Why Do I Sneeze Every Morning Causes Allergies and Prevention Tips
- Satish Shindadkar
- Aug 2
- 5 min read
सकाळी उठल्यावर भरपूर शिंका येताय ???
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ज्या व्यक्तींना सकाळी उठल्यावर भरपूर शिंका येतात त्याबद्दल बघणार आहोत - - - -
अनेक व्यक्तींना फक्त हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये - - - सर्दी - - कफ - - - खोकला - - शिंका यांचा त्रास होत असतो - - - काहींना वर्षभर सर्दीचा त्रास असतो - - - सतत शिंका येत असतात - - - आणि जर रोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर शिंका येत असतील - - - तर थोडी काळजी करण्यासारखे आहे
नेहमी शिंका येणे - - - तसेच सकाळी झोपेतून उठून उठल्यानंतर लगेच शिंका येणे - - - किंवा सातत्याने सर्दी असणं - - - एलर्जी असणे याकडे दुर्लक्ष करणं हे - - - पुढे मोठ्या आजाराला निमंत्रण असू शकते
साधारणतः वारंवार शिंका येण्याचे कारण हे - - - - - रोगप्रतिकारक क्षमता कमी असणे असे मानले जाते - - - वास्तविकत: नाकामध्ये जी एक पातळ शैष्मिक त्वचा असते - - - त्या त्वचेवर असणाऱ्या पेशी आणि उती ह्या - - - अतिशय संवेदनशील असतात - - - ज्या वेळेला त्यांच्यासोबत धुलीकण - - - पराग कण - - - उत्तेजित गंध किंवा एखाद्या वस्तूचा संपर्क येतो तेव्हा - - - शिंका येणं सुरू होतं - - - याशिवाय कधीकधी शिंक येण्याचा कारण हे धूळ - - - बुरशी - - - तीव्र प्रकाश - - - तीव्र वास - - - मसालेदार पदार्थ - - - सामान्य सर्दी - - - एखाद्या गोष्टीची एलर्जी इत्यादी देखील असू शकतं
प्रामुख्याने घरातील धूळ - - - पाळीव प्राण्यांचे केस आणि - - - फंगल किंवा बॅक्टेरियल गोष्टींमुळे सुद्धा शिंका येत असतात
काही व्यक्तींना अंथरुणातील - - उषा - - चादरी यामुळे सुद्धा एलर्जी होत असते आणि शिंका येत असतात - - - - रात्रभर एसी म्हणजे एअर कंडिशन मुळे संपूर्ण रूम मधील हवा - - - कोरडी म्हणजे ड्राय झालेली असते - - - आणि या कोरड्या हवेमुळे - - - नाकातील त्वचा देखील कोरडी होते आणि शिंका येऊ शकतात
फोटिक स्नीज रिफ्लेक्स - - - ही अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये श्वसन संस्थेला उत्तेजना मिळते आणि शिंका येतात - - - - या मध्ये सूर्याशी संपर्क आल्यानंतर ही समस्या निर्माण होत असते
एलर्जी येणारे शिंकांचे प्रकारात प्रामुख्याने - - - पराग कण - - - एखाद्या औषधाची ऍलर्जी - - - थंडीची एलर्जी - - प्रदूषण - - - पेट्रोल डिझेलचा धूर हे प्रामुख्याने येतात
अशा प्रकारे ज्या व्यक्तींना सकाळी उठल्यानंतर भरपूर शंका येत असतील - - - - त्यांनी सर्वप्रथम आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावा आहार - - - आणि विहार उत्तम असेल तर रोगप्रतिकारशक्ती निश्चितच वाढते - - - - ज्या व्यक्तींना नेहमी सर्दी असते त्यांनी - - - वैद्यकीय सल्ल्याने औषधी घ्याव्यात - - - - नियमित थोडे गरम पाणी प्यावे - - - - नाकाला आतून गाईचं तूप किंवा खोबरेल तेल लावावे - - - म्हणजे नाकाच्या आतील श्लेष्मल त्वचा स्निग्ध करून घ्यावी तसेच अणुतेल - - - पंचेंद्रिय वर्धन तेल यांचे नस्य करावे - - - - आलं - - लवंग - - - दालचिनी तुळस - - - मिरे - - - पुदिना - - - - हिंग यांचा वापर आहारामध्ये करत रहावा - - - - - तसेच मध हे सुद्धा एलर्जी कमी करण्यासाठी - - - कफदोष कमी करण्यासाठी उत्तम असते
अन्य पथ्याचे - संदर्भात विचार केल्यास - - - - थंड हवेत जाणे टाळावे तसेच आपल्याला ज्या गोष्टींची एलर्जी येत असेल - - - अशा वातावरणापासून आपण दूर राहावे - - - - थंडीत जात असताना - - - कान नाक यांच्यावर आवरण असावे - - - - रात्री झोपताना अधिक प्रमाणात पाणी तसेच दूध पिणे - - - किंवा कुठलेही द्रव पदार्थ - - - - झोपण्याच्या दीड तास अगोदर पर्यंत घेऊ नयेत - - - - उन्हाळ्याच्या दिवसात किंवा खूप तहान लागलेली असल्यास - - - झोपताना पाणी प्यायचे झाल्यास घोटभरच पाणी प्यावे - - - - - - - सायंकाळचे जेवण सूर्यास्ताच्या अगोदर करावे
