top of page
logo.png

Do this for your health on a holiday

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 14
  • 5 min read

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच

संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण

ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे

पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत

अजून काय असेल हे येणारा काळ सांगणार आहे

मात्र सर्व स्क्रीनवर असेल

स्क्रीन टाईम वाढणार

अभ्यास    / / /  काम / / / /   विरंगुळा सगळंच

स्क्रीनवर असणार

मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आजच्या जमान्या नुसार

सुट्टीच्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एकदा आपल्या स्वास्थ्यासाठी

काय काय करू शकतो हे बघणार आहोत

साधारणतः उद्या सुट्टी आहे म्हणून आज रात्री आपण उशिरापर्यंत

टीव्ही    / / /   मोबाईल इत्यादी बघतो

कदाचित रात्रभर जागरण करतो आणि दुसऱ्या दिवशी

दुपारीच उठतो

काही व्यक्ती दिवसभर झोप काढतात

मध्ये मध्ये वेळी अवेळी चमचमीत आहार सेवन करतात

पुन्हा झोपतात आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायची वेळ येते तेव्हा

डोकेदुखी

ऍसिडिटी

अजीर्ण इत्यादी विकारांना / / / /  लक्षणांना सामोरे जातात

आपल्या स्वास्थ्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी सुट्टीचा दिवस कसा घालवावा या

संदर्भात काही महत्त्वाचे नियम असतात

आपले एवरेज लाईफ टाईम वाढले आहे पण ते स्वास्थ्यपूर्ण नसून

औषधी मेडिसिन डिपेंडंट असणारे वाढलेले आहे जर

आपण सुट्टीचा योग्य वापर केला तर

मेडिसिन डिपेंडंटता कमी होईल

सुट्टीच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजता झोपणे आणि सकाळी सहा वाजता म्हणजे आठ तासाच्या झोपेनंतरच उठावे

सकाळी उठल्यानंतर प्रातःविधी आटपून

दंत धावन म्हणजे दात घासावे

या दिवशी कडुनिंबाच्या काड्याने दात घासणे उत्तम

कधी कधी मधाने पण दात स्वच्छ करता येतात यामुळे दात आणि हिरड्या यांना मजबुती प्राप्त होते

यानंतर संपूर्ण शरीराचे अभ्यंग करावे.

वैद्यांच्या मार्गदर्शनात उत्तम अन्यथा

घरच्या घरी स्वतः करता येऊ शकते.

याबद्दलची माहिती माझ्या अन्य व्हिडिओ मध्ये आहेच 

अभ्यंगानंतर एक तासांनी गरम पाण्याने आंघोळ करावी

ही आंघोळ म्हणजे शाही स्नान असावे - - -  यात उटणे

डाळीचे पीठ वापरावे

साबण  / / /   शाम्पू यांचा वापर करू नये

संपूर्ण शरीराची शुद्धी होईल अशा पद्धतीने स्नान करावे.

उटण्याद्वारे त्वचा घासली जाऊन त्यातील मल पूर्णपणे निघतो

घामाची छिद्रे मोकळी होतात

त्वचेत असणारा घामाचा दुर्गंध पूर्णतः नष्ट होईल असे बघावे

यानंतर संपूर्ण शरीर कोरडे करून इष्ट देवदेवता यांची पुजा अर्चना 

ध्यानधारणा इत्यादी करावेत यामुळे

मनोबल वाढते

शरीरासाठी आपण आहार / / / औषधी घेतच असतो पण मनासाठी या दिवशी 30 ते 40 मिनिटे काढावीत इतर दिवशी

मनासाठी पाच ते दहा मिनिटे पुरेशी असतात

या मनाच्या क्रियां नंतर न्याहरी / / /  आहार घेणे इत्यादी करण्यापेक्षा प्रथम बीट गाजर डाळींब मोसंबी इत्यादींचा ज्यूस किंवा ग्रीन टी आपल्या प्रकृतीनुसार अनुसरून वैद्यकीय सल्ल्याने घ्यावेत नंतर

अर्ध्या ते एक तासांनी फळांचे सेवन करावे

दुपारी गरजेनुसार जेवण करावे

सायंकाळी बागेत फिरायला जाणे किंवा दुपारी छोटीशी दोन-तीन तासाची ट्रीप इत्यादी करू शकतात म्हणजे रोजच्या रुटीन पेक्षा वेगळे असावे.

