top of page
logo.png

When Does Aging Begin Key Causes After 30 Genetics and Ayurveda for Staying Young

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 5
  • 4 min read

वृद्धत्व केव्हा येते

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

वृद्धत्व नेमकं केव्हा येते ? 

वृद्धत्व म्हणजे नेमकं काय ? 

वृद्धत्व का येते - - -- या बद्दल बघणार आहोत

वृद्धत्व का येते - - - - याचे नेमके कारण

कोणीही हमखासपणे सांगू शकलेलं नाही 

तरी देखील काही शास्त्रज्ञांनी पुढील कारणे देण्याचा प्रयत्न केला आहे त्यातली

काही प्रमुख कारण आहेत 

नंबर एक - -  शरीर एक यंत्र असून त्याची झीज होणारच

हे एक यंत्रच आहे आणि यंत्राप्रमाणेच त्याचं काम होणार आहे

नंबर दोन - - - वय वर्ष 30 नंतर अनेक पेशींची निर्मिती

होणे बंद होतं आणि ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि

या पेशींच्या निर्मितीच्या उणीवेने वृद्धावस्था येते

काहींच्या मते विशिष्ट अंतस्त्रावांनी शरीर योग्य

कार्य करीत असते पण वयाच्या काही वर्षानंतर

त्या अंत:स्त्रावात परिवर्तन घडते आणि वृद्धावस्था येते

अंतस्त्रावा वर परिवर्तन काही विशिष्ट काळाने येते आणि 

तो काळ फिक्स नसतो त्यामुळे वृद्धावस्था

कोणाला 30 नंतर

कोणाला चाळीस नंतर कोणाला 45 किंवा

कुठल्यातरी विशिष्ट वयानंतर - - -  परिवर्तन घडते आणि वृद्धावस्था येते

काहींच्या मते अनुवंशिकतेचा प्रभाव असतो

दीर्घायुष्य असणाऱ्या माता पित्यांची संतती

दीर्घायुषी असते त्याला अपवाद आहे

अपघात आणि अन्य कोणत्या आजाराने मृत्यू न झाल्यास म्हणजेच

ज्यांचे आई-वडील हे दीर्घायुष्य असतात त्यांची संतान पण

दीर्घायुष्य असणारी असते म्हणजेच मातापित्यांच्या आयुर्मानाचा

परिणाम त्यांच्या संततीवर होत असतो

अजून अनेक शास्त्रज्ञांनी त्यांच्या त्यांच्या मताने कारणं 

देण्याचा प्रयत्न केलेला आहे

वेगवेगळी अनुमान आहेत

कारण काहीही असो एक मात्र सत्य आहे की वय वाढेल

तसे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतील आणि

शेवटी मृत्यू हा अटळ आहेआपण शरीर रचना आणि क्रिया शास्त्राचा विचार केला असता

वयाच्या 30 वर्षापासून शरीराची कार्य कमी होण्याची क्रिया सुरू होते

म्हणजेच वय वर्ष 30 नंतर केव्हाही वृद्धावस्था दिसू शकते

काहींच्या मते स्त्रियांची मासिक पाळी बंद झाल्यानंतर म्हणजे

अंदाजे पन्नासाव्या वर्षी स्त्रिया म्हाताऱ्या होतात तर

पुरुष हे 70 व्या वर्षाला म्हातारे होतात

काही लोक माणसाच्या निवृत्तीच्या काळाला म्हातारपणाशी जोडतात पण

हे योग्य नाही कारण विविध पदांसाठी वेगवेगळे निवृत्ती काळ आहेत

साधारणतः निवृत्तीच्या बाबतीमध्ये खरोखर निवृत्त झाल्यानंतर

मनुष्याला म्हातारपणाची वेध लागतात असं म्हणण्यास हरकत नाही

शरीराच्या अंतर्गत क्रियांचे कोणतेही मोजमाप वृद्धत्वाची

गमक बनू शकत नाही असे माझे स्पष्ट मत आहे कारण

वृद्धावस्थेमुळे शरीरातल्या अवयवांवर होणाऱ्या परिणामात

मोठी तफावत दिसून येते.

