top of page
logo.png

Seven vegetarian foods that bring serious protein

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 5 min read

शाकाहारी नॉनव्हेज

शाकाहारी नॉनव्हेज हे शीर्षक बघून आपणास सर्वांना आश्चर्य वाटले असेल तर नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत

आपल्याकडे शाकाहार आणि मांसाहार करणारे असे जे दोन प्रकारचे लोक आहेत - - - त्यांच्यात अनेक प्रकारचे समज आणि गैरसमज आहेत - - - मांसाहार करून खूप ताकद मिळते - - खूप प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आपल्याला मिळतात आणि शाकाहारी लोकांना तशी प्रथिनं मिळत नसल्यामुळे ते कसे तंदुरुस्त राहतील - - - असा त्यांचा प्रश्न असतो - - - मांसाहार करून आम्हाला ताकद मिळते - - - तर घासपूस – गवत – पाला   खाऊन या शाकाहारी लोकांना काय ताकद मिळणार ??? असा प्रश्न ते सतत व्यक्त करत असतात

अनेक वेळेला शाकाहारी व्यक्ती आजारी पडल्यानंतर ताकद येण्यासाठी इच्छा नसतानाही मांसाहाराचे सेवन करतात - - - - - तर मग आजच्या या भागात प्रथीनं म्हणजेच प्रोटीनने भरपूर असणारे - - - - आणि मांसाहारापेक्षाही अधिक शक्ती प्रदान करणारे - - -जे पदार्थ आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत - -

1. सोयाबीन - - सोयाबीन हे धान्य असे आहे की ज्यामध्ये प्रथिनांची मात्र भरपूर आहे सोबत लोह कॅल्शियम मॅग्नेशियम देखील आहे - - - सोयाबीनच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते - - - वाढलेला रक्तदाब कमी होतो - - - - कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होते- - -  सोयाबीनची उसळ - - - सोयाबीनची भाजी - - - पुलाव मध्ये सोयाबीन इत्यादी याच्या रेसिपी आहेत. - - -  सोया पनीर म्हणजेच हे अतिशय पौष्टिक प्रथिनांनी परिपूर्ण असून पुलाव - - - बिर्याणी - - - पराठे - - - करी - इत्यादी अनेक प्रकारांमध्ये वापरले जातात - - -  प्रामुख्याने पनीर प्रमाणेच याची भाजी आपल्याकडे बनविले जाते

2. मसूर - - - मसूर ची उसळ - -  मसूर ची आमटी आणि कोणत्याही भाजीमध्ये मसूर डाळ घालून तयार केलेली भाजी - - - ही स्वादिष्ट आणि शरीरासाठी उपयुक्त असते - -  यामुळे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते - - लोह - - - मॅग्नीज यासारखे घटक आणि प्रथिनांनी परिपूर्ण असते

3. हिरवे वाटाणे - - - प्रथिनांनी भरपूर - - विटामिन ए - सी - के - फायबरयुक्त - लोह - मॅग्नेशियम - जस्त - तांबे अधिक प्रमाणात असून - - - कोलेस्ट्रॉल वाढू देत नाही - - हृदय संबंधित समस्या उद्भवत नाही - - वजन देखील कमी होते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते - - याची उसळ - - पॅटीस - - पुलाव बिर्याणी इत्यादी अनेक प्रकार केले जाऊ शकतात - - याची रस्सा भाजी देखील प्रसिद्ध आहे

4. खसखस - - -  आपण नेहमी दिवाळीत अनारसें सोबत खसखस खात असतो - - - ही खसखस दुधातून पेस्ट करून देखील वापरली जाऊ शकते - - - अधिक प्रमाणात प्रथिने म्हणजेच प्रोटिन्स असणारी खसखस शरीरास ताकद देणारी - - - हाड मजबूत करणारी असते

5. ओटस् - - - हे देखील प्रथिनांनी भरपूर ---- असून मॅग्नेशियम -- झिंक ---- फॉस्फेट ----   -- फॉस्फरस देखील यात प्रमाण भरपूर असते - - - - याचा उपमा डोसे आणि दुधासोबत सेवन केले जाऊ शकते

6. राजगिरा - - - लाडू आणि याच्या लाह्या उपवासामध्ये सेवन केल्या जातात - - - यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिन असतात - - - तसेच लोह कॅल्शियम देखील असते  ---   रक्त वाढण्यासाठी तसेच हाडांमधील कॅल्शियम चे प्रमाण उत्तम राहण्यासाठी - - - -   सोबत वजन वाढू नये यासाठी राजगिरा उत्तम असतो - - - - - राजगिऱ्याची चिक्की -- लाडू --  वडी --  लाह्या दुधातून सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम असते

