Travel-Related Health Problems
- Satish Shindadkar
- Aug 2
- 6 min read
प्रवासाच्या आरोग्य समस्या
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज प्रवासाच्या आरोग्य समस्या या विषयी बघणार आहोत - - - - - - -
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रवास ही गरजेची गोष्ट झालेली आहे - - - अनेकांना तर रोज दोनशे ते तीनशे किलोमीटर प्रवास नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने करावाच लागतो - - - तर काही लोकांना पाच ते दहा किलोमीटर रोज प्रवास करावा लागतो
प्रवासाचेही अनेक प्रकार आढळतात - - - - - त्यातील प्रामुख्याने बंदिस्त वाहनातून प्रवास आणि उघड्या वाहनांवरून प्रवास असे मुख्य दोन प्रकार असतात
आपल्या देशात मध्यमवर्गीय जनता - - - युवक वर्ग हा प्रामुख्याने दुचाकी वाहनांवरून प्रवास करताना आढळतो - - - - दुचाकी वाहनांवरून प्रवास हा प्रकार उघड्या वाहनांवरून प्रवासाच्या प्रकारामध्ये येतो
उघड्या वाहनांवरून प्रवास करताना - - - कधी वेगाने वाहन चालवावे लागते - - - रहदारीतून मार्ग काढावा लागतो - - - आपले व्यवसाय // ऑफिसच्या कामांचे सोबत टेन्शन असते आणि मग या सर्वांचा दूरगामी परिणाम आपल्या शरीरावर घडत असतो
उघड्या वाहनांवरून म्हणजेच दुचाकी वाहनांवरून प्रवास करणे म्हणजे इतर वाहनांच्या अपेक्षेने अधिक प्रमाणात शरीराला हादरे देणे --- -- सोबत त्वचेला जोरात लागणारा वारा - - ऊन - - पाऊस - - - धूर आणि धूळ यांचा प्रसंगानुरूप संपर्क हा वेगळाच - - - यामुळे त्वचेचे विकार होणे - - - त्वचा कोरडी पडणे सहज शक्य आहे
धूर धूर ही नाकाद्वारे शरीरात जाऊन - - - दम्यासारखे श्वसनाचे तसेच फुफ्फुसांचे अन्य विकार जडू शकतात
शहरांमधील वाढत्या कारखान्यांमुळे विषारी रसायनांच्या वातावरणात प्रभावामुळे रस्त्यावरून जाताना डोळ्यातून अश्रू येतात - - - -
दुचाकी वाहन सुद्धा अनेक प्रकारची असतात - - - - चालकाचे उंचीचे अनुरूप वाहन नसल्यास चालकास वाहनावर बसताना - - - - - बसण्याची स्थिती वेडी वाकडी असू शकते यामुळे पाठीच्या मणक्याचे विकार - - - - - कंबरेचे दुखणे इत्यादी त्रास होण्याची संभावना अधिक प्रमाणात असते
सतत दुसऱ्या वाहनांचा येणारा आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण या समस्येला सुद्धा तोंड द्यावे लागणे - - - - हा खूप मोठा तोटा दुचाकी वाहनांवरील प्रवासाचा आहे
लांब वरचा प्रवास किंवा महामार्गावरील प्रवास असल्यास - - - - अपघाताचे प्रमाण अधिक असते - - - - विविध प्रकारचे अपघात प्रत्यक्षात बघितल्यावर किंवा अपघात बघितल्यानंतर त्या अपघात स्थळावरून प्रवास करीत असताना मनावर जे दडपण येते ते वेगळेच असते - - - - अशा वेळी जर वाहकाचे समोरून मोठे वाहन उदाहरणार्थ ट्रक इत्यादी जर आला तर समोरून येणाऱ्या ट्रक चालकांनी नशा तर केली नसेल ना ???? तो आपल्या अंगावर तर येणार नाही ना ??? अशा भीतीला सतत तोंड द्यावे लागत असते आणि याचा मानसिकतेवर प्रभाव पडतो
