top of page
logo.png

Mouth Ulcers Causes Symptoms and Remedies with Dietary Tips

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

तोंड येण्याची कारणे आणि उपाय

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - आज आपण बहुसंख्य रुग्णांमध्ये आढळणाऱ्या तोंड येणे या आजाराबद्दल बघणार आहोत - - - - कॅन्सर या रोगाची सर्व सामान्यांना एवढी धास्ती असते की शरीरात कोठे ही गाठ आली - - - - -  किंवा तोंडात फोड आले की कॅन्सरच्या शंकेने तात्काळ ते लोक तज्ञांकडे जातात

तोंड येणे हा विकार अयोग्य आहाराचे सेवन करणे - - - -  चुकीची औषधी घेणे किंवा दारू तंबाखू - - - सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांना नेहमी होत असतो

अयोग्य आहार म्हणजे खूप प्रमाणात तिखट - - - आंबट पदार्थांचे सेवन करणे - - - -  उष्ण पदार्थ - - - चहा अंडी मांसाहार इत्यादींचे सेवन करणे होय

तसेच नेहमी जागरण करणे - - - - चिंता करणे या कारणांमुळे सुद्धा तोंड येण्याचा विकार उद्भवतो

काही लोक - - - थोडी सर्दी झाली तरी ते डॉक्टरांचा सल्ला न घेताच अँटिबायोटिक्स औषधी स्वतः च्या मनाने सेवन करतात - - -  तसेच थोडे डोके दुखले किंवा कुठेही वेदना झाल्या तर - - - - वेदनाशामक म्हणजे पेन किलर औषधी घेत असतात - - - - - - - या चुकीच्या औषधी सेवन पद्धतीमुळे किंवा - - - -    अधिक मात्रेत औषधी घेतल्यामुळे सुद्धा तोंड येण्याचा आजार उद्भवतो

कृमी म्हणजे जंत असणे - - - - -   तसेच रोज नियमित पोट साफ न होणाऱ्या व्यक्तींना देखील हा आजार होत असतो

या आजाराची प्रमुख लक्षणं म्हणजे जिभेच्या - - - खाली आणि वर लाली किंवा फोड येणे तसेच कोणतेही तिखट - - - आंबट - - - खारट पदार्थ तोंडात टाकल्यावर खूप आग होणे - -  दुखणे इत्यादी लक्षणे असतात

प्रामुख्याने पित्त वाढल्यामुळे - - - तोंड येणे हा आजार होत असतो - - - -  अनेक रुग्णांना पित्ताचा त्रास असल्यास त्यावर - - -  शीत उपचार करावे असे ज्ञान समाजातील अनेकांना असते म्हणून असे व्यक्ती - - - - - केवळ जाहिरात पाहून किंवा ऐकून - - - -  चंदनासव उशिरासव - - - अरविंदासव इत्यादी औषधी विकत घेतात आणि नोनानेक महिने हे चुकीचे औषध सेवन करीत असतात

केवळ पथ्य पाळल्यानेच 90% आजार बरे होत असतात - - - परंतु लोकं - - खूप प्रकारची औषधी सेवन करायला लोक तयार असतात - -  पण पथ्य सांगू नका - - - तेवढेच त्यांचे म्हणणे असते

तोंड येणे या आजारात - -  रुग्णांना आवडणारे तिखट - - उष्ण पदार्थ - - - थोडे जरी तोंडात टाकले - - - तरी खूप आग होत असते - - - त्यामुळे ते पदार्थ आपोआपच वर्ज्य  होतात

तोंड येणे हा आजार - - - ज्यांना नेहमी होत असेल - - अशांनी कायम स्वरूपी उष्ण पदार्थ अति सेवन करणे - -  तसेच जागरण - - - मांसाहार टाळावे

तोंड आलेले असतांना दूध भात - - - दूध भाकर - - - दूध पोळी - - - लोणी भात यांचे सेवन करावे - - - - - गाईचे दूध यासाठी उत्तम ठरते

