Mental health and illness
मनाचे समाधान आणि आजार
आपणास अनेक वेळा खुपसारे पथ्य पळून देखील आजार होत असतात तेव्हा वैद्यकीय सल्ला घेणे - - - - औषधