The Lucky People on Earth
- Satish Shindadkar
- Aug 6
- 3 min read
पृथ्वीवरील भाग्यवान लोक
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ज्या व्यक्तींना अजून पर्यंत कोविड 19 झालेला नाही अशांना पृथ्वीवरील भाग्यवान लोक अशी उपमा देऊन काही महत्त्वपूर्ण माहिती बघू या - - -
खरोखरच इतक्या मोठ्या महामारीच्या कालखंडामध्ये ज्यांना अद्यापपर्यंत SARS Cov 2 ची लागण झालेली नाही ते पृथ्वीवरील सर्वात भाग्यवान लोक आहेत असे माझे म्हणणे आहे
कारण - - -
ज्यांना हा आजार होऊन गेलेला आहे आणि जे आज या सृष्टीत जीवनाचा आनंद घेत आहेत त्यांच्या अनेक अवयवांवर अनारोग्य कर परिणाम झालेले दिसून येत आहेत - - -
शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणामांसोबत मानसिक स्वास्थ्य देखील बिघडत चालले आहे
अनेक रुग्ण की ज्यांना सौम्य लक्षणे होती आणि कधीही रुग्णालयात भरती करण्याची गरज पडलेली नाही अशा रुग्णांना देखील दीर्घकालीन परिणामांमध्ये थकवा येणे - - - थोड्या श्रमाने देखील श्वास लागणं - - - वारंवार खोकला - -- अंगदुखी - - सांधेदुखी - - दृष्टीदोष तोंडाची चव जाणं - - कधीकधी वास न येणं ही लक्षणे दिसून येत आहेत
मानसिकदृष्टय़ा ताणतणाव सहन न होणं - - -चिडचिड आणि नैराश्य देखील सापडत आहेत - - - म्हणून ज्यांना या अगोदर हा त्रास होऊन गेलेला आहे - - - भलेही तो सौम्य प्रमाणात असेल पण त्यांनी आता पुढील आयुष्यात काही काळापर्यंत आपले दैनंदिन नियोजन करताना छोट्या छोट्या विश्रांतीला महत्त्व द्यावे
पूर्वीप्रमाणे कामाचे सातत्य न ठेवता थोड्या थोड्या वेळात किंवा कामाचे विभाजन करून छोट्या छोट्या विश्रांतीला महत्त्व द्यावे
अनेक व्यक्तींना स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांना देखील सामोरं जावं लागू शकतं म्हणून कोणत्याही स्वरुपाची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा
कोविड संदर्भातील मूलभूत सुरक्षा नियमांचे पालन करून - - - कोणतेही व्हायरल संक्रमण होऊ नये असा प्रयत्न करावा - - यासाठी मास्क वापरणे आणि लस घेणे हेच महत्त्वपूर्ण आहे
आपल्या आरोग्याची बारकाईने निरीक्षण करून वेळोवेळी हितकर आहार आणि व्यायाम करून निरोगी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा
जे व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात असतात त्यांनी त्यांना स्वत: ला कोणताही संसर्ग होणार नाही या बाबतीत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे
चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका आणि अशी माहिती पसरवू नका
सुरक्षित राहा आनंदी राहा
The Lucky People on Earth
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today, let us look at some important information by referring to those people who have not yet had COVID-19 as the lucky people on Earth - - -
Truly, during such a major pandemic period, those who have not yet been infected with SARS Cov 2 are, in my opinion, the luckiest people on Earth
Because - - -
Among those who have had this illness and who are enjoying life in this world today, unhealthy effects are being seen on many of their organs - - -
Along with adverse effects on physical health, mental health is also deteriorating
Many patients who had mild symptoms and never needed to be admitted to the hospital are also experiencing long-term effects such as fatigue - - - shortness of breath even with slight exertion - - - frequent coughing - -- body aches - - joint pain - - vision problems, loss of taste - - and sometimes loss of smell
Mentally, inability to tolerate stress - - - irritability and depression are also being found - - - Therefore, those who have previously gone through this illness - - - even if it was mild, should now, for some time in the future, give importance to taking short breaks while planning their daily routine
Instead of maintaining the same continuity of work as before, they should work in shorter intervals or divide their work and give importance to taking short breaks
Many people may also have to face serious illnesses such as stroke, so if any kind of symptoms appear, they should immediately seek medical advice
By following the basic COVID-related safety rules - - - try to avoid any viral infection - - for this, wearing a mask and getting vaccinated are the most important measures
By closely monitoring your health and maintaining a healthy diet and exercising from time to time, try to live a healthy life
People who are in contact with patients must be extremely vigilant to ensure that they themselves do not become infected
Do not believe incorrect information, and do not spread such information
Stay safe, stay happy

Comments