Strengthen the knees and joints
गुडघे आणि सांध्यांना आणा बळकटी
पूर्वी 60 नंतर वाताचे विकार प्रामुख्याने
गुडघेदुखी
कंबरदुखी
संधिवात
आमवात इत्यादी होत असत
साठी नंतरचे आरोग्य असे सदर वर्तमान पत्रात चालत असत
त्यानंतर काही काळाने पन्नाशीचे नंतरचे आरोग्य असे सदर दिसत असत आणि आता
आता वय कमी कमी होऊन चाळीशी नंतरचे आरोग्य इथपर्यंत आलेल आहे म्हणजे गुडघे आणि अन्य सांध्यांचे आजार चाळिशीत सुरू झालेले आहेत किंबहुना
अनेकांना ३० नंतर सुद्धा हे आजार किंवा लक्षण दिसू लागलेली आहेत म्हणून
मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आजच्या या व्हिडिओमध्ये
सांध्यांना बळकटी आणण्यासाठी आपण काय करायला हवं ?
याबद्दल बघणार आहोत
गुडघे
पायाचे घोटे
कंबर
ही प्रमुख सांधे असून
संपूर्ण शरीराचा भार पायाचे घोट्यांवर पडत असतो
तर सर्वात जास्त हालचाल उपयोग - - - गुडघ्यांचाच होत असतो
जे व्यक्ती शारीरिक श्रम अधिक करतात त्यांच्यासाठी गुडघे
कंबर या सांध्यांचा अधिक वापर होत असतो
कामांचे स्वरूपानुसार विविध सांध्यांचा कमी अधिक प्रमाणात वापर होत असतो.
दोन सांध्यांच्या मध्ये - दोन सांध्यांचे एकमेकांसोबत घर्षण होऊ नये म्हणून त्यांच्यात एक प्रकारचा चिकट द्रव असतो ज्याला
वंगण किंवा गादी असे बोली भाषेत बोलले जाते.
यामुळे सांधे झिजत नाहीत परंतु अति व्यायाम
कोरडा आहार
सोडा
मीठ
तिखट इत्यादी जीवनशैलीमुळे वातदोष वाढून ते वंगण कोरडे होते म्हणजेच
त्यातील स्निग्धता कमी होते आणि सांधे एकमेकांवर घासले जाऊ शकतात
तेथे स्थानिक सूज येते
दुखणे सुरू होते
काही व्यक्ती शरीराची हालचाल होऊच देत नाहीत फक्त बसून राहतात
कोणताही व्यायाम नसल्याने देखील त्यांचे सांधे जखडू शकतात
कारण कोणतेही असो शरीरातील सांधे उत्तम रहावेत विशेषत:
गुडघे उत्तम रहावेत असे सर्वांना वाटत असते / / / नुसते वाटणे याला महत्त्व
नाही तर त्याचे काही नियम आहेत ते पाहू या आणि
आचरणात आणू या - - -
सांधे उत्तम राहण्यासाठी प्रथम व्यायाम पाहू या.
ज्यावेळी कोणताही
त्रास नसतो त्यावेळेला तज्ञांच्या देखरेखी खाली
योगासन
पायी फिरणे
पोहणे हे व्यायाम करावेत
आपल्याला कोणत्यातरी मैदानी खेळात जावे असे वाटत असेल त्यावेळेला
फुटबॉल
क्रिकेट इत्यादी मध्ये करिअर करावेसे वाटत असेल तर त्या
पद्धतीने जीम लावणे इत्यादी व्यायाम करावेत आणि
सर्वसामान्यां प्रमाणे जीवन जगणे असेल तर जिमची गरज नाही
रोज सकाळी दहा मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे
उत्तम आहाराच्या बाबतीत कॅल्शियम
आयर्न कमी होणार नाही असे बघावे
सर्व प्रकारच्या चवींचा म्हणजे गोड आंबट
खारट तिखट
कडू तुरट आहार सेवन करायला हवा
काही व्यक्तींचे आवड म्हणून तिखट पदार्थच असतात
काहींना गोडच अधिक प्रमाणात आवडत असते आणि ते तसेच सेवन करत असतात
हे चुकीचं आहे
बेकरीचे पदार्थ सोडा शिळे पदार्थ वर्ज्य करावेत
आहाराच्या वेळा सकाळी नऊ ते दहा
सायंकाळी सहा ते सात या दरम्याने असाव्यात
आपल्या कामकाजाच्या स्वरूपावरून सकाळी न्याहारी
दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण असे तीन वेळा
आहार ठरू शकतात जसे शेतात काम करणारे
श्रमाचे काम करणारे कर्मचारी इत्यादींसाठी हे आवश्यकच आहे अन्य
श्रम नसणाऱ्यांनी
दोन वेळा आहार घ्यावा
सकाळचा आहार आणि सायंकाळच्या आहारात किमान सहा तासांचे अंतर असावे
सायंकाळचा आहार पचायला थोडा हलका असावा
सुट्टीच्या दिवशी म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोन वेळा
संपूर्ण शरीराचे अभ्यंग करावे
वैद्यकीय सल्ल्याने स्नेहन स्वेदन म्हणजे मसाज स्टीम
वर्षभरातून दहा ते बारा वेळा करून घ्यावे.
