top of page
logo.png

What does Ayurveda say about blood donation

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 14
3 min read

रक्तदान संदर्भात आयुर्वेद काय म्हणतं 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

रक्तदानाच्या संदर्भात आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय असेल

या विषयी बघणार आहोत 

कुठल्याही प्रकारचे दान हे श्रेष्ठ असतं 

आपल्या संस्कृतीमध्ये दानाला खूप महत्त्व आहे 

रक्तदान हा प्रकार आयुर्वेदात किंवा आपल्या संस्कृतीत कुठेही वर्णन केलेला नाही 

तरी सुद्धा आत्ताचा संदर्भ लक्षात घेता

निश्चितच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे 

आयुर्वेदाचा विचार केला असता आयुर्वेदामध्ये

रक्त मोक्षण नावाचं एक पंचकर्म सांगितलेलं आहे आणि याला अर्धी चिकित्सा

असं म्हटलेलं आहे 

पूर्वीच्या काळी आणि आता देखील अनेक वैद्य

विविध आजारांवर रक्त मोक्षण ही प्रक्रिया करत असतात आणि

ह्या रक्तमोक्षणात 

जळवा लावणे

शिरावेध

अलाबु इत्यादी अनेक प्रकार आहेत 

या प्रक्रियेमध्ये

शरीरातील थोडे रक्त काढून फेकून दिले जात असते परंतु

कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीने वर्षभरातून एकदा

सहा महिन्यातून एकदा किंवा

तीन महिन्यातून एकदा रक्तमोक्षण करण्याच्या ऐवजी

रक्तदान करणे निश्चितच स्वास्थ्यासाठी उत्तम असते 

आजच्या रक्तदानाच्या संदर्भातील जे काही नियम आहेत जसे

वजन

वय आणि विशिष्ट हिमोग्लोबिनचं प्रमाण

याचा सर्व विचार करूनच रक्तदान करावे 

आयुर्वेद शास्त्रानुसार शरद ऋतू म्हणजेच साधारणत: 

ऑक्टोबर महिन्यामध्ये रक्त मोक्षण करणं उत्तम असतं

म्हणजे शरद ऋतुत रक्तदान केल्यास उत्तम 

रक्तमक्षण ही जी पंचकर्म मधील एक प्रक्रिया आहे

साधारणतः ज्यांना त्वचेचे आजार आहेत जसे

चेहऱ्यावर मुरूम येणे

सोरायसिस इत्यादी

अनेक प्रकारचे त्वचे संदर्भातील विकार

पित्त दोष ज्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात आहे

ज्यांना उष्णतेचे विकार आहेत

ऍसिडिटी

डोकेदुखी इत्यादी अनेक आजारांवर रक्तमोक्षण प्रक्रिया केली जाते आणि अशाच

आजारांवर रक्त मोक्षांच्या ऐवजी वैद्यकीय सल्ल्याने

रक्तदान केल्यास निश्चितच रक्तमोक्षणचे फायदे मिळू शकतात

म्हणजेच आपल्या आरोग्याच्या रक्षणासोबत

दानाचा फायदा देखील आपण घेऊ शकतो 

अशा प्रकारे आयुर्वेदातील एका प्रकारच्या पंचकर्माला

आपण दानाच्या स्वरूपामध्ये रूपांतरित करू शकतो 

चला तर मग वैद्यकीय सल्ल्याने रक्तदान करून

समाजाचे आरोग्य आणि स्वतःचे आरोग्य अबाधित राखू या 

 

 

What does Ayurveda say about blood donation

Namaskar, I am Dr. Satish Vasant Shindadkar, today we will

look at what the Ayurvedic perspective would be regarding

blood donation 

Any kind of donation is considered noble 

In our culture, donation is given great importance 

Blood donation is not described anywhere in Ayurveda or in our culture 

Nevertheless, considering the present context

blood donation is certainly the greatest form of donation 

From the Ayurvedic perspective, in Ayurveda

a Panchakarma procedure called Raktamokshana is described, and this is referred to as half of the treatment

In earlier times and even now, many physicians

perform the procedure of Raktamokshana for various diseases and

in this Raktamokshana

leech application

venesection

Alabu, etc., are among the various methods 

In this procedure

a small amount of blood is removed from the body and discarded, but

instead of an otherwise healthy person undergoing Raktamokshana once a year

once every six months or

once every three months, donating blood is certainly better for health 

Today, whatever rules there are regarding blood donation, such as

weight

age and a specific hemoglobin level

blood donation should be done only after considering all of these factors 

According to Ayurveda, Sharad Ritu, that is, approximately

in the month of October, is the best time for Raktamokshana

meaning that donating blood during Sharad Ritu is beneficial 

Raktamokshana, which is one of the procedures in Panchakarma

is generally performed for those who have skin diseases such as

pimples on the face

psoriasis, etc.

many types of skin-related disorders

those in whom the Pitta dosha is present in greater proportion

those who have disorders related to heat

acidity

headaches, etc., and many other diseases, the Raktamokshana procedure is performed, and for such

diseases, instead of Raktamokshana, under medical advice

donating blood can certainly provide the benefits of Raktamokshana

That is, along with protecting our health

we can also gain the benefit of donation 

In this way, one type of Panchakarma in Ayurveda

can be transformed into a form of donation 

So then, by donating blood under medical advice

let us preserve the health of society and our own health 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page