टीव्ही / / / /  लॅपटॉप   / / / / /   मोबाईल यांच्या स्क्रीनला आराम द्यावा

अगदी गरजेनुसार फोनचा पापर करावा

अवांतर वाचन - - - ऑडिओ बुक्स ऐकणे नव्हे

अवांतर वाचन म्हणजे ऑडिओ बुक्स इत्यादी ऐकणे नव्हे तर वाचनच करावे

छंद असतील ते या दिवशी जोपावेत 

रात्री नऊच्या दरम्याने झोपावे जेणेकरून आठ तासापेक्षा अधिक झोप घेता येऊ शकेल अशा प्रकारे

सुट्टीचा वापर केला तर दीर्घकाळ तारुण्य

निरोगी आयुष्य

मानसिक शारीरिक दृढता निश्चितपणे प्राप्त होईल

हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ?

नक्कीच लिहा

जय आयुर्वेद

 

 

Do this for your health on a holiday

From the computer age, we have

entered the era of AI, Artificial Intelligence

Physical exertion may be less than before, but mental exertion is going to increase

What else there will be, the coming time will tell

However, everything will be on screens

Screen time will increase

Studies    / / /  work / / / /   recreation, everything

will be on the screen

I am Dr. Satish Vasant Shindadkar, and today, according to today's times,

we are going to see what all we can do for our health

once a week, that is, on a holiday

Generally, since tomorrow is a holiday, tonight we

watch TV    / / /   mobile phones, etc. until late

Perhaps we stay awake all night and the next day

get up only in the afternoon

Some people sleep throughout the day

and in between, at odd times, consume spicy and rich foods

sleep again, and when it is time to go to work the next day

they face

headaches

acidity

indigestion and other disorders / / / /  symptoms

There are some important rules regarding how to spend a holiday

for our healthy and long life

Our average lifetime has increased, but it is not healthy

rather, it has increased with dependence on medicines. If

we use the holiday properly

medicine dependence will decrease

On the night before the holiday, sleep at ten o'clock and get up at six in the morning, that is, only after eight hours of sleep

After getting up in the morning, after completing the morning ablutions

brush your teeth, that is, perform dental cleansing

On this day, it is best to brush your teeth with a neem twig

Sometimes teeth can also be cleaned with honey, which strengthens the teeth and gums

After this, perform an abhyanga of the entire body.

Under the guidance of a physician is best, otherwise

it can be done yourself at home.

Information about this is already available in my other video

One hour after the abhyanga, bathe with hot water

This bath should be a royal bath - - - in which ubtan

and gram flour should be used

Soap  / / /   shampoo should not be used

Bathe in such a way that the entire body is cleansed.

By rubbing the skin with ubtan, the impurities in it are completely removed

the sweat pores become clear

make sure that the odor of sweat present in the skin is completely eliminated

After this, dry the entire body and perform worship and prayers of your chosen deities

meditation, etc., as this

increases mental strength

We take diet / / / medicines for the body, but for the mind, on this day, 30 to 40 minutes should be set aside; on other days

five to ten minutes are sufficient for the mind

After these mental activities, rather than having breakfast / / /  food, etc., first have juice of beetroot, carrot, pomegranate, sweet lime, etc., or green tea according to your constitution and on medical advice, then

after half an hour to one hour, consume fruits

Have lunch as needed in the afternoon

In the evening, you can go for a walk in the garden or take a short two-to-three-hour trip in the afternoon, etc., meaning it should be different from the daily routine.

Give the screens of the TV / / / /  laptop   / / / / /   mobile a rest

Use the phone only as absolutely necessary

Extra reading - - - not listening to audiobooks

Extra reading does not mean listening to audiobooks, etc., but actually reading

Pursue your hobbies on this day

Go to sleep around nine at night so that you can get more than eight hours of sleep, in this way

if the holiday is used, long-lasting youth

a healthy life

mental and physical strength will definitely be attained

How did you like this video ?

Do write for sure

Jai Ayurveda

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 
Do you like eating sabudana?

साबुदाणा खायला आवडतो ?नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साबुदाणा या विषयी बघणार आहोत तसं पाहिलं तर साबुदाणा हा भारतीय नाही अंदाजे 80 वर्षांपूर्वी भारतात आला आणि तो कधी उपवासात समाविष्ट झाला

 
 
 

Comments


bottom of page