Osteoporosis
Updated: Oct 20

ऑस्टिओपोरोसिस
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - आज आपण आपल्या शरीरात असणाऱ्या हाडांचे घनत्व कमी होणे - - - - - म्हणजेच ते ठिसूळ बनणे - - - या विषयी बघणार आहोत
आपल्या शरीरातील हाडांचे घनत्व कमी झाले म्हणजे ते ठिसूळ बनतात आणि
ह्या आजाराला ऑस्टिओपोरोसिस असे म्हणतात
हाड ठिसूळ झाल्यामुळे थोड्या आघाताने देखील ते - - - फ्रॅक्चर होतात म्हणजेच मोडतात आणि त्याच वेळेला आजाराची जाणीव होत असते
साधारणत: - - - कंबरेचे हाड - - - दंडाचे हाड - - - मनगट - - - घोट्याचे हाड - - - बरगड्या हे फ्रॅक्चर होतात तर
सर्व साधारणपणे उंची कमी होणे
पाठ दुखी
कुबड निघणे
अशी लक्षणे आढळून येतात
पाठ दुखी ही जास्त करून - - - - वाकणे - - - वाकून उठणे - - उडी मारल्यावर - - -जास्त प्रमाणात जाणवते
वाढत्या वयाबरोबर हाडांमध्ये कॅल्शियम व विटामिन डी ची कमतरता होऊन ऑस्टिओपोरोसीसची सुरुवात होत असते
ऑस्टिओपोरॉसिस हा आजार मुख्यत्वे करून स्त्रियांना मेनोपोज नंतर आणि वयाची साठी उलटून गेलेल्या पुरुषांमध्ये दिसून येतो
ऑस्टिओपोरोसीस झालेल्या 50% महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता दिसून येते
तर अंदाजे भारतातील पन्नाशीत असणाऱ्या
निम्म्या महिलांना या रोगाची लक्षणे आढळतात आणि विशेषतः
या आजाराचा सर्वात जास्त धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच असतो
वयाच्या 40 नंतर प्रत्येकाने - - - बोन डेन्सिटी टेस्ट - - - सीरम कॅल्शियम - - - विटामिन डी T3 - T 4 - TSH - - इस्ट्रोजन - - यासारख्या रक्ताच्या तपासण्या करून घ्याव्यात म्हणजे हा आजार
पूर्व अवस्थेतच ओळखता येईल आणि त्याची योग्य ती चिकित्सा केली जाऊ शकते
तसेच बोन मिनरल डेन्सिटी टेस्ट हा एक विशेष प्रकारचा एक्स-रे असतो
त्याद्वारे देखील याची तपासणी महिलांमध्ये वयाच्या 45 नंतर आणि पुरुषांमध्ये साठ वयाच्या दरम्याने करून घेतल्यास
या आजाराला पूर्व अवस्थेतच रोखता येऊ शकते
ऑस्टिओपोरोसीस होण्याच्या मुख्य कारणांमध्ये
शारीरिक हालचालींचा अभाव म्हणजेच व्यायामाची कमतरता
वजन कमी असणं
बैठे काम
तसेच कोवळ्या उन्हात न गेल्यामुळे विटामिन डी ची कमतरता
इत्यादी आहेत तसेच आहारात जास्त प्रमाणात
मांसाहार / / धुम्रपान / / मद्यपान / / सोडा असणारे पदार्थ / / कोल्ड्रिंक्स इत्यादीमुळे शरीरास आवश्यक असणारे कॅल्शियमचे शोषण न होणे प्रमुख आहेत
आणि याचा परिणाम हाडांचे कुपोषण होऊन ती ठिसूळ होतात
स्त्रियांमध्ये मासिक पाळी थांबल्यानंतर रक्तातील इस्ट्रोजन
या हार्मोन्सचे प्रमाण कमी झाल्याने हाडांच्या पोषणावर त्याचा परिणाम होतो
तसेच ज्या स्त्रियांमध्ये गर्भाशय हे बीज ग्रंथी सह काढून टाकले असता देखील हार्मोन्सच्या कमतरतेने हाडे ठिसूळ होतात
इतर कारणांमध्ये
फिट्स येणाऱ्या औषधी सातत्याने घेत राहिल्यास - - देखील हाडांचा ठिसूळ पणा जाणवू शकतो तसेच
वेगवेगळ्या प्रकारच्या वेदनाशामक - - स्टेरॉइड इत्यादींच्या अतिरिक्त वापरामुळे देखील हाड हे ठिसूळ होत असतात
म्हणून अशा प्रकारची सर्व औषधी वैद्यकीय सल्ल्या खेरीज सेवन करू नये
ऑस्टिओपोरोसीस या आजाराची कोणतीच लक्षण सुरुवातीच्या काळात दिसून येत नाही
आणि जेव्हा एखादे फ्रॅक्चर होते - - - त्याच वेळेला हा आजार लक्षात येतो
म्हणून प्रथम दर्शनी या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी देखील
वयाच्या हिशोबाने बोन डेन्सिटी टेस्ट / / विटामिन डी / / कॅल्शियम इत्यादींची तपासणी वेळोवेळी करून घ्यावी
ऑस्टिओपोरोसीस हा आजार होऊ नये म्हणून प्रामुख्याने
आपली जीवनशैली आयुर्वेदाच्या अनुसार दिनचर्या आणि ऋतुचर्याच्या दृष्टिकोनातूनच असावी
आहारामध्ये कॅल्शियम / / प्रोटीन / / व्हिटॅमिन याचा प्रामुख्याने समावेश असावा
हिरव्या पालेभाज्या / / दुधाचे पदार्थ / / मांसाहार योग्य प्रमाणात सेवन करावा
शरीराचे वजन प्रमाणात असणे गरजेचे आहे
रोज २ ते ३ किलोमीटर पायी चालणे हा एक यासाठीचा उत्तम पर्याय आहे
कोणत्याही प्रकारची व्यसन असल्यास ते सोडणे अत्यंत गरजेचं आहे
ऑस्टिओपोरोसीसला प्रतिबंध घालणं हे उपचारांपेक्षा जास्त गरजेचं आहे
हाडांना आणि स्नायूंना बळकटी येण्यासाठी योगासन / / एरोबिक्स यांच्यावर भर देणे प्रमुख आहे
अशा पद्धतीने आपण आपल्या हाडांची योग्य काळजी घेऊन शकतो आणि ऑस्टिओपोरोसीस निश्चितच टाळू शकतो
Osteoporosis
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - today we are going to look at the reduction in the density of the bones in our body - - - - - that is, their becoming brittle - - - and discuss this
