top of page
logo.png

Psoriasis: An Ayurvedic Perspective

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 11
7 min read

Updated: 2 days ago


सोरायसिस आयुर्वेद दृष्टिकोन

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - -  आज आपण सोरायसिस या त्वचा विकाराच्या संदर्भात बघणार आहोत - - - - -

आपल्या शरीराचे संरक्षणात्मक आवरण म्हणजे त्वचा --- आणि या आवरणाद्वारे

शरीरातील नको असणारी मलद्रव्य घामावाटे बाहेर टाकली जाऊन --- 

शरीराचे तापमान योग्य राखण्याचे कार्य त्वचा करत असते

सुंदर निरोगी त्वचा आपल्या स्वास्थ्याचा आरसाच असतो

आयुर्वेदानुसार त्वचा एकूण सात स्तरांची बनलेली असते

आयुर्वेदामध्ये कोणत्याही प्रकारचा त्वचा विकार असो त्याला - - -  

कुष्ठ या नावाने ओळखले जाते

आपण व्यवहारांमध्ये लेप्रसीला कुष्ठ असे म्हणत असतो परंतु

आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने त्वचेचे सर्व विकार कुष्ठ या शब्दाच्या अंतर्गत येत असतात

त्वचेवर डाग असणं

त्वचा कोरडी पडणं

त्वचेवर खाज / / फोड / / पुरळ इत्यादी काहीही निर्माण होणं इ.

त्वचा विकारांचे अनेक प्रकार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे

याच्या कारणांमध्ये साधारणतः - - -

विरुद्ध अन्नपान

विविध संवेदनांना रोखणं जसं लघवी लागलेले असताना - - न जाणे

पोट साफ होण्याची संवेदना झालेली असतानाही -- मल रोखून धरणे

शिंक रोखून धरणे इत्यादींचा समावेश होतो तसेच

भोजनानंतर लगेच भोजन

भोजनानंतर लगेच व्यायाम

नेहमी उष्णतेच्या संपर्कात राहणे

शीत वातावरणातून उष्ण वातावरणात किंवा

उष्ण वातावरणातून लगेच शीत वातावरणात येणे जसे

एसी मधून लगेच उन्हात जाणे किंवा उन्हातून आल्यानंतर लगेच एसीमध्ये बसणे

उन्हांतून आल्यानंतर किंवा अति श्रम केल्यानंतर - - -  अति शीत जलपान करणे

कच्चे आणि शिजवलेले धान्य एकत्र सेवन करणे

अर्धवट शिजलेले अन्नपदार्थ सेवन करणे

अधिक प्रमाणात पिष्टमय पदार्थांचे सेवन

दूध आणि फळ एकत्र सेवन इत्यादी अनेक कारणांमुळे - - -

त्वचा विकार उत्पन्न होऊ शकतात

याच कारणांमुळे सोरायसिस हा त्वचा विकार देखील उत्पन्न होत असतो

सोरायसिस प्रामुख्याने दोन प्रकारे बघायला मिळतो

एका प्रकारामध्ये त्वचा अतिशय कोरडी असते आणि त्यातून कोंडा बाहेर पडत असतो

तर दुसऱ्या प्रकारामध्ये विशिष्ट प्रकारचा स्त्राव त्यामधून येत असतो

सोरायसिस मध्ये त्वचेवरील भाग लालसर आणि खडबडीत दिसतो

हा खडबडीत पातळ थर म्हणजे मृत पेशी असतात

प्रामुख्याने कोपर / / गुडघे / / कानाच्या पाठीमागे / / छाती पोट डोके अशा भागांवर सोरायसिस ची सुरुवात होते

