top of page
logo.png

Walk, otherwise medicines will start.

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 6
  • 7 min read

आपण चाला अन्यथा औषधी चालू लागतील

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - -    चालण्याच्या व्यायामाबद्दल बघणार आहोत - - - - -       जर आपण चालणार नसाल तर आपल्याला औषध चालू लागतील

चालणे आवश्यक आहे - - - चालणे कशासाठी आवश्यक आहे - - - नेमके किती चालावे - - त्याचे मोजमाप कसे ठरवावे - - -  कुणी किती चालणे आवश्यक आहे - - -    केव्हा चालायला हवे - - - - किती जलद किंवा किती हळू / / / सावकाश /  झरझर कसे चालावे - - - कोणत्या आजारामध्ये किती चालावे / / / कसे चालावे

निरोगीत्व टिकवून ठेवण्यासाठी कसे चालावे  - - - - -  - -  - -

याचे तर्क आणि व्यवहारनिष्ठ पुरेसे विवेचन आयुर्वेद शास्त्राच्या सिद्धांतानुसार - - - - - - आज आपण करून घेणार आहोत

चालण्याच्या क्रियेने केवळ पायालाच व्यायाम होतो असे नसून - - - - नियमित चालण्याने शरीराचे सांधे / / / तळपाय / / / घोटा / / पोटऱ्या / / जंगा / /  गुडघे / / कंबर - त्या परिसरातील हाडे - - - मांड्या नितंब इत्यादींना व्यायाम होतो तसेच - - -  - - --  -  

चालताना संपूर्ण हात / पाठीचे स्नायू / पाठीचे मणके / सांधे / पृष्ठवंशाच्या बाजूने मानेपर्यंत असणारे सर्व स्नायू /  बरगड्या /   पोटामध्ये असणारे आतडे - - -   अनेक अवयव जसे किडनी यांचा देखील चांगला व्यायाम होत असतो

शरीरात असणारे अवयव / / सिरा //  स्नायू / / संधी / / रक्तवाहिन्या / / वातवाहिन्या / /  पेशी इत्यादी सर्वांचे छोटे छोटे आजार आणि लक्षणं हे - - - -  नियमित फिरायला जाण्यामुळे म्हणजेच चालण्यामुळे हळूहळू कमी होतात

संधिवात या व्याधीमध्ये शक्य तेवढे चालावे कारण - - - - - मुळीच न चालल्याने सांधे आखडतात - - - -  मात्र वैद्यकीय सल्ल्याने शक्य होईल तेवढेच चालावे - - - - -  अति त्रास होईल असे चालू नये - - - - - -   संधिवात हा व्याधी शक्यतो बैठे काम असणाऱ्या व्यक्तींना होत असल्याचे आढळत आहे

मधुमेह म्हणजेच डायबिटीस असणारे रुग्ण यांच्यासाठी पायी चालण्याचा व्यायाम - - - - -  औषध रुपी आहे हा व्याधी देखील बैठे काम करणाऱ्यांना प्रामुख्याने होतो असे आढळते

पायांना स्पर्श न समजणे - - - -  कंबर पाठ दुखी - - - - स्थूलता - - - - रक्तप्रवाहात अडथळे असणारचे दोष म्हणजेच ब्लॉकेजेस असणे जसे - -  हृदय इत्यादी ठिकाणी असणे  - - - - -   प्रोस्टेट वाढणे - - - -  पचन मंदावणे - - - - पोट साफ न होणे इत्यादी विकारांमध्ये - - - - - नियमित फिरायला जाण्याने चांगला फरक पडतो

नियमित फिरायला गेल्याने - - - -  शरीर शुद्धी घडून निरामय दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते - - - - परंतु कोणी आणि केव्हा फिरायला जावे हे महत्त्वपूर्ण आहे

सर्दी / / दमा / / खोकला इत्यादी कफाचे विकार तसेच डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी सकाळी सूर्योदयाच्या अगोदर फिरायला जावे

डोकेदुखी पित्तदोषाचा त्रास असणारे आणि उष्णतेचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी - - - - सायंकाळी फिरायला जावे तसेच

वातदोष विकार असणाऱ्यांनी सकाळी आणि सायंकाळी फिरायला जावे

हिवाळ्यात अधिक थंड वातावरण असल्यास दुपारी - - -फिरायला जायला हरकत नसते

साधारणतः सकाळची वेळ सर्वांसाठीच उत्तम असते कारण यावेळी पर्यावरण मध्ये शुद्धता असते आणि प्रामुख्याने शांतता देखील असते

फिरायला जाण्याच्या काळात अंगावर असणारे कपडे सैलसर हवे, थंडीत लोकरीचे गरम आणि पावसाळ्यात वातावरणानुसार पोशाख धारण करावा

अनेक व्यक्ती जोडीने फिरायला जातात आणि दोघीही एकमेकांच्या चालण्याच्या गतीकडे लक्ष देऊन चालत असतात - - -  -   किंवा काही फक्त आणि फक्त गप्पा मारण्याच्या उद्देशाने चालायला जात असतात हे अयोग्य आहे - - - - -     फिरायला जाताना एकटे जाणे उत्तम आहे