When the density of the bones in our body decreases, they become brittle and
this condition is called osteoporosis
Because the bones become brittle, even with a minor impact they - - - fracture, that is, break, and it is at that time that awareness of the disease occurs
Generally: - - - the hip bone - - - the arm bone - - - wrist - - - ankle bone - - - ribs are fractured, whereas
generally, loss of height
back pain
development of a hump
such symptoms are observed
Back pain is mostly - - - - when bending - - - getting up after bending - - after jumping - - -is felt more intensely
With increasing age, deficiency of calcium and vitamin D in the bones occurs and osteoporosis begins to develop
Osteoporosis is seen mainly in women after menopause and in men who have crossed the age of sixty
Vitamin D deficiency is seen in 50% of women with osteoporosis
whereas approximately half of the women in their fifties in India
show symptoms of this disease and especially
the risk of this disease is much higher in women than in men
After the age of 40, everyone should - - - undergo a bone density test - - - serum calcium - - - vitamin D T3 - T 4 - TSH - - estrogen - - such blood tests so that this disease
can be identified in its early stage itself and appropriate treatment can be given
Also, a bone mineral density test is a special type of X-ray
through which this can also be examined, and if women undergo it after the age of 45 and men around the age of sixty
this disease can be prevented at an early stage itself
The main causes of osteoporosis include
lack of physical activity, that is, insufficient exercise
being underweight
sedentary work
as well as deficiency of vitamin D due to not going out in the mild sunlight
etc., and also excessive consumption in the diet of
non-vegetarian food / / smoking / / alcohol consumption / / soda-containing foods / / cold drinks etc. are major factors in preventing the absorption of the calcium required by the body
and as a result, the bones become malnourished and brittle
In women, after menstruation stops, the level of estrogen
this hormone decreases, which affects the nourishment of the bones
Similarly, in women whose uterus is removed along with the ovaries, the deficiency of hormones also causes the bones to become brittle
Other causes include
if medicines for seizures are taken continuously - - this can also cause brittleness of the bones, as well as
due to excessive use of different types of painkillers - - steroids etc., the bones also become brittle
Therefore, such medicines should not be taken without medical advice
There are no symptoms of osteoporosis during the initial stage
and when a fracture occurs - - - it is at that time that the disease is noticed
Therefore, even if no symptoms of this disease are visible at first glance
according to age, bone density test / / vitamin D / / calcium etc. should be checked from time to time
To prevent osteoporosis, primarily
our lifestyle should be based on the principles of daily routine and seasonal regimen according to Ayurveda
The diet should primarily include calcium / / protein / / vitamins
green leafy vegetables / / dairy products / / non-vegetarian food should be consumed in appropriate amounts
It is necessary to maintain body weight within the appropriate range
Walking 2 to 3 kilometers daily is one of the best options for this
If there is any kind of addiction, it is extremely necessary to give it up
Preventing osteoporosis is more important than treating it
To strengthen the bones and muscles, emphasis on yoga exercises / / aerobics is important
In this way, we can take proper care of our bones and can definitely prevent osteoporosis




Comments