगापासून दूर राहू शकतो 

अशा प्रकारे आपण आपली जीवनशैली अवलंबिली तर

निश्चितच कर्करोगापासून आपण दूर राहू शकतो 

 

 

Prevent Cancer Through a Positive Lifestyle

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at how cancer can be prevented - - -

A few years ago, cancer was considered a life-threatening disease. However,

although it is not as dangerous today,

its incidence appears to be increasing day by day.

Even if we recover after developing this disease, we cannot guarantee completely healthy health in our later life. Therefore,

it is in our hands to prevent it from occurring by making changes in our lifestyle.

So what exactly should we do ?

1. Stay away from addictions – One should not fall prey to any kind of addiction, and if there are addictions, they should be quit immediately.

This mainly includes alcohol consumption, tobacco, and smoking.

Alcohol consumption can affect organs such as the mouth, esophagus,

liver, breast, larynx, etc.

Research has proven that even people who consume alcohol in moderate amounts

are at risk of cancer.

Chewing tobacco or its entry into the body through smoke

can cause cancer of the mouth, pancreas, lungs, etc.

Passive smoking, that is, due to smoke inhaled by someone else, can also cause

many types of cancer, therefore

one should oppose smoking in public places.

2. Exercise - Regular exercise is extremely beneficial for physical and mental health

Regular exercise prevents excess fat from accumulating in the body

If there is excess fat in the body

women have a higher risk of breast cancer and everyone has a higher risk of

colon    lung    pancreas    kidney cancer

The risk is higher

To keep our physical and mental health excellent

it is best to walk for a short time every day, approximately 20 to 40 minutes

Similarly, yoga is also

an extremely beneficial form of exercise

Exercise done in clean, open air, if possible,

improves mental health along with the health of our body.

3. One should adopt Ayurvedic dietary concepts -  

According to Ayurveda, eat when you feel hungry

one should not eat at odd times, as well as

eating while keeping one quarter of the stomach empty, etc.

If we follow the rules of Ayurveda, we can certainly stay away from cancer. Research on cancer has found that

consuming processed meat in large quantities

increases the risk of cancer, and people who are obese

also have a higher likelihood of developing cancer.

Red meat

many types of liquids or solid substances in plastic containers

should also be used only in limited quantities

It is best to include vegetarian food and organically grown

vegetables and grains in the diet whenever possible

Preferably, foods containing preservatives

artificial colors

and artificial flavors should be avoided

These are excellent measures for preventing various types of cancer 

4. Skin cancer is also an important type

found in our country. To prevent this cancer

avoid going outside during excessive sunlight / / /  intense heat and

if it is not possible to avoid going outside

wear cotton clothing

apply sunscreen

and cover the entire head, ears, and face

with cotton cloth before going outside, so that

the intensity of the harmful effect caused by sunlight

will decrease and we can stay away from skin cancer 

In this way, if we adopt our lifestyle

we can certainly stay away from cancer 

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 
Strong Wind and Joint Pain

वाहता तीव्र वारा आणि सांधे दुखी नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण वाहता तीव्र वारा आणि सांधेदुखी सांध्यांचे विकार यांचा काय संबंध आहे ? या विषयी बघणार आहोत शरीरामध्ये वात पित्त आणि कफ हे तीन

 
 
 

Comments


bottom of page