top of page
logo.png

What Should not You Eat With Milk Ayurvedic Reasons and Health Risks

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 13
4 min read

दुधासोबत या गोष्टींचे सेवन टाळा 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

दुधासोबत कोणत्या गोष्टींचे

सेवन करू नये हे बघणार आहोत 

आपणा सर्वांना माहिती आहे की दूध हे पूर्ण अन्न आहे आणि

तसेच ह्या दुधापासून बनवलेले दही

लोणी

तूप 

श्रीखंड

खवा इत्यादी अनेक प्रकार आपण नित्यनियमाने सेवन करत असतो

अशा या दुधाला किती प्रमाणात

कोणत्या वेळेला सेवन करायला हवे या विषयी आपण

अन्य माझ्या यूट्यूब लेक्चर मध्ये बघितले आहेत

साधारणतः शक्यतो रात्री दूध घेऊ नये ते

प्रत्येक प्रकृतीसाठी योग्य नसते  

जर दूध खात्रीचे असेल तर ते

बहुतांशतः प्रत्येक प्रकृतीच्या व्यक्तीला

सकाळी नाश्त्यात घेणे आरोग्यदायक असते परंतु

या दुधासोबत

आपण काय सेवन करीत आहोत

त्याच्यावर सर्व काही अवलंबून असते

दुधासोबत कोणत्या गोष्टींचे सेवन आपण टाळायला हवे

या विषयी आपण बघू या 

दुधासोबत कोणत्याही प्रकारचे आंबट फळ सेवन करणे टाळावे

दुधासोबत किंवा दूध पचण्याच्या अगोदर आंबट फळांचे सेवन किंवा

आंबट फळ अगोदर सेवन केलेले असतील आणि ती पचण्याच्या

अगोदरच दूध सेवन करणे टाळावेअसे केल्यास विविध प्रकारच्या पोटाच्या संबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात

सोबत अनेक प्रकारचे त्वचा विकार देखील होऊ शकतात

आयुर्वेदानुसार हे विरुद्ध अन्न आहे 

दुधासोबत क्षारयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे जसे ज्यामध्ये

भरपूर प्रमाणात मीठ आहे उदाहरणार्थ खारी

खारे बिस्किट इ. तसेच

ज्यामध्ये सोडा आहेत असे बेकरीचे पदार्थ टाळावेत

तसेच

क्षारयुक्त पदार्थांमध्ये तिखट पदार्थांचा देखील समावेश होतो म्हणून

मसालेदार तिखट पदार्थ दुधासोबत सेवन करू नये 

दूध आणि गूळ यांचं एकत्र सेवन हे देखील आयुर्वेदाला मान्य नाही परंतु

कित्येक लोक आयुर्वेदाचा उल्लेख करून अशा गोष्टींचे सेवन करतात

हे देखील एक प्रकारचे विरुद्ध अन्न आहे 

दूध आणि मासे यांचे देखील एकत्र सेवन हे विष स्वरूप

असल्याने विविध प्रकारचे त्वचा विकार आणि अन्य गंभीर आजार उत्पन्न होऊ शकतात म्हणून

दूध आणि दुधासोबत किंवा दूध पचण्याच्या आगोदर

माशांच्या रेसिपी सेवन करू नयेअशा प्रकारे दुधासोबत किंवा असे पदार्थ की जे दुधासोबत चालत नाही ते

पचण्याच्या अगोदर दूध घेणं किंवा दूध पचणच्या अगोदर ते पदार्थ घेणे म्हणजे आपले आरोग्य बिघडवून घेणे होय 

साधारणत: आयुर्वेदानुसार असे सेवन करणे म्हणजे पुढील आजारांना आमंत्रण देणे होय - जसे - नेत्र विकार,

त्वचा विकार,

पोटांचे विकार जसे पोटात सुई टोचल्या प्रमाणे वेदना,

पोट भरल्या सारखे वाटणे,

पोटात आवाज होणे,

अम्लपित्त,

थोडे जरी अन्न सेवन केले तर लगेच शौचास जावे लागणे,

ताप,

नाकातून सतत पाणी गाळणे,

रक्त कमी असणे,

नेहमी गळ्यात काहीतरी असल्याची जाणीव होत राहणे,

पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणे इ.

 

 

What Should not You Eat With Milk Ayurvedic Reasons and Health Risks

Milk is often called a complete food because it contains protein, fat, calcium, vitamins, and natural sugars. In many Indian homes, it is also linked with strength, sleep, and nourishment. Yet Ayurveda says milk works best when taken with the right foods, at the right time.

Some food combinations may disturb digestion or create discomfort. This post is for general information only and is not a substitute for medical advice.

Foods to avoid with milk

Sour fruits

Avoid taking milk with sour fruits such as oranges, lemons, amla, pineapple, and very tangy berries. Ayurveda considers this an unsuitable combination because sour foods may disturb the cooling, nourishing quality of milk.

This mix may also make milk curdle in the stomach, which can feel heavy for some people.

Salty foods

Milk and highly salty foods are not considered a good match in Ayurveda. Examples include salted snacks, chips, pickles, and very salty namkeen.

Ayurveda links this combination with poor digestion and imbalance in the body’s natural processes. It may also increase thirst, heaviness, or bloating in sensitive people.

Spicy food

Very spicy meals with milk can be hard on digestion. Milk is cooling and heavy, while spicy food is heating and sharp. Ayurveda sees these qualities as conflicting.

If taken together often, this may cause acidity, indigestion, or a coated feeling in the mouth.

Milk and jaggery

Many people drink milk with jaggery, especially in winter. Ayurveda usually treats this combination with caution. Fresh jaggery may be heavy to digest, and when mixed with milk, it may increase sluggish digestion in some people.

If someone is prone to gas, bloating, or heaviness, this mix may not suit them.

Milk and fish

Milk and fish is one of the most discussed incompatible food combinations in Ayurveda. Fish is generally heating and protein-rich, while milk is cooling and heavy.

Ayurveda advises avoiding this mix because it may disturb digestion and skin health in some individuals.

Possible health problems from wrong milk combinations

Wrong combinations may cause:

Bloating and gas

Acidity or indigestion

Nausea or heaviness

Loose motions in sensitive people

Skin irritation or flare-ups in some cases

Sluggish digestion and discomfort

Why Ayurveda advises caution

Ayurveda focuses on food compatibility, not just nutrients. It looks at taste, heating or cooling effect, digestion time, and how foods behave after digestion. When two foods have opposing qualities, they may become harder to digest together.

FAQ

Can I eat banana with milk?

Ayurveda often advises caution with banana and milk because both can feel heavy. Some people tolerate it, while others feel bloated.

How long should I wait after eating fish to drink milk?

There is no fixed medical rule. From an Ayurvedic view, it is better to keep them in separate meals with a good gap.

Is tea with milk harmful?

Milk tea is common in India. It is not the same as mixing milk with sour fruits or fish, but too much tea may affect digestion or sleep.

A healthier takeaway

Milk can be nourishing, but it does not suit every food. Keep it simple, avoid sour, salty, very spicy, jaggery-heavy, and fish-based combinations, and notice how your body responds. A mindful diet is often the safest start to better health.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page