Summer Coolers Traditional Drinks to Beat the Heat and Stay Healthy
- Satish Shindadkar
- Aug 6
- 5 min read
उन्हाळ्यात मी कुठले थंडपेय घेऊ
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - उन्हाळ्यामध्ये कुठले शीतपेय म्हणजेच थंड पेय घ्यायला हवेत या विषयी बघणार आहोत - - - -
पूर्वीच्या काळी उन्हातून कोणी आलं तर त्याला गुळ पाणी देण्याची प्रथा होती
आजच्या पिढीला तर ही प्रथा माहीतच नाही
तसेच कोकम सरबत / / / कैरीचे पन्हे / / / आवळ्याचा मुरब्बा / / / गुलकंद / / / लिंबू पाणी यांचा वापर पूर्वी सर्रास केला जात होता परंतु
या सर्व गोष्टी आज विसरल्या गेलेल्या आहेत आणि
त्या ऐवजी कोल्ड्रिंक्स चा बेसुमार वापर वाढलेला आहे
कोल्ड्रिंक्स मध्ये विविध केमिकल्स असतात हे सिद्ध झालेलं असलं तरी देखील सर्वच व्यक्ती त्यामागे लागलेल्या आहेत - - - असो
जुनं ते सोनं या उक्तीप्रमाणे आपण - - - - - - उन्हाळ्यात कोणती पेय पदार्थ सेवन करावी याविषयी बघू या - - - -
उन्हाळ्यामध्ये जर आपण बाहेर गेलो होतो तर उसाचा रस सहज आपल्या नजरे पुढे येतच असतो
अगदी बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच परिचित असणारा
मधुर शीत गुणाचा उसाचा रस
आपल्या शरीरात वात आणि कफ वाढवीत असतो तरी देखील
उन्हाळ्यामध्ये योग्य वेळी / / / योग्य प्रमाणात सेवन केल्यास
उष्णतेला कमी करीत असतो
उसाचा रस सेवन करावयाचा असल्यास तो शक्यतो सायंकाळी सेवन करावा
हा रस ताजाच असावा म्हणजे
रसवंती वर जाऊनच घ्यावा - - - त्याला घरी आणून घेऊ नये
उसाच्या रसामध्ये लिंबू / / आले / / अननस योग्य प्रमाणात घातलेले असल्यास आपल्या आरोग्यासाठी उत्तम असते
लिंबू सरबत - - हे पेय देखील - - - अत्यंत आरोग्यवर्धक असून - - -
आपल्या मनाचे आरोग्य / / / मुखाचे आरोग्य सुधारणारे असते
तसेच पचनशक्ती वाढवणारे असते
उन्हाळ्यात गार पाण्यासोबत बनवलेले लिंबूचे सरबत - - -
थकवा दूर करणारे असून
शरीरात क्षार आणि पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यास मदत करते
कैरीचे पन्हे - - - उन्हाळ्याच्या दिवसात शरीर आणि मनाला ताकद देणारे मिश्रण आहे साधारणतः आठवड्यातून एकदा तरी प्रत्येक व्यक्तीने आपल्या सकाळच्या आहारामध्ये अर्धा ते एक ग्लास कैरीच्या पन्ह्याचे सेवन करावे
कोकम सरबत हे देखील - - - शरीराला थंडावा आणण्यासाठी आणि शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण असते
कोकम सरबत साठी बाजारामध्ये विशिष्ट प्रिझर्वेटिव्ह टाकलेले आयते सरबत मिळते
परंतु त्या ऐवजी आमसुलाला पाण्यात भिजत घालून - - - कुस्करून ते पाणी गाळून त्यात चवीपुरता साखर मीठ इत्यादी टाकून कोकम सरबत तयार केल्यास
शरीरातील उष्णता कमी करणे
पित्त दोष कमी करणे
अन्नाची रुची वाढवणे आणि पचन क्षमता सुधारणारे ठरते
आवळ्याचे सरबत किंवा आवळ्याचा मुरब्बा - - उन्हाळ्यामध्ये उत्तम थंडावा निर्माण करण्याचं कार्य करत असतो
तसेच उत्तम टॉनिक म्हणून देखील याचा वापर उन्हाळ्यात करावा
रोजच्या सकाळच्या आहारात एक ग्लास ताक असणं हे अमृततुल्य आहे
सायंकाळी दही लावून सकाळी त्याचं ताक करून आहारामध्ये एक एक घोट सेवन केल्यास पचनशक्ती वाढवणारे ठरते
तसेच शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते
आहारात ताजे ताक हेच श्रेष्ठ असते
या सर्व थंड पेय पदार्थां व्यतिरिक्त - - -
आवळ्याचा मुरब्बा आणि गुलकंद हे उन्हाळ्यामध्ये उन्हा पासून निर्माण होणारी लक्षणे उदाहरणार्थ अंग गरम होणे - - - - सर्व अंगाची आग होणे - - - डोळ्यांची आग होणे तळहात / / तळपाय यांची आग होणे / / / ऍसिडिटी / / / गोवर / / / कांजण्या या विकारांपासून दूर ठेवण्यास निश्चित मदत करतात
अशा प्रकारे आपण उसाचा रस / / / लिंबू सरबत / / / कैरीचे पन्हे / / / कोकम सरबत / / ताक यांचा वापर उन्हाळ्यात थंड पेय म्हणून केल्यास निश्चितच आपला उन्हाळा सुखकर जाईल
Summer Coolers Traditional Drinks to Beat the Heat and Stay Healthy
