Pregnancy Stretch Mark Prevention Tips for Healthy Skin
प्रेग्नेंसी मध्ये स्ट्रेच मार्क्स येणारच नाहीत
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण
प्रेग्नेंसी मध्ये स्ट्रेच मार्क येऊच नये म्हणून काय
करायला हवं या विषयी बघणार आहोत
सर्वप्रथम स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय ?
हे बघणं महत्त्वाचं आहे
हा एक प्रकारचा डाग असतो
मर्यादा पलीकडे - - - त्वचा ताणली गेली असता
त्वचेचा मधला थर आणि त्वचेचा वरचा थर हा ताणला जाऊन म्हणजेच
स्ट्रेचिंग मुळे तेथील काही तंतू तुटतात आणि
त्वचेच्या पृष्ठभागावर पातळ पण रंग नसलेल्या चमकदार
पिंगट
पांढरट
काळसर
नारंगी
लालसर रंगाच्या रेषा दिसतात आणि यालाच स्ट्रेच मार्क्स असे म्हणतात
साधारणतः गर्भधारणा झालेल्या स्त्रियांच्या पोटावर
स्तनांवर
मांड्यांवर हे स्ट्रेच मार्क्स दिसून येतात
झपाट्याने वजन वाढणे किंवा कमी होणे अशा अवस्थेत देखील
कोणत्याही व्यक्तीला हे स्ट्रेच मार्क येतात तसेच
बॉडी बिल्डिंग चा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील
असे स्ट्रेच मार्क पडू शकतात
क्वचित प्रसंगी अनुवंशिकतेमध्ये देखील असे स्ट्रेच आढळतात तर काही
स्टेरॉइड्स औषधांच्या दीर्घ वापरामुळे देखील स्ट्रेच मार्क्स होण्याची शक्यता असते
स्ट्रेच मार्क्स साधारणतः पोटावर
स्तनांवर
नितंबावर
पार्श्वभागी
मांड्यांवर
क्वचित प्रसंगी हातावर देखील आढळू शकतात
स्ट्रेच मार्क हा काही व्याधी नाही आणि चिंता करण्या जोगे नसते किंवा
शारीरिक दृष्ट्या हे धोकादायक नसतात परंतु ते
दिसायला अडचणीचे वाटतात
साधारणत: ८० % महिलांना गर्भारपणामुळे
स्ट्रेच मार्क्स निर्माण होत असतात
कारण यात पोट, स्तन यांची त्या काळात वाढ होत असते
आणि
त्वचेचे तंतू ताणले जावून प्रसूती नंतर
स्ट्रेच मार्क्स दिसतात आणि
असे स्ट्रेच मार्क्स फिकट करता येऊ शकतात पण
१००% बरे होत नसतात म्हणजे त्याचा
काही अंशी डाग राहत असतो.
हे असे घडू नये म्हणून आपण गर्भारपणात काही पथ्य पाळणे
आवश्यक असते जसे
पोटावरील स्नायू, त्वचा, मांस पेशी यांना लवचिकता रहावी
या दृष्टीने खोबरेल तेल, तीळीचे तेल, शतावरी सिद्ध तेल,
बला तेल इ. द्वारे वैद्यकीय सल्ल्याने मालिश करावी
अशी मालिश स्तनांवर, मांड्यांवर देखील करावी यामुळे
तेथील तंतू तणावाने क्षती ग्रस्त न होता
स्ट्रेच मार्क्स तयार होणार नाहीत किंवा
झाल्यास अगदी कमी प्रमाणात होतील.
गर्भारपणात शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी
भरपूर पाणी पिणे गरजेचे असते.
सोबत शहाळ्याचे पाणी,
शहाळ्याची मलई सेवन केल्यास उत्तम.
संतुलित आहार आणि जीवनसत्व अ, क, झिंक इ. सेवन केल्यास
गर्भारपणात निर्माण होणारी स्ट्रेच मार्क्स नगण्य असतात.
असे सर्व पथ्य पाळून देखील स्ट्रेच मार्क्स निर्माण झाल्यास
विविध प्रकारचे लेप, मलम उत्तम असले तरी लेझर थेरपी श्रेष्ठ आहे.
शक्यतो आयुर्वेदानुसार योग्य आहार, व्यायाम, मसाज इ.
केल्यास स्ट्रेच मार्क्स तयार होणार नाहीत.
Pregnancy Stretch Mark Prevention Tips for Healthy Skin
Stretch marks are common in pregnancy, and they are not a sign that anything is wrong. Still, gentle skin care can support comfort, reduce dryness, and may help the skin cope better as the body changes.
This post is for information only. For personalised advice, speak with your gynaecologist or dermatologist.
What stretch marks are and why they happen
Stretch marks are thin lines that appear when the skin stretches faster than its middle layer can adjust. In pregnancy, they may look pink, red, purple, brown, or silvery, depending on your skin tone and how old the marks are.
Common causes include:
Rapid belly growth during the second and third trimester
Hormonal changes that affect skin elasticity
Family history, which can make stretch marks more likely
Weight gain pattern, especially if it happens quickly
They usually appear on the belly, breasts, hips, thighs, lower back, and buttocks.
Massage and moisturise your skin gently
Regular moisturising cannot guarantee prevention, but it can reduce dryness, itching, and tightness. Use a simple oil or cream after bathing, when the skin is slightly damp.
Good options often include:
Coconut oil
Almond oil
Olive oil
Vitamin E based moisturisers
Fragrance-free pregnancy-safe creams
Warm a small amount between your palms and massage in slow circular movements over the belly, hips, thighs, and breasts. Avoid strong pressure on the abdomen. If any oil causes itching, redness, or rash, stop using it.
Support skin from the inside
Healthy skin also needs good nutrition. Include protein, fruits, vegetables, nuts, seeds, and whole grains in daily meals. Vitamin C supports collagen formation, while vitamin E, zinc, and omega-3 fats help maintain skin health.
Drink enough water through the day, especially in hot Indian weather. Hydrated skin may feel softer and less itchy. Avoid starting supplements without medical advice, as pregnancy needs safe dosing.
What can help after pregnancy
If stretch marks remain after delivery, they often fade with time. Dermatologists may suggest treatments such as laser therapy, microneedling, or prescription creams after breastfeeding considerations are discussed. These treatments can improve appearance, but they may not remove marks completely.
FAQ
Can stretch marks be fully prevented during pregnancy?
Not always. Genetics, hormones, and skin type play a big role. Good care can support skin comfort and may reduce severity.
When should I start applying oil or moisturiser?
You can start early in pregnancy and continue daily, especially as the belly begins to grow.
Is laser therapy safe during pregnancy?
Laser therapy is usually considered after delivery, not during pregnancy. Always consult a qualified dermatologist.
Do stretch marks fade naturally?
Yes, many stretch marks become lighter and less noticeable over months.
A kind reminder
Your skin is doing important work during pregnancy. Focus on steady care, balanced food, hydration, and medical guidance when needed. Stretch marks are normal, and healthy skin is about comfort, strength, and care, not perfection.

Comments