धोके पुष्कळ आहेत - - - - मात्र जीवनचरित्रासाठी प्रवास टाळता येत नाही - - - - मग नेमकं आपण काय करायला हवं ????? हे बघणार आहोत
दुचाकी वाहनांच्या अतिरेकामुळे - - - - - पाठीच्या मणक्यांचा आजार - - - - कानांचे विकार - - - - नेत्राचे विकार - - - - कायमची सर्दी - - - - निद्रानाश - - - - भूक न लागणे - - - - पचन व्यवस्थित न होणे - - - - पोट साफ न होणे - - - - वजन कमी होणे - - उत्साह नसणे - - - वैवाहिक सुखाची इच्छा नसणे - - - गॅसेस - - - - अम्लपित्त - - लवकर म्हातारपण येणे इत्यादी विकार जडतात
यासाठी काही सोपे उपाय आहेत - - - ते केल्यास निश्चितच दुष्परिणामांची तीव्रता अत्यंत कमी होऊ शकते
आयुर्वेदामध्ये युथ रस बस्ती हा प्रकार नेहमी प्रवास करणाऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून सांगितलेला आहे - - - - अशा प्रकारचा बस्ती वैद्यकीय सल्ल्याने शिकून घ्यावा आणि घरच्या घरी देखील आपण हा प्रकार करू शकतो
आयुर्वेदात वर्णन केलेली दिनचर्या - - - ऋतुचर्या यांचे पालन केल्यास निश्चितच आपणास कोणतेही व्याधी होणार नाही किंवा त्यांची तीव्रता कमी असेल
पोटभर जेवण केल्यानंतर - - - लगेच दुचाकी वरून प्रवास करू नये
सकाळी नाश्ता झाल्यानंतर किमान 20 मिनिटांच्या अवकाशाने वाहनावरून प्रवास करावा
पाठीच्या मणक्यांचा व्यायाम होण्यासाठी - - - - विविध प्रकारची योगासन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावीत म्हणजे मणक्यांना बळकटी येईल
तेलाची मसाज हा देखील एक चांगला प्रतिबंधात्मक उपचार होऊ शकतो - - - रोज पाठीला मालिश करणे जमत नसल्यास आठवड्यातून किमान दोन वेळा तरी मालिश करावी
मालिश करण्यासाठी तीळीचे तेल - - - - एरंडीचे तेल - - - खोबऱ्याचे तेल - - - निर्गुंडी तेल - - - महानारायण तेल यांचा वापर करावा
दुचाकीवरून जे रोज प्रवास करतात अशांनी आठवड्यातून किमान एक वेळा तरी पोहण्याचा व्यायाम करावा
दुचाकी वाहन हे बंदिस्त नसल्यामुळे - - - प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर फुफ्फुसात जाते - - - यावर प्रतिबंध म्हणून मास्क लावणे अत्यावश्यक आहे - - - तसेच प्रवासाला जाण्याच्या अगोदर नाकाला - - - आतून खोबरेल तेल लावावे - - - जेणेकरून धूळ नाकातून आज प्रवेशीत होणार नाही
वाहनावरून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला - - - - मानसिक दडपण असतेच त्यामुळे आत्मशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने अध्यात्माचा अभ्यास आणि शवासन करणे श्रेष्ठ ठरते
जे व्यक्ती दुचाकीवरून रोज 20 किलोमीटर पेक्षा अधिक प्रवास करत असतील अशांनी आयुर्वेदिक तज्ञाचा सल्ला घेऊन आहार विहार आणि औषधी ठरवाव्यात
सर्वसाधारणतः चवनप्राश - - - गायीचे तूप - - - दूध - - - शतावरी - - - अश्वगंधा कवचबीज - - - आवळा यांचे नियमित - - वैद्यकीय सल्ल्याने सेवन केल्यास आपला दुचाकी वरील प्रवास निश्चितच सुखकर होईल
Travel-Related Health Problems
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today, we are going to discuss travel-related health problems.
