top of page
logo.png

The emotion that needs to be restrained is jealousy.

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 5
  • 3 min read

रोखण्याची गरज असणारी संवेदना म्हणजे इर्षा

 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या संवेदनांच्या दोन प्रकारांपैकी

ज्या संवेदना मनुष्याला निर्माण झाल्या असता

रोखणे अत्यंत गरजेचे असते त्यामध्ये

मानसिक संवेदनांमध्ये लोभ

शोक        भय        क्रोध

अहंकार          निर्लज्जता         इर्षा

अति राग इत्यादींचा समावेश होतो

मनुष्याला अनेक प्रकारच्या संवेदना निर्माण होत असतात

जो व्यक्ती सजीव आहे

त्यास संवेदना निर्माण होणे साहजिकच आहे आणि

शरीरात अशा काही संवेदना आहेत की ज्या

रोखणं गरजेचं आहे

अन्य काही संवेदना जसे भूक लागणे

मलमूत्र त्याग करण्याची संवेदना    इत्यादी संवेदना

आपल्याला रोखून ठेवणं घातक असतं परंतु

काही अशा संवेदना आहेत की ज्या रोखणं अत्यंत गरजेचं असतं

त्यापैकी मानसिक

वाचीक आणि शारीरिक अशा तीन प्रकारच्या संवेदना आहेत की

ज्या मनुष्याने व्यक्त करायच्या नसतात

त्या रोखूनच धरणे मनुष्याच्या हिताचे असते. 

त्यापैकी मानसिक संवेदनांमध्ये इर्षा हा एक प्रकार येतो

आयुर्वेदानुसार इर्षा ही संवेदना मनुष्याने व्यक्त करायची नसते

जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या पेक्षाही अधिक दुसऱ्याकडे आहे

असे समजते त्यावेळेला ईर्षा निर्माण होऊ शकते

आपल्यापेक्षा अधिक धन

अधिक ज्ञान

अधिक संपत्ती जर दुसऱ्याकडे असेल तर

त्याच्या प्रती ईर्षा ही निर्माण होत असते

कोणाच्या प्रति ईर्षा निर्माण होत असेल तर त्यासाठी

आत्मबल सुयोग्य रीतीने आपण तयार करणे गरजेचे आहे

आत्मबल जर प्रबळ असेल तर आपण आपल्यापेक्षा

अधिक संपत्ती ज्ञान इत्यादी असणाऱ्यांच्याकडे बघून

त्यांच्यासारखे होण्याची जर इच्छा निर्माण होऊन

त्याकडे आपली वाटचाल होऊ शकते

इच्छा मनुष्याला एखाद्या वाळवी सारखी पोखरून टाकते आणि

असफलतेची मालिका पुढील आयुष्यामध्ये सुरू होते म्हणून

दुसऱ्याच्या उन्नतीत देखील

आपली उन्नती कशी होऊ शकेल याचे ज्ञान

करून त्या संदर्भात वाटचाल केल्यास

निश्चितच आपण देखील यशाची शिखरे निर्माण करू शकतो

आत्मबल उत्तम करण्यासाठी

ब्राह्मी 

शंखपुष्पी

अश्वगंधा इत्यादी अनेक औषधी वैद्यकीय सल्ल्याने

सेवन केल्यास त्याचे उत्तम गुण प्राप्त होतात

 

 

 

The emotion that needs to be restrained is jealousy.

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today, we will discuss one of the two types of emotions described in Ayurveda—those emotions that are extremely important for a person to restrain. Among the mental emotions are greed, grief, fear, anger, ego, shamelessness, jealousy, excessive attachment, and so on.

 

Human beings experience many kinds of emotions. Anyone who is alive naturally experiences emotions. There are certain bodily urges that should not be suppressed, while some emotions should be. For example, suppressing urges such as hunger or the urge to urinate or defecate is harmful. However, there are certain emotions that are very important to restrain. These are of three types: mental, verbal, and physical—emotions or expressions that a person should not express. Keeping them under control is beneficial.

 

Among the mental emotions is jealousy.

 

According to Ayurveda, jealousy is an emotion that a person should not express. Jealousy can arise when someone feels that another person has more than they do. If someone else has more wealth, more knowledge, or greater prosperity than we do, jealousy toward that person may arise.

 

If jealousy arises toward someone, it is important to properly develop inner strength. If your inner strength is strong, then instead of feeling jealous of those who have greater wealth, knowledge, or other advantages than you, you can develop the desire to become like them and move in that direction.

 

Jealousy eats away at a person like termites and begins a chain of failures in life. Therefore, by understanding how another person's progress can also contribute to your own growth and moving forward accordingly, you too can certainly achieve great success.

 

To strengthen inner resilience, herbs such as Brahmi, Shankhapushpi, Ashwagandha, and many others can provide excellent benefits when taken under medical guidance.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page