जननेंद्रिया जवळ सुद्धा हा व्याधी होऊ शकतो

काही व्यक्तींना फक्त डोक्यात अधिक प्रमाणात कोंडा होणं हेच लक्षणं असतं

सोरायसिस आजार होण्यामागे मानसिक कारणे देखील असतात - - - -

ज्यांना मानसिक ताण तणाव असतो

त्यांच्यात सोरायसिस होण्याची शक्यता अधिक असते

सोरायसिस ची चिकित्सा करत असताना सर्वात प्रथम

शारीरिक कारणांना आपण दूर करणारच परंतु - - -

मानसिक कारणे दूर करणे देखील अत्यंत गरजेचे आहे

पंचकर्म उपचारांमध्ये जो दोष अधिक वाढलेला आहे त्याला

अनुसरून वमन / / विवेचन आणि बस्ती या चिकित्सा करणे गरजेचे आहे

स्थानिक किंवा सार्वदेहिक रक्त मोक्षण देखील वैद्यकीय सल्ल्याने करता येऊ शकते

शरीरातील दोषांना पंचकर्माच्या साह्याने बाहेर काढणे सहज शक्य व्हावे यासाठी

शरीराला आतून आणि बाहेरून स्निग्ध करणे गरजेचे असते - -   

यासाठी विविध औषधांनी सिद्ध केलेले तेल बाह्य मसाज साठी आणि

आतून स्निग्धता मिळण्यासाठी विविध सिद्ध तुपांचे सेवन यामध्ये केले जाते

प्रामुख्याने मंजिष्ठा --- गुळवेल --- त्रिफळा --- दारूहरिद्रा इत्यादींनी सिद्ध केलेले तूप वैद्यकीय सल्ल्याने - - - - - व्यक्तीची प्रकृती - - - -  रोगाचे स्वरूप विचारात घेऊन सेवनासाठी दिले जातात

पंचकर्म द्वारे शरीराची शुद्धी ही सोरायसिस मध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असते त्या

नंतर सोबत औषधी उपचारांमध्ये रक्त शुद्ध करणारी औषधी

महामंजिष्ठादी काढा

खदिरारिष्ट

अभयारिष्ट

आरोग्यवर्धिनी वटी

विविध एक्सट्रॅक्ट असणारे कल्प जसे कॅप्सूल कृमिघ्न - -  कॅप्सूल त्वकदुष्टीहर इत्यादींचा उपयोग करता येऊ शकतो

सोरायसिस मध्ये पथ्य आणि अपथ्या बद्दल विचार देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे 

यात प्रामुख्याने आहारामध्ये

सोडा आणि मीठ असणारे पदार्थ कमी करावेत

सोडा पूर्णत: वर्ज्य केल्यास उत्तम

कोणतेही फळ आणि दूध एकत्र सेवन करू नये

नवीन धान्य सेवन करू नये

फास्टफूड वर्ज्य करावेत

आंबवलेले पदार्थ कमी प्रमाणात सेवन करावेत

विरुद्ध अन्न सेवन करू नये

संरक्षित केलेले पदार्थ सेवन करू नयेत

कोणतेही व्यसन असल्यास ताबडतोब त्यांचा त्याग करावा जसे मद्यपान / /  गुटखा / / /  धूम्रपान इत्यादी

तर आहारामध्ये

जुने धान्य

सर्व प्रकारच्या फळभाज्या उदाहरणार्थ दुधी भोपळा / / पडवळ / /तोडले / / कारले / / गिलके / /  दोडके / / भोपळा यांचा वापर करावा

पालेभाज्या वर्ज्य कराव्यात

रोज पोट साफ होईल असे बघावे

आहारामध्ये गाईच्या किंवा म्हशीच्या तुपाचा वापर करावा

तेलाचा वापर कमी करावा

स्नानामध्ये केमिकल असणाऱ्या शाम्पू साबण क्रीम यांचा वापर टाळावा आणि उटण्याचा वापर करावा तसेच

कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करू नये कारण त्यामध्ये अनेक रसायन असतात की ज्यामुळे त्वचेला आघात होऊ शकतो

पेट्रोल / / डिझेल यांचे धूर तसेच प्रदूषण असणाऱ्या ठिकाणी जात असताना - - - - - शरीरावरील त्वचा वस्त्रद्वारे झाकली जाईल अशा पद्धतीने बाहेर फिरावे

थोडक्यात आहार विहारा संबंधी पथ्य / / /  प्रकृती आणि व्याधीच्या अवस्थेनुसार औषधी उपचार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे

पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी हे तीन उपक्रम

सोरायसिस या त्वचा विकाराला नष्ट करण्यात प्रधान आहेत.

