top of page
logo.png

The Ayurvedic Concept of Incompatible Foods

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 6
  • 5 min read

आयुर्वेदाची विरुद्ध अन्न संकल्पना

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या विरुद्ध अन्न संकल्पने विषयी बघणार आहोत - - - -

आहार कोणता असावा ???   कसा असावा //// कोणत्या ऋतूमध्ये काय खावे ????    काय खाऊ नये ???  याबद्दल आपण काळजी घेत असतो

परंतु नेहमी आहारामध्ये असणाऱ्या - - - - अनेक गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध असतात

आणि ते आपल्याला माहित देखील नसते

आयुर्वेदामध्ये या परस्पर विरुद्ध द्रव्यांबद्दल - - - सखोल अशी माहिती उपलब्ध आहे

काही वेळेस आहार किंवा अन्न युक्तीने न घेतल्यास ते विषाप्रमाणे मारक होऊ शकते

म्हणून आपण कोणते दोन खाद्यपदार्थ एकाच वेळेला खायला हवेत किंवा खाऊ नयेत या विषयी बघणार आहोत

कोणत्याही दोन वस्तू एकत्र केल्यानंतर त्यातले गुण वाढतात किंवा ते विरुद्ध देखील होऊ शकतात

तर आपण आज अशा काही नेहमी सेवन करण्यात येणाऱ्या विरुद्ध पदार्थांच्या बद्दलची माहिती घेणार आहोत

一. आंबट पदार्थ किंवा आंबट फळ हे दुधासोबत एकत्र करून सेवन करू नये ते विरुद्ध अन्न ठरते

二. मटकी / / कुळीथ // वाल // वाटाणे हे सुद्धा दुधासोबत सेवन करू नये

三. हिरवा मुळा आणि दूध एकत्र करून किंवा आहारात एका वेळी सेवन करू नये

四. मुळा आणि उडदाची डाळ आहारात एका वेळी सेवन करू नये

五. लोणी आणि मुळा एका वेळी सेवन करू नये

六. उडीद आणि दूध एकत्र सेवन करू नये

七. दूध आणि मासे एकत्र सेवन करू नये

八. मध आणि तूप समान प्रमाणात एकत्र सेवन करू नये

九. खिचडी आणि दूध एकत्र सेवन करू नये

十. दही गरम करून सेवन करू नये

十一. तेलकट तुपकट आहार सेवन केल्यानंतर त्यावर थंड पाणी सेवन करू नये ते विरुद्ध ठरतं या ऐवजी कोमट पाणी सेवन करावे

十二. गुळ आणि मध एकत्र सेवन करू नये

十三. दूध आणि मीठ एकत्र सेवन करू नये

十四. अति बोलण्याचे श्रम झाल्यानंतर लगेच भोजन करू नये म्हणजे जे व्यक्ती शाळेमध्ये किंवा ट्युशन घेत असतील - - - -  त्यांनी लेक्चर झाल्यानंतर लगेच जेवायला बसू नये मध्ये वीस मिनिटांचे अंतर ठेवावे अन्यथा आवाज बसतो किंवा आवाजात बदल होतो / / / / आवाज विकृत होतो

十五. श्रम करून आल्यानंतर लगेच भोजन करू नये

十六. दही ताक यांच्यासोबत केळी सेवन करू नये

十七. दुधात शिजवलेला भात म्हणजेच खीर आणि कोबी एकत्र सेवन करू नये

十八. अर्धवट शिजवलेले धान्य किंवा कच्चे धान्य आणि शिजवलेले पदार्थ एकत्र करून सेवन करू नये

असे अनेक प्रकारचे विरुद्ध अन्न  आपण अनावधानाने म्हणजेच आपल्याला माहिती नसल्यामुळे सेवन करीत असतो आणि अनेक विकार उत्पन्न होतात

यात प्रामुख्याने त्वचा विकार / / / मधुमेह / / / अंगावर कोड येण / / / सूज येणे / / / टीबी / / / वाताचे अनेक विकार / / / मुतखडा / / / मुळव्याध इत्यादी उत्पन्न होतात