Travel has become a necessity in everyone's life. Many people have to travel 200 to 300 kilometers every day for work or business, while others travel 5 to 10 kilometers daily.
There are many types of travel. Broadly, they can be divided into two main categories: travel in enclosed vehicles and travel in open vehicles.
In our country, the middle class and young people mainly travel on two-wheelers. Traveling by a two-wheeler falls under the category of travel in open vehicles.
While traveling on open vehicles, one often has to drive at high speeds, navigate through traffic, and simultaneously deal with the stress of work or office responsibilities. All these factors have long-term effects on the body.
Traveling on open vehicles, especially two-wheelers, exposes the body to more vibrations and jolts compared to other vehicles. In addition, the skin is directly exposed to strong winds, sunlight, rain, smoke, and dust depending on the circumstances. This can lead to skin disorders and dry skin.
Smoke enters the body through the nose and can cause respiratory problems such as asthma and other lung disorders.
Due to the increasing number of factories in cities and the resulting toxic chemicals in the environment, people often experience watery eyes while traveling on the roads.
There are many types of two-wheelers. If the vehicle is not suited to the rider's height, the riding posture may become awkward, increasing the likelihood of spinal disorders, back pain, and related problems.
Constant noise from surrounding vehicles also exposes riders to noise pollution, which is another major disadvantage of traveling by two-wheeler.
Long-distance travel or highway travel carries a higher risk of accidents. Witnessing different kinds of accidents, or passing through an accident site, creates mental stress. In such situations, if a large vehicle such as a truck approaches from the opposite direction, thoughts such as, "What if the truck driver is intoxicated?" or "What if the truck comes toward me?" may constantly arise. This ongoing fear can have a significant impact on mental well-being.
There are many risks, but travel cannot be avoided for the sake of livelihood. So, what exactly should we do?
Excessive travel on two-wheelers can lead to spinal disorders, ear problems, eye disorders, chronic colds, insomnia, loss of appetite, poor digestion, constipation, weight loss, lack of enthusiasm, reduced sexual desire, gas, acidity, premature aging, and other health issues.
There are some simple remedies. If followed, they can certainly reduce the severity of these adverse effects.
In Ayurveda, a procedure called Yuth Rasa Basti is recommended to help people who travel regularly avoid health problems. This therapy should be learned under medical supervision, and it can also be performed at home.
Following the daily routine (*Dinacharya*) and seasonal regimen (*Ritucharya*) described in Ayurveda can certainly help prevent diseases or reduce their severity.
Do not travel on a two-wheeler immediately after eating a full meal.
After breakfast in the morning, wait at least 20 minutes before traveling by vehicle.
To strengthen the spine, practice various yoga postures under the guidance of an expert. This helps improve spinal strength.
Oil massage is also an effective preventive treatment. If it is not possible to massage the back every day, do it at least twice a week.
For massage, use sesame oil, castor oil, coconut oil, Nirgundi oil, or Mahanarayan oil.
People who travel daily by two-wheeler should swim at least once a week as a form of exercise.
Since a two-wheeler is not enclosed, a large amount of polluted air enters the lungs. Therefore, wearing a mask is essential. Also, before setting out on a journey, apply coconut oil inside the nostrils so that dust does not easily enter through the nose.
People who travel by vehicle are often under mental stress. Therefore, studying spirituality and practicing Shavasana (Corpse Pose) are beneficial for increasing mental strength.
People who travel more than 20 kilometers daily by two-wheeler should consult an Ayurvedic expert regarding appropriate diet, lifestyle, and medicines.
In general, regular consumption of Chyawanprash, cow's ghee, milk, Shatavari, Ashwagandha, Kavach Beej (Mucuna seed), and Amla under medical supervision can certainly make daily travel by two-wheeler more comfortable.

Comments