7. प्रथीन युक्त सर्व भाज्या आणि फळे आपल्या अन्नात म्हणजेच आहारात सर्व प्रकारच्या फळांचा सर्व प्रकारच्या भाज्यांचा सेवन हे आवश्यक असते सर्व प्रकारचे फळ आणि सर्व प्रकारच्या भाज्या शरीरासाठी उपयुक्त असतातच त्या प्रथिनाशिवाय विटामिन फॉस्फरसिंक इत्यादी अनेक पदार्थ शरीराला देत असतात सर्वात जास्त प्रथिन असणारी फळे म्हणजे आवळा पेरू संत्री स्ट्रॉबेरी केळी हे असून सर्वाधिक प्रथिन असणाऱ्या भाज्या म्हणजे पालक शतावरी बटाटे रताळी ब्रोकोली सर्व प्रकारच्या कोबी इत्यादी असतात तसेच सर्व प्रकारच्या डाळी प्रामुख्याने काबुली चना ड्रायफ्रूट्स मध्ये काजू बदाम अक्रोड हे सुद्धा प्रथिनांनी परिपूर्ण असतात

अशा प्रकारे आपण प्रथिनांनी परिपूर्ण असणारा आहार घेतला तर तो निश्चितच शाकाहारी नॉनव्हेज ठरू शकतो

 

 

 

7 Protein Rich Vegetarian Foods That Rival Meat and Bust Common Diet Myths

The idea that vegetarian food is “light” or “low in protein” is one of the most stubborn diet myths. Meat is a dense protein source, but it is not the only way to build a strong, balanced plate. Many plant foods bring protein along with fibre, minerals, antioxidants, and heart-friendly nutrients.

The key is variety. A vegetarian diet that includes dals, pulses, grains, seeds, vegetables, curd, paneer, nuts, and sprouts can support everyday health well. This article is for general information, not medical advice.

Vegetarian and non-vegetarian diets are often misunderstood

A non-vegetarian meal is not automatically healthier, and a vegetarian meal is not automatically balanced. Fried snacks, refined flour, and sugary foods can be vegetarian, but they do not make a nourishing diet.

On the other hand, plant-based proteins often offer fibre, which meat does not. They also tend to support digestion and may help with steadier energy through the day. The goal is not to prove one diet “wins”, but to understand that vegetarian protein can be powerful when planned well.

Seven vegetarian foods that bring serious protein

1. Soybeans

Soybeans are among the richest plant proteins and contain all essential amino acids. They also provide iron, calcium, and healthy fats.

Try them as:

Soya chunks curry

Tofu bhurji

Soybean sundal

Stir-fried tofu with vegetables

2. Lentils

Lentils, or dals, are a daily protein hero in Indian kitchens. Masoor, moong, toor, urad, and chana dal all offer protein, fibre, folate, and minerals.

Use them in:

Dal tadka

Khichdi

Sambar

Sprouted moong salad

Pairing dal with rice or roti improves the overall amino acid balance.

3. Green peas

Green peas are more than a side vegetable. They contain protein, fibre, vitamin C, vitamin K, and B vitamins.

Add them to poha, upma, pulao, parathas, soups, and mixed vegetable sabzis. They support fullness and bring natural sweetness without heavy cooking.

4. Poppy seeds

Poppy seeds, or khus khus, contain protein, healthy fats, calcium, magnesium, and zinc. Since they are usually eaten in small amounts, treat them as a nutrient booster, not a main protein source.

Use them in gravies, chutneys, korma pastes, or traditional sweets in moderation.

5. Oats

Oats are known for soluble fibre, but they also provide decent protein, manganese, magnesium, and slow-release carbohydrates.

Simple ways to eat oats:

Masala oats with vegetables

Overnight oats with curd and fruit

Oats dosa

Oats porridge with nuts and seeds

6. Amaranth

Amaranth, also called rajgira, is rich in protein and especially valued for its calcium content. It is naturally gluten-free and works well during fasting meals too.

Try rajgira rotis, laddoos, porridge, or popped amaranth mixed with nuts.

7. Other protein-rich vegetables and fruits

Some fruits and vegetables add useful protein along with vitamins and antioxidants.

Good examples include:

Spinach, rich in iron, folate, and plant compounds

Broccoli, with fibre, vitamin C, and minerals

Mushrooms, useful for texture and B vitamins

Guava, a fruit with fibre and vitamin C

Jackfruit seeds, often boiled or roasted, with starch and protein

FAQ

Can vegetarian protein really rival meat?

Yes, when meals are varied and well planned. Soy, dals, legumes, dairy, grains, nuts, and seeds together can provide strong protein coverage.

Is soy safe to eat regularly?

For most people, moderate amounts of soy foods such as tofu, soybeans, and soya chunks are safe. Anyone with thyroid concerns or allergies should speak with a doctor.

What is the best vegetarian protein for daily Indian meals?

Dal is one of the easiest daily choices. Combine it with rice, roti, curd, vegetables, or sprouts for a more balanced meal.

The takeaway

Vegetarian protein is not second-grade nutrition. Foods like soybeans, lentils, peas, oats, amaranth, seeds, and protein-rich vegetables can make meals filling, practical, and nourishing. Build your plate with variety, and plant-based eating can stand confidently beside meat-based diets.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page