 

 

 

Psoriasis: An Ayurvedic Perspective

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - -  today we are going to look at the skin disorder psoriasis - - - - -

The protective covering of our body is the skin --- and through this covering

unwanted waste products from the body are expelled through sweat ---

and the skin performs the function of maintaining the body's temperature properly

Beautiful, healthy skin is truly a mirror of our health

According to Ayurveda, the skin is made up of a total of seven layers

In Ayurveda, whatever type of skin disorder it may be, it is referred to as - - -  

Kushtha

In everyday usage, we refer to leprosy as Kushtha, but

from the perspective of Ayurvedic science, all skin disorders come under the term Kushtha

Having spots on the skin

Dryness of the skin

The development of itching / / boils / / rashes on the skin, etc.

Many types of skin disorders have been described in Ayurveda

Their causes generally include - - -

Incompatible food and drink

Suppressing various natural urges, such as not going - - when there is an urge to urinate

Holding back stool even when there is an urge to have a bowel movement

Suppressing sneezing, etc., are also included, as well as

Eating immediately after a meal

Exercising immediately after a meal

Constantly remaining exposed to heat

Moving from a cold environment to a hot environment or

immediately moving from a hot environment to a cold environment, such as

going into the sun immediately after being in AC or sitting in AC immediately after coming in from the sun

After coming in from the sun or after excessive exertion - - - drinking excessively cold water

Consuming raw and cooked grains together

Consuming partially cooked food

Excessive consumption of starchy foods

Consuming milk and fruit together, etc., due to many such causes - - -

skin disorders can arise

For the same reasons, the skin disorder psoriasis can also arise

Psoriasis is mainly seen in two forms

In one type, the skin is extremely dry and dandruff keeps coming off from it

while in the other type, a particular type of discharge comes from it

In psoriasis, the affected area of the skin appears reddish and rough

This rough, thin layer consists of dead cells

Psoriasis primarily begins on areas such as the elbows / / knees / / behind the ears / / chest, abdomen, and head

This disorder can also occur near the genitals

For some individuals, excessive dandruff only on the scalp is the sole symptom

There are also psychological causes behind the occurrence of psoriasis - - - -

Those who experience mental stress and tension

are more likely to develop psoriasis

While treating psoriasis, first of all

we will certainly eliminate the physical causes, but - - -

it is also extremely important to eliminate the psychological causes

In Panchakarma treatment, the dosha that is more aggravated

should be treated accordingly with Vamana / / Virechana and Basti therapies

Local or whole-body bloodletting can also be done under medical advice

To make it easier to eliminate the doshas from the body with the help of Panchakarma

it is necessary to oleate the body internally and externally - -   

For this, oils medicated with various herbs are used for external massage and

various medicated ghee preparations are consumed to provide internal oleation

Primarily, ghee medicated with Manjistha --- Guduchi --- Triphala --- Daruharidra, etc., is prescribed under medical advice - - - - - taking into consideration the individual's constitution - - - -  and the nature of the disease

Purification of the body through Panchakarma is extremely important in psoriasis

after that, among medicinal treatments, blood-purifying medicines

Mahamajishthadi decoction

Khadirarishta

Abhayarishta

Arogyavardhini Vati

preparations containing various extracts, such as Krimighna - -  capsules - - capsules Tvakdushthihara, etc., can be used

In psoriasis, consideration of Pathya and Apathya is also extremely important 

In this, primarily in the diet

foods containing soda and salt should be reduced

it is best to completely avoid soda

No fruit and milk should be consumed together

Newly harvested grains should not be consumed

Fast food should be avoided

Fermented foods should be consumed in small quantities

Incompatible foods should not be consumed

Preserved foods should not be consumed

If there is any addiction, it should be given up immediately, such as alcohol / /  gutkha / / /  smoking, etc.

Whereas in the diet

old grains

all types of fruit vegetables, for example bottle gourd / / snake gourd / /todele / / bitter gourd / / gilke / /  ridge gourd / / pumpkin should be used

Leafy vegetables should be avoided

One should ensure that the bowels are cleared every day

Cow's or buffalo's ghee should be used in the diet

Oil consumption should be reduced

During bathing, avoid using shampoos, soaps, and creams containing chemicals and use herbal ubtan, and also

do not use any type of cosmetics because they contain many chemicals that can cause trauma to the skin

When going to places with petrol / / diesel fumes as well as pollution - - - - - one should go outside in such a way that the skin of the body is covered with clothing

In short, dietary and lifestyle-related Pathya / / /  according to one's constitution and the stage of the disease, medicinal treatment and most importantly

purification of the body through Panchakarma are the three measures

that are primary in eliminating the skin disorder psoriasis.

Recent Posts

See All
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page