पावसाळ्यात बस्ती ही पंचकर्म प्रक्रिया करून घ्यावी
आपल्या प्रकृतीनुसार वैद्यकीय सल्ल्याने मात्रा बस्ती शिकून घ्यावी आणि
ही बस्ती वेळोवेळी घरी देखील करता येऊ शकते.
पावसाळ्यात आणि अति थंडी असेल तेव्हा आतड्यातून वातदोष निर्मिती रोखण्यासाठी कणकेमध्ये म्हणजेच गहू ज्वारी बाजरी इत्यादींची जी कणिक असते ती मळतांना तीन लोकांसाठी अंदाजे पाच ते सहा ml एरंडेल टाकावे त्यामुळे पोळ्या भाकरी ह्या नरम तर होतातच आणि
एरंडतेलाची चव देखील लागत नाही आणि पावसाळ्यात निसर्गतः वाढलेला वात दोष जो सांध्यांचा विकार उत्पन्न करत असतो त्याची निर्मितीच होणार नाही म्हणजे आपण एरंड तेल हे सकाळच्या आहारात कणकेच्या माध्यमातून घेतले तर सांध्याच्या विकारांपासून दूर राहू शकतो.
आहारात शेवग्याच्या पानांची भाजी
गिलके दोडके भोपळा ज्वारी बाजरी
दादर पपई अननस नित्य नियमाने सेवन करावेत
आयुर्वेदिक वनस्पतींचा विचार केला असता
अश्वगंधा शेवगा निर्गुंडी इत्यादी अनेक असून त्यांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा
हे सर्व झाले सांध्यांना बळकटी आणण्याच्या दृष्टीने पण
ज्यांना सांध्यांचे विकार किंवा काही लक्षण उत्पन्न झालेले आहेत त्यांनी
तात्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार करून घ्याव्या
स्वतःच्या मनाने मेडिकल वर जाऊन पेन केलर
कॅल्शियम इत्यादींचा वापर करू नये.
तसेच अनेक वेळा कोणत्याही कोणत्यातरी लॉजवर
कोणीतरी दुसऱ्या राज्यातील बोगस वैद्य येऊन आयुर्वेदिकच्या
नावाखाली पुड्या देतो आणि त्यापुढील एकाच पुडीने बरे वाटते असे
सांगणारे महाभाग सुद्धा आपल्याला भेटतात
त्यांच्या नादी न लागता या स्टीरोईडचे सेवन करू नये हे आयुर्वेदाला बदनाम
करीत आहेत
केव्हाही रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर असणाऱ्या व्यक्तिंचाच सल्ला घ्यावा
एवढे जरी केले तरी आपले सांधे विशेषत: गुडघे बळकट बनतील आणि आपले आयुष्य सुख समाधान समृद्धीचे असेल
आपणास काही विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा
जय आयुर्वेद
Strengthen the knees and joints
Previously, after the age of 60, disorders related to Vata were predominantly
knee pain
back pain
arthritis
rheumatoid arthritis, etc.
There used to be a section in newspapers called “Health After Sixty”
After some time, sections called “Health After Fifty” started appearing, and now
now the age is getting lower and lower, and we have reached “Health After Forty,” meaning diseases of the knees and other joints have started occurring in the forties; in fact,
many people are also beginning to show these diseases or symptoms after the age of 30. Therefore,
I, Dr. Satish Vasant Shindadkar, in today's video,
what should we do to strengthen the joints?