माणसाच्या कालगणित वयाची नेहमीच त्याच्या

जीवशास्त्रीय वयासोबत सांगड असतेच असे नाही

एखाद्या सत्तर वर्षे वयाच्या मनुष्याची शारीरिक श्रम 

करण्याची क्षमता चाळीस वर्षे वय असणाऱ्या

मनुष्यापेक्षा देखील अधिक असू शकते त्यामुळे

या दोघांमध्ये नेमकं वृद्ध कोण असा प्रश्न पडेल

थोडक्यात म्हणजे वृद्धत्व ही सतत वाढत जाणारी

माणसाचा जोम घटविणारी आणि शेवटी मरणाच्या दारात 

जाऊन थांबणारी शरीराच्या अंतर्गत प्रतिकूल बदलाची स्थिती आहे

वृद्धत्व म्हणजे नवीन परिस्थिती सोबत जुळवून

घेण्याच्या शरीराच्या सामर्थ्याचा ऱ्हास आणि

त्यामुळे अंतर्गत स्थिती योग्य प्रकारे न सांभाळता येणे होय

आणि असे बदल प्रत्येक व्यक्तीपर्यंत बदलत असतात म्हणून

वृद्धत्वे विषयी मला सांगायचं आहे की

मनुष्य दिसतो तसाच तो असतो 

दिसणे हे केवळ आपल्या दृष्टीने नव्हे तर त्याच्या

कार्य करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते

म्हणजे व्यक्ती परत्वे वृद्धत्व वेगवेगळ्या वयामध्ये येऊ शकते

काहीही असो आपण शरीराने आणि मनाने तरुण राहण्यासाठी

आयुर्वेदात वर्णन केलेल्या नियमांचे पालन केले तर

निश्चितच आपले तारुण्य अधिक काळ टिकेल म्हणजेच

वृद्धत्व ही अवस्था फार उशिराने प्राप्त होईल आणि

वृद्धत्व आले तरी देखील मनाने तरुण राहण्यासाठी

आयुर्वेदाचे आचरण करणे उत्तम 

 

 

 

 

When Does Aging Begin Key Causes After 30 Genetics and Ayurveda for Staying Young

Aging does not begin on a birthday. It starts quietly, long before wrinkles or grey hair appear. In biology, aging means the gradual decline in the body’s ability to repair, renew, and maintain itself.

This article is for information only. For medical concerns, speak to a qualified doctor or practitioner.

What aging really means

Aging happens because cells, tissues, hormones, and organs slowly lose efficiency. The body still works, but recovery becomes slower. Muscles take longer to heal, sleep may change, and energy may feel less steady.

Scientists link aging to several major causes:

DNA damage - Daily stress, pollution, radiation, and normal metabolism can damage DNA over time.

Telomere shortening - Telomeres protect chromosome ends. They become shorter as cells divide.

Cellular senescence - Some old cells stop dividing but remain in the body. They may increase inflammation.

Oxidative stress - Free radicals can harm cells when the body’s antioxidant defence is weak.

Mitochondrial decline - Mitochondria produce energy. With age, they become less efficient.

What changes after 30

After around 30, the body often begins to show subtle changes. Muscle mass may slowly reduce if strength activity is low. Bone density can start declining, especially without enough calcium, vitamin D, and weight-bearing exercise.

Cell production does not fully stop, but cell renewal and repair become slower. Skin cells regenerate less quickly. Collagen production reduces, which affects skin firmness and joint comfort.

Hormonal changes also matter. Growth hormone, sex hormones, thyroid balance, insulin sensitivity, and stress hormones can shift with age. These endocrine changes influence weight, mood, sleep, stamina, and metabolism.

How genetics affects lifespan

Genes do play a role in longevity. Some families naturally have better DNA repair, healthier cholesterol patterns, or lower risk of certain diseases. Still, genes are not destiny.

Lifestyle can strongly affect how genetic risk expresses itself. Food habits, sleep, stress, movement, tobacco use, alcohol, and social connection all influence healthy ageing.

Effects on body and mind

Aging can affect:

Physical capacity - Reduced strength, flexibility, balance, and stamina.

Mental state - Slower recall, mood changes, anxiety, or reduced motivation may appear.

Immunity - The body may take longer to fight infections.

That said, many people stay sharp, active, and independent well into later life with steady habits.

Ayurveda-inspired ways to stay youthful

Ayurveda focuses on daily rhythm, digestion, and balance. Practical habits include:

Eat fresh, warm, seasonal food.

Keep regular sleep and wake times.

Use gentle daily movement, such as walking, yoga, and stretching.

Practise breathing exercises and meditation.

Support digestion with mindful eating and avoiding overeating.

Consider oil massage, or `abhyanga`, if suitable for your body type.

The aim is not to stop aging. It is to age with strength, clarity, and calm.

FAQ

When does aging actually begin?

Biological aging begins gradually in early adulthood, but noticeable changes often become clearer after 30.

Can aging be reversed?

Aging cannot be fully reversed, but healthy habits can slow functional decline and improve energy, strength, and wellbeing.

Does Ayurveda stop aging?

Ayurveda does not stop aging. It supports balance, digestion, rest, and resilience, which may help people feel healthier as they age.

Is genetics more important than lifestyle?

Genetics matters, but lifestyle strongly influences healthy ageing. Daily habits often decide how well the body manages age-related changes.

Aging is natural, but weakness is not guaranteed. Care for sleep, food, movement, stress, and digestion early, and the later years can be far healthier than expected.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page