धूम्रपान करणे - - तंबाखू - - गुटखा - - मद्यपान यांचा कायमस्वरूपी त्याग करावा

तोंडात निर्माण झालेली - - - लाली किंवा फोड यांचा लवकर नाश होण्यासाठी - - गाईचे तूप त्या ठिकाणी लावावे - - तसेच जेष्ठमध चघळवावे

वैद्यकीय सल्ल्याने - -   कामदुधा - - - प्रवाळ भस्म - - - सुवर्ण गैरिक भस्म - -  चंदन यांचा औषधी रूपात वापर करावा

रोज पोट साफ होईल अशा पद्धतीने - - - आहार आणि व्यायाम असावा

आहारात गाईच्या तुपाचा भरपूर प्रमाणात वापर करावा

ओले नारळ चावून सेवन करावे किंवा नारळाचे दूध सेवन करावे

नारळाचे म्हणजे शहाळ्याचे पाणी सेवन करावे - - - - -  सोबत काळी मनुका - - - दुधी भोपळा - - - - उसाचा रस हे पथ्यकर असतात

 

Mouth Ulcers Causes Symptoms and Remedies with Dietary Tips

A small sore in the mouth can make eating, drinking, and even speaking uncomfortable. Mouth ulcers are common, but repeated ulcers should not be ignored, especially when they affect daily life.

This guide explains the usual causes, signs, and safe remedies for mouth ulcers. It is for general information only and does not replace medical advice.

Why mouth ulcers happen

Mouth ulcers can appear for many reasons. Common triggers include:

Poor diet - Lack of vitamin B12, iron, folate, or a generally low-nutrition diet may increase the risk of ulcers.

Spicy, acidic, or very hot foods - Chilli, pickles, citrus fruits, and hot tea can irritate the mouth lining.

Medicines - Some painkillers, antibiotics, acidity medicines, or other long-term medicines may cause dryness or irritation in some people.

Tobacco use - Chewing tobacco, gutkha, smoking, and paan masala can damage the mouth lining and delay healing.

Stress and poor sleep - Stress, fatigue, and low immunity can make ulcers more frequent.

Common symptoms to notice

Mouth ulcers usually look like small white, yellow, or red sores inside the cheeks, lips, gums, or on the tongue.

Typical symptoms include:

Blisters or sores on the tongue

Burning while eating spicy food

Pain while drinking hot tea or coffee

Difficulty chewing

Redness around the sore

Bad taste or discomfort in the mouth

If an ulcer lasts more than two weeks, keeps coming back, bleeds, or appears with fever or weight loss, consult a doctor or dentist.

Remedies and dietary tips that help

Simple care often helps mild ulcers heal faster.

Eat soft, cooling foods such as curd, buttermilk, rice, dal, banana, and coconut water.

Avoid chilli, fried snacks, pickles, alcohol, and tobacco.

Drink enough water through the day.

Rinse the mouth with cool water or a mild salt-water rinse.

Use a doctor-recommended oral gel, mouthwash, or vitamin supplement if needed.

Do not apply harsh home remedies like strong spices, undiluted antiseptics, or abrasive powders on ulcers.

FAQ

Are mouth ulcers contagious?

No, common mouth ulcers are usually not contagious.

Can vitamin deficiency cause mouth ulcers?

Yes. Low vitamin B12, iron, or folate may contribute to repeated ulcers.

Is tobacco linked to mouth ulcers?

Yes. Tobacco can irritate the mouth, delay healing, and increase serious oral health risks.

What food should be avoided during mouth ulcers?

Avoid spicy, sour, salty, fried, and very hot foods until the ulcer heals.

A simple takeaway

Most mouth ulcers improve with good oral hygiene, cooling foods, enough fluids, and avoiding irritants. Follow proper dietary discipline, stop tobacco use, and seek medical help if ulcers are frequent, painful, or slow to heal.

 

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page