We are going to look at this.
Knees
ankles
waist
these are the major joints, and
the entire weight of the body falls on the ankles,
while the greatest amount of movement and use occurs in the knees.
For people who do more physical labor, the knees
and waist joints are used more.
Depending on the nature of the work, different joints are used to a greater or lesser extent.
Between two joints - to prevent the two joints from rubbing against each other, there is a kind of viscous fluid between them, which
is colloquially called lubricant or cushioning.
Because of this, the joints do not wear out, but excessive exercise,
a dry diet,
soda,
salt,
spicy foods, etc., due to lifestyle, increase the Vata imbalance and this lubricant becomes dry, meaning
its lubrication decreases, and the joints can rub against each other.
There is local swelling there.
Pain begins.
Some people do not allow their bodies to move at all and simply remain seated.
Their joints can also become stiff due to a lack of any exercise.
Whatever the reason, everyone wants the joints in the body to remain healthy, especially
the knees to remain healthy. / / / Merely wanting it is not important
but there are some rules for it. Let us see them and
put them into practice - - -
To keep the joints healthy, let us first look at exercise.
When there is no
discomfort, under the supervision of experts,
yoga postures
walking
swimming should be done as exercise.
If you feel like taking up some outdoor sport, and if you want to pursue a career in
football
cricket, etc., then exercise such as joining a gym should be done in that
manner, and
if you want to live life like an ordinary person, there is no need for a gym.
Every morning, sit in the gentle sunlight for ten minutes.
Regarding a good diet, make sure that calcium
and iron do not become deficient.
All kinds of tastes, namely sweet, sour,
salty spicy
bitter astringent, should be consumed in the diet.
Some people, simply because they like it, eat only spicy foods.
Some people like sweets in greater quantities and continue consuming them that way.
This is wrong.
Bakery products soda stale foods should be avoided.
Meal times should be between 9 and 10 in the morning
and between 6 and 7 in the evening.
Depending on the nature of our work, breakfast in the morning,
lunch in the afternoon, and dinner in the evening—three meals
may be appropriate, such as for people working in fields
or employees doing physical labor, etc., this is necessary. For those who do not engage in
physical labor,
they should eat twice a day.
There should be at least six hours between the morning meal and the evening meal.
The evening meal should be somewhat light and easy to digest.
On a holiday, that is, once or twice a week,
the entire body should be massaged with oil.
On medical advice, oleation and sudation, meaning massage and steam,
should be done ten to twelve times throughout the year.
During the rainy season, the Basti Panchakarma procedure should be undertaken.
According to your constitution, with medical advice, learn Matra Basti and
this Basti can also be done at home from time to time.
During the rainy season and when there is extreme cold, to prevent the production of Vata imbalance in the intestines, while kneading the dough, that is, the dough made from wheat, sorghum, pearl millet, etc., add approximately five to six ml of castor oil for three people. This makes the rotis and bhakris soft, and
the taste of the castor oil is also not noticeable, and the Vata imbalance that naturally increases during the rainy season and causes joint disorders will not be produced in the first place. In other words, if we consume castor oil through the dough as part of the morning meal, we can stay away from joint disorders.
In the diet, vegetables made from drumstick leaves,
ridge gourd sponge gourd pumpkin sorghum pearl millet
dadar papaya pineapple should be consumed regularly.
Considering Ayurvedic herbs, there are
ashwagandha drumstick nirgundi, etc., among many others, and they should be used only with medical advice.
All this has been regarding strengthening the joints, but
those who have developed joint disorders or any symptoms should
immediately seek medical advice and undergo treatment.
Do not go to a medical store on your own and use painkillers,
calcium, etc.
Also, many times, at some lodge,
a bogus practitioner from another state comes and gives packets in the name of Ayurveda, and there are also such great people among us who say that they feel better after taking just one of those packets.
Do not fall for them and do not consume these steroids; they are defaming Ayurveda.
At all times, consult only people who are registered medical practitioners.
Even if you do just this much, your joints, especially your knees, will become strong, and your life will be full of happiness, satisfaction, and prosperity.
If you want videos on any topics, definitely comment, and also tell us how you liked this video.
Jai Ayurveda


Comments