तसेच मनुष्याचे तेज / /  शक्ती / / स्मरणशक्ती आणि बुद्धी यावर देखील विपरीत परिणाम होतो

जो मनुष्य नियमित व्यायाम करतो - -  नियमित पौष्टिक आहार घेतो आणि ज्याला भूक चांगली लागते आणि तसेच त्याची प्रतिकार क्षमता उत्तम असते अशा व्यक्तीला विरुद्ध आहाराचा त्रास कमी होतो परंतु अपथ्यकर पदार्थ हे शेवटी विष समानच असतात म्हणून त्या पदार्थांचा त्याग करणं सर्वश्रेष्ठ आहे

विरुद्ध अन्न हे एक प्रकारचे स्लो पॉयझनिंग आहे

म्हणून प्रत्येकाने विरुद्ध अन्न काय आहे हे समजून - - -    त्याप्रमाणे वर्तणूक केल्यास निश्चितच निरोगी दीर्घायुष्य लाभणं सहज शक्य आहे

 

 

The Ayurvedic Concept of Incompatible Foods

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at the concept of incompatible foods described in Ayurveda.

What should our diet be like???   How should it be //// What should we eat in which season ????    What should we not eat???  We are usually careful about these things.

 

However, many things that are commonly included in our diet are incompatible with each other.

 

And we may not even know it.

 

Ayurveda provides detailed information about these mutually incompatible substances.

 

Sometimes, if food is not consumed properly or wisely, it can become as harmful as poison.

 

So today we are going to see which two food items should or should not be eaten together at the same time.

 

When any two things are combined, their qualities may increase, or they may become incompatible.

 

So today we are going to learn about some commonly consumed incompatible food combinations.

 

一.Sour foods or sour fruits should not be consumed together with milk; this is considered incompatible food.

 

二.Moth beans / / horse gram // hyacinth beans // peas should also not be consumed with milk.

 

三.Green radish and milk should not be consumed together or at the same meal.

 

四.Radish and black gram lentils should not be consumed at the same meal.

 

五.Butter and radish should not be consumed at the same time.

 

六.Black gram and milk should not be consumed together.

 

七.Milk and fish should not be consumed together.

 

八.Honey and ghee should not be consumed together in equal quantities.

 

九.Khichdi and milk should not be consumed together.

 

十.Yogurt should not be consumed after heating it.

 

十一.After consuming oily or ghee-rich food, cold water should not be consumed afterward; this is considered incompatible. Instead, lukewarm water should be consumed.

 

十二.Jaggery and honey should not be consumed together.

 

十三.Milk and salt should not be consumed together.

 

十四.One should not eat immediately after straining the voice by excessive talking. That means people who teach in schools or conduct tuition classes - - - -  should not sit down to eat immediately after a lecture. There should be a gap of twenty minutes; otherwise, the voice becomes hoarse or changes / / / / the voice becomes distorted.

 

十五.One should not eat immediately after strenuous physical work.

 

十六.Bananas should not be consumed with yogurt or buttermilk.

 

十七.Rice cooked in milk, that is, kheer, and cabbage should not be consumed together.

 

十八.Half-cooked grains or raw grains and cooked foods should not be consumed together.

 

We often consume many such types of incompatible foods unintentionally, simply because we are unaware of them, and many disorders arise as a result.

 

These mainly include skin disorders / / / diabetes / / / white patches on the skin / / / swelling / / / TB / / / many disorders related to Vata / / / kidney stones / / / hemorrhoids, etc.

 

It also has adverse effects on a person's radiance / /  strength / / memory and intelligence.

 

A person who exercises regularly - -  eats a nutritious diet regularly, has a good appetite, and also has strong immunity experiences fewer problems from incompatible foods. However, unhealthy foods are ultimately like poison, so giving them up is the best course.

 

Incompatible food is a type of slow poisoning.

 

Therefore, if everyone understands what incompatible food is - - -    and behaves accordingly, it is certainly possible to enjoy a healthy and long life.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page