शरीरात कफदोष किंवा वात दोष वाढलेला असल्यास - - - - - - वैद्यकीय सल्ल्याने त्याला नियंत्रणामध्ये आणावे - - - यासाठी अभ्यंग - - - स्वेदन म्हणजे संपूर्ण शरीराची मसाज आणि स्टीम बाथ तसेच नस्य उपयुक्त ठरतात
अशा प्रकारे सतत येणाऱ्या शिंकांना आटोक्यात आणून आपण पुढील संभाव्य मोठ्या आजाराची भीती दूर करू शकतो
Why Do I Sneeze Every Morning Causes Allergies and Prevention Tips
Waking up with a burst of sneezing can feel annoying, especially when it happens every day. Morning sneezing is common, and it often points to irritation inside the nose rather than a serious illness.
This article is for general information only and does not replace medical advice.
Why morning sneezing happens
The nose is more sensitive after hours of sleep. During the night, allergens and irritants can collect around the bed, and dry air can make nasal tissues feel scratchy.
Common causes include:
Dust mites - These tiny allergens live in mattresses, pillows, curtains, and soft furnishings.
Pet dander - Fur, skin flakes, and saliva from pets can trigger sneezing, even if the pet does not sleep on the bed.
Seasonal changes - Pollen levels, humidity shifts, and cooler mornings can irritate the nose.
Dry air - Air conditioning, fans, and dry weather can dry out the nasal lining.
Strong smells - Room fresheners, incense, perfumes, and cleaning products may trigger sneezing in sensitive people.
How immunity and nasal sensitivity play a role
A weakened immune system may make the body react more strongly to common irritants. Lack of sleep, stress, poor diet, and frequent infections can all affect how well the body handles allergens.
Some people also have naturally sensitive nasal tissues. In such cases, even mild dust or a sudden temperature change can lead to repeated sneezing after waking.
Simple ways to prevent morning sneezing
Small changes in daily habits can help reduce symptoms.
Wash bedsheets and pillow covers weekly in hot water.
Keep windows closed during high-pollen mornings.
Vacuum floors, curtains, and mattresses regularly.
Keep pets out of the bedroom if dander is a trigger.
Drink enough water through the day to keep nasal passages moist.
Use a humidifier if indoor air feels too dry.
Eat a balanced diet with fruits, vegetables, nuts, seeds, and protein-rich foods to support immunity.
Avoid smoking and strong fragrances indoors, as they can worsen nasal irritation.
When to see a doctor
Speak to a doctor if sneezing continues for weeks, affects sleep, or comes with wheezing, facial pain, fever, thick nasal discharge, or breathing trouble. Persistent symptoms may need allergy testing or treatment.
FAQ
Is sneezing every morning a sign of allergy?
Often, yes. Dust mites, pollen, mould, and pet dander are common allergy triggers in the morning.
Can dry air cause sneezing after waking up?
Yes. Dry air can irritate the nasal lining, especially in air-conditioned rooms or during dry weather.
Does drinking water help reduce sneezing?
Hydration can help keep nasal tissues moist, which may reduce irritation.
Should I take allergy medicine daily?
Do not start daily medicine without medical advice. A doctor can suggest the right option based on your symptoms.
Morning sneezing is usually manageable. Start by reducing allergens around your bed, improving hydration, and watching for patterns. If it keeps coming back, get medical guidance rather than ignoring it.

Comments