Why do digestive disorders occur
पचनाचे विकार का होतात
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
पचनाचे त्रास का होतात आणि ते होऊ नये म्हणून
काय करावे ? तसेच आपण आपला आहार विहार कसा ठेवावा
जेणे करून आपल्याला पचनाचेच काय तर
इतर कोणतेही त्रास होणार नाहीत या विषयी बघणार आहोत
साधारणता नैसर्गिक नियम असा आहे की ज्या वेळेला
भूक लागेल त्यावेळेला आपण आहार घेतला पाहिजे
भूक लागणे ही संवेदना आहे
संवेदना आपल्या शरीराच्या नैसर्गिक गरजेसाठी उत्पन्न होत असतात
परंतु नेमकं आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने म्हणा किंवा
अन्य काही कारणाने
आपण वेळी - - - अवेळी आहार घेत असतो म्हणजेच
भूक नसताना किंवा वेळ झाली म्हणून आपण आहार घेत असतो तर
कित्येक व्यक्ती आवडता आहार असल्यास भूक लागलेली नसताना किंवा
जेवणावर जेवण देखील करत असतात
आहाराचे नियम ठरलेले आहे त्यानुसार आहार न घेतल्यास
निश्चितच पचनाचे विकार होतात
आहाराच्या नियमांमध्ये प्रामुख्याने भूक लागल्याची संवेदना
झाल्यानंतर आहार घेणे हे प्रमुख आहे
आपण रोज योग्य वेळेला म्हणजेच वेळ ठरवून
आहार घ्यायची सुरुवात केली तर निश्चितच दोन वेळेला
योग्य प्रकारे भूक लागल्याची संवेदना प्राप्त होईल
साधारणतः जे व्यक्ती सकाळी सहा वाजता उठतात
अशांनी अंदाजे सकाळी ९ ते १० च्या दरम्यान आहार
आणि सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान आहार घेणं आवश्यक असतं
आणि ह्याच वेळेला नैसर्गिक भूक लागू शकते
जर हीच सवय केली तर नैसर्गिक भूक लागणं
सहज शक्य आहे
आयुर्वेदाने सांगितल्यानुसार नैसर्गिक भूक लागतात
आपण दोन घास खायला हवेत
म्हणजेच रात्री उशिराने जरी भूक लागली तरी आपण
रात्रीची वेळ लक्षात घेता
अगदी हलका आहार घ्यायला हरकत नसते
त्यामध्ये आपण पाचक फळांचा समावेश करू शकतो
ज्वारीच्या लाह्या घेऊ शकतो
साळीच्या लाह्या
राजगिऱ्याच्या लाह्या आणि राजगिऱ्याचे लाडू इत्यादी
हलका आहार घेऊ शकतो
यानंतरचा मुद्दा आहे आहार सेवन करत असतांना
सर्व चवींचा आहारामध्ये समावेश असावा
साधारणतः गोड आंबट खारट तिखट तुरट आणि कडू अशा सहा चवी असतात आयुर्वेदात ने सांगितल्यानुसार साधारणतः मधुर रसाचा म्हणजे
गोड पदार्थांचा आहाराच्या सुरुवातीला समावेश असावा आणि
सगळ्यात शेवटी तुरट चवीचा समावेश असावा म्हणजेच बडीशोप
धना डाळ
नागवेलीचे पान ज्यामध्ये तुरट चवीचा काथा आणि चुना असतो
यांचं सेवन करायला सांगितलेला आहे
आहाराच्या सुरुवातीला गोड पदार्थांची सेवन आवश्यक असते परंतु
आपण गोड पदार्थांचे सेवन आहाराच्या शेवटी करतो
आणि असे गोड पदार्थ आहाराच्या शेवटी सेवन केले असता ते
निश्चितच पचन बिघडवण्याचे काम करतात
आहारामध्ये पाण्याच्या नियमांच्या बद्दल देखील महत्त्वपूर्ण आहे
अनेक व्यक्ती पाणी आहाराच्या शेवटी सेवन करत असतात हे
देखील चुकीचा आहे
आयुर्वेदाने सांगितलेला आहे की आहारामध्ये एक एक घोट
थोड्या थोड्या वेळाने