काही व्यक्ती आपल्या सोबत त्यांचे पाळीव प्राणी जसे - - - कुत्रा यांना घेऊन फिरायला जात असतात - - - - - - -  मात्र अशा वेळी त्या प्राण्यांचे फिरणे होत असते हे लक्षात घ्यावे

फिरायला जाताना चाल कशी असावी याचा देखील विचार आयुर्वेदामध्ये केला आहे

जे बैठक प्रधान व्याधी आहेत जसे संधिवात मधुमेह - - - - - तसेच कफ प्रधान व्याधी असल्यास  अशा व्यक्तींनी थोडे जलद चालणे आवश्यक आहे

संधिवात असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या सांध्यांच्या ठिकाणी असणारा ठणका - - -  सूज इत्यादी पाहूनच आपल्या सोयीनुसार सहन होईल अशा पद्धतीने चालावे

दमा / / खोकला / / हृदयरोग इत्यादी व्यक्तींनी सावकाश गतीने फिरायला जाण्यास हरकत नसते

ज्या व्यक्तींना कोणताही त्रास नाही अशा व्यक्तींनी थोडं फास्ट चालण्यास हरकत नसते साधारणतः आपल्या हृदयाच्या गती 90 ते 92 प्रति मिनिट इथपर्यंत जातील इतके फास्ट चालावे

फिरायला जाण्यात मनाची प्रसन्नता निर्माण होत असते

शरीर आणि मन या दोघांनाही ताजेतवाने ठेवण्यासाठी फिरणे हे आवश्यक असते

म्हणूनच म्हटलं आहे की आपण चालत नसाल म्हणजे फिरायला जाणार नसाल तर आपल्याला औषध चालायला लागतील 

 

 

 

Walk, otherwise medicines will start.

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at - - - -    the exercise of walking - - - - -       If you do not walk, you will have to start taking medicines.

Walking is essential - - - Why is walking essential - - - Exactly how much should one walk - - How should it be measured - - -  Who needs to walk how much - - -    When should one walk - - - - How fast or how slow / / / leisurely /  briskly should one walk - - - How much should one walk in which disease / / / How should one walk.

How should one walk to maintain good health  - - - - -  - -  - -

Today we are going to understand this with sufficient logical and practical explanation according to the principles of Ayurveda - - - - - -

Walking does not exercise only the legs - - - - Regular walking exercises the body's joints / / / soles of the feet / / / ankles / / calves / / thighs / / knees / / waist - the bones in that region - - - hips, buttocks, etc. are exercised, and also - - -  - - --  -  

While walking, the entire arms / back muscles / spinal vertebrae / joints / all the muscles along the spine up to the neck / ribs / intestines in the abdomen - - -   many organs such as the kidneys also get good exercise.

The body's organs / / veins // muscles / / joints / / blood vessels / / channels of Vata / / cells, etc., and all their minor ailments and symptoms - - - - gradually reduce by going for regular walks, that is, by walking.

In arthritis, one should walk as much as possible because - - - - - not walking at all causes the joints to become stiff - - - -  however, one should walk only as much as is possible with medical advice - - - - -  one should not walk so much that it causes excessive discomfort - - - - - -   Arthritis is generally found in people who have sedentary jobs.

For patients with diabetes, walking on foot - - - - -  is like medicine. This disease is also mainly found in people who do sedentary work.

Loss of sensation in the feet - - - -  lower back pain - - - - obesity - - - - defects involving obstruction in blood flow, that is, blockages, such as - -  in the heart and other places  - - - - -   enlarged prostate - - - -  slow digestion - - - - constipation, etc. - - - - - regular walking brings good improvement.

By going for regular walks - - - -  the body is cleansed and it helps in attaining a healthy long life - - - - but who should walk and when is important.

People with Kapha disorders such as colds / / asthma / / cough, as well as patients with diabetes, should go for a walk before sunrise in the morning.

People suffering from headaches due to Pitta imbalance and heat-related disorders should - - - - go for a walk in the evening, and likewise,

People with Vata disorders should walk in the morning and in the evening.

If the weather is very cold in winter, there is no objection to - - - - going for a walk in the afternoon.

Generally, the morning is the best time for everyone because the environment is pure at that time and it is mostly peaceful as well.

While going for a walk, the clothes worn should be loose, woolen warm clothes should be worn in winter, and clothing appropriate to the weather should be worn during the rainy season.

Many people go walking in pairs, and both keep paying attention to each other's walking speed while walking - - -  -   or some go only and only for the purpose of chatting. This is inappropriate - - - - -     It is best to go walking alone.

Some people take their pets, such as - - - dogs, with them when they go for a walk - - - - - - -  however, one should remember that in such cases it is the animal that is getting the walk.

Ayurveda has also considered what one's gait should be while walking.

People with predominantly sedentary diseases such as arthritis and diabetes - - - - - as well as those with Kapha-dominant disorders should walk a little briskly.

People with arthritis should walk according to what they can comfortably tolerate, after observing the throbbing pain - - -  swelling, etc. in their joints.

People with asthma / / cough / / heart disease, etc. may walk at a slow pace.

People who have no health problems may walk a little faster. Generally, one should walk fast enough for the heart rate to reach about 90 to 92 per minute.

Walking creates a sense of mental cheerfulness.

Walking is essential to keep both the body and the mind refreshed.

That is why it is said that if you do not walk, that is, if you do not go for walks, you will have to start taking medicines.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page