When the Indian summer feels heavy, the body asks for more than cold water. It needs fluids, salts, light energy, and ingredients that feel naturally cooling. Traditional summer drinks do this beautifully, and most of them are already sitting in our kitchens.
These Summer Coolers 101 Traditional Drinks to Beat the Heat and Stay Healthy are simple, familiar, and easy to include in daily routine.
Why traditional coolers work in summer
Heat can cause sweating, tiredness, acidity, loss of appetite, and dehydration. Homemade coolers help by replacing fluids and offering gentle nutrients.
A good summer drink should be:
Light on the stomach
Not overloaded with sugar
Freshly prepared
Taken in moderate portions
Suited to your body and health needs
This article is for general information only. If you have diabetes, kidney issues, acidity, or any medical condition, check with a healthcare professional before changing your diet.
Classic Indian summer drinks worth bringing back
Jaggery water
Gul pani is made by dissolving jaggery in water. Add a pinch of salt, lemon, or roasted cumin for taste. It gives quick energy and can feel refreshing after sweating. Use it in small amounts, since jaggery is still sugar.
Kokum sharbat
Kokum is popular along the Konkan coast. Its tangy taste feels cooling and may support digestion. Mix kokum concentrate with chilled water and a little cumin. Avoid making it too sweet.
Raw mango panna
Kairi panha is a summer favourite. Raw mango, jaggery, cumin, and salt make it tasty and useful after heat exposure. Serve it diluted, not syrupy.
Amla murabba
Amla is known for vitamin C. Murabba can be eaten in small quantities, preferably in the morning. Since it is sweetened, one piece is usually enough.
Gulkand
Gulkand, made from rose petals and sugar, is traditionally used for cooling the body. A small spoon with milk or water can be soothing. Keep portions small.
Lemon water
Nimbu pani is the easiest summer drink. Lemon, water, salt, and a little sugar or jaggery make a quick homemade electrolyte-style drink.
Special summer favourites and how to drink them
Sugarcane juice is hydrating and energising. Drink it fresh from a clean source, preferably without ice from unknown water. Avoid it if you need to control blood sugar.
Lemon sherbet works well during hot afternoons. Add salt for lost minerals and keep sugar low.
Buttermilk or chaas is one of the best daily summer drinks. Add roasted cumin, ginger, coriander, and a little rock salt. It supports digestion and is lighter than curd.
FAQ
Can I drink these coolers every day?
Yes, but rotate them. Buttermilk, lemon water, and kokum sharbat are good regular options when prepared lightly.
Which drink is best after coming home from the sun?
Raw mango panna, lemon water, or salted buttermilk can help replace fluids and salts.
Are homemade coolers better than packaged soft drinks?
Usually, yes. Homemade drinks let you control sugar, salt, and freshness.
Can children have these drinks?
Most can, in small portions. Keep spices mild and avoid excess sugar.
A simple summer takeaway
This summer, try replacing one packaged drink with a homemade cooler. Start with nimbu pani or chaas, then bring in kokum, panha, gulkand, and amla as variety. Your body will thank you for the hydration, and your taste buds will enjoy the tradition.

Comments