पाणी प्यायला हवं आणि आहाराच्या शेवटी
दोन ते तीन घोट पाणी प्यायला हवं जर आहाराचे शेवटी
अधिक प्रमाणात पाणी पिलं तर पचनाचे विकार आणि
ढेरी पुढे येऊ शकते
आहाराच्या मध्ये एक एक घोट पाणी पिल्यास आपली प्रकृती
आपले आरोग्य निश्चितच चांगले राहते
अन्य कारणांमध्ये एकाच प्रकारचा सातत्याने आहार घेणे
आहारामध्ये सलाडचा वापर अधिक प्रमाणात करणे
कडधान्यांचा वापर अधिक प्रमाणात करणे
राग
क्रोध
चिंता
मानसिक अस्वस्थ असणे हे देखील प्रमुख आहे
नैसर्गिक संवेदनांमध्ये पोट साफ होण्याची संवेदना निर्माण झाली असता न जाणे
मूत्र प्रवृत्ती म्हणजे लघवीची संवेदना उत्पन्न झाली असताना
देखील लघवीला न जाणे हे देखील यात प्रमुख आहे
पचन बिघडण्याच्या प्रमुख लक्षणांमध्ये
भूक न लागणे
अन्नावर वाचना नसणे म्हणजे अन्न सेवन करण्याची इच्छा न होणे
भूक लागते परंतु अन्न सेवन करण्याची इच्छा होत नाही
वारंवार ढेकर येणे
गॅसेस होणे
पोट साफ न होणे
आळस किंवा सुस्ती वाटणे आणि प्रामुख्याने
खूप रुग्ण आम्हाला सांगत असतात की
मला कसतरी होतं आहे तर
कसं तरी होतंय हे देखील पचन बिघडण्याचं प्रमुख कारण आहे
अनेक व्यक्तींना पोट भरल्यासारखं वाटणे
पोटामध्ये आवाज होणं
पोटात गॅसेस असल्यासारखी संवेदना देखील होत असते
सकाळी झोपेतून उठूच नये असं वाटणं
उत्साहा नसणे
कोणतेही काम करण्याची इच्छा नसणे
अंग दाबून घ्यावेसे वाटणे
हे देखील पचन योग्य रीतीने झालेले नाही याचंच लक्षण आहे
अशी लक्षणे निर्माण होऊच नये म्हणून
योग्य वेळेला आहार घेणं
आहारात गोड पदार्थ अगोदर आणि त्यानंतर इतर अन्नपदार्थांचे सेवन करणे
सर्व प्रकारच्या भाज्यांचा आहारामध्ये समावेश असावा
शक्यतो आहारामध्ये ज्वारी बाजरी दादर
नाचणी तांदूळ यांची भाकर आणि फळबाजी यांचा समावेश असावा
आहारामध्ये योग्य वेळी पाण्याचा वापर करावा
पाण्याऐवजी ताज्या ताकाचा वापर केला तर उत्तम
घरगुती उपचारांमध्ये प्रामुख्याने पाचक असणारा लिंबू + पाणी घेतल्यास
अनेक पचनाच्या समस्या दूर होऊ शकतात
यामध्ये साधारणता मध्यम आकाराचा एक लिंबूचा रस आणि
त्यामध्ये सैंधव मीठ किंवा काळ मीठ ज्याला आपण पादेलोन म्हणतो ते जर टाकलं तर ते पचनासाठी अत्यंत उपयुक्त असते
तसेच पादेमिठ
जिरे
पिंपळी
यांचा देखील वापर पाचक चूर्ण मध्ये केला जाऊ शकतो परंतु
याचा वापर वैद्यकीय सल्ला घेऊनच करावा
अशा प्रकारे जर आपण योग्य पद्धतीने आहार ठेवला तर
मला कसतरी होतंय ह्या लक्षणांसोबत अन्य
पचन बिघडण्याची लक्षणे निर्माण होणारच नाही आणि
पुढील गंभीर आजारांना आपण कधीही सामोरे जाणार नाहीत
Why do digestive disorders occur
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at
why digestive problems occur and what should be done to prevent them? Also, how should we maintain our diet and lifestyle
so that we do not suffer not only from digestive problems but also from
any other problems? We are going to discuss this.
Generally, the natural rule is that whenever
we feel hungry, we should eat.
Feeling hungry is a sensation.
Sensations arise for the natural needs of our body.
However, for various reasons, whether due to our profession or
some other reason,
we eat at irregular times, meaning
we eat when we are not hungry or simply because it is time to eat.
Many people, if it is their favorite food, eat even when they are not hungry or
even eat one meal on top of another.
There are established rules for eating, and if we do not eat according to them,
digestive disorders certainly occur.
Among the dietary rules, the most important is
to eat after experiencing the sensation of hunger.
If we start eating every day at the proper time, that is, at a fixed time,
then certainly, twice a day,
we will naturally experience the sensation of proper hunger.
Generally, people who wake up at six o'clock in the morning
should eat approximately between 9 and 10 in the morning
and between 6 and 7 in the evening.
Natural hunger can arise at these times.
If this habit is followed, experiencing natural hunger
becomes quite easy.
According to Ayurveda, when natural hunger occurs,
we should eat a couple of bites.
That is, even if we feel hungry late at night,
considering the time of night,
there is no harm in having a very light meal.
We can include digestive fruits,
jowar puffed grains,
rice puffed grains,
rajgira puffed grains and rajgira ladoos, etc.
We can have a light meal.
The next point is that while consuming food,
all tastes should be included in the diet.
Generally, there are six tastes: sweet, sour, salty, spicy, astringent, and bitter. According to Ayurveda, generally, madhura rasa, that is,
sweet foods, should be included at the beginning of the meal, and
the astringent taste should be included at the very end. That is, fennel,
coriander dal,
and betel leaf, which contains astringent catechu and slaked lime,
are recommended for consumption.
It is necessary to consume sweet foods at the beginning of the meal, but
we consume sweet foods at the end of the meal.
And when such sweet foods are consumed at the end of the meal, they
certainly contribute to disturbing digestion.
The rules regarding water in the diet are also important.
Many people drink water at the end of the meal, which
is also incorrect.
Ayurveda says that during the meal, one sip at a time,
at short intervals,
water should be drunk, and at the end of the meal,
two to three sips of water should be taken. If at the end of the meal
a large amount of water is consumed, digestive disorders and
a protruding belly may occur.
If one sip of water is taken during the meal, our constitution
and our health certainly remain good.
Among other causes, continuously eating the same type of food,
using too much salad in the diet,
consuming too many legumes,
anger,
rage,
anxiety,
and being mentally restless are also major factors.
When the natural sensation of needing to empty the bowels arises, not going,
and when the urge to urinate arises,
still not going to urinate, are also major factors in this.
The major symptoms of impaired digestion include
loss of appetite,
not having a desire for food, meaning not wanting to consume food,
feeling hungry but not wanting to eat,
frequent belching,
having gas,
not having a proper bowel movement,
feeling lazy or sluggish, and especially,
many patients tell us
that they feel somehow unwell,
and this feeling of “something is wrong” is also a major symptom of impaired digestion.
Many people feel as though their stomach is full,
hear sounds in the abdomen,
and also experience a sensation as if there is gas in the stomach.
Not wanting to get out of bed in the morning,
having no enthusiasm,
not wanting to do any work,
wanting to have one's body massaged,
are also signs that digestion has not occurred properly.
To ensure that such symptoms do not arise at all,
eat at the proper time,
consume sweet foods first in the meal and then consume other foods,
include all types of vegetables in the diet,
and preferably include jowar, bajra, dadar,
ragi, rice bhakri, and fruits and vegetables in the diet.
Water should be consumed at the proper time during the meal.
It is even better to use fresh buttermilk instead of water.
Among home remedies, primarily, consuming digestive lemon + water
can relieve many digestive problems.
For this, approximately the juice of one medium-sized lemon
with rock salt or black salt, which we call padelon, added to it,
is extremely beneficial for digestion.
Similarly, pademeeth,
cumin,
and pippali
can also be used in digestive powder, but
these should be used only after consulting a medical professional.
In this way, if we maintain our diet properly,
along with the symptom “I feel somehow unwell,” other
symptoms of impaired digestion will not arise at all, and
we will never have to face serious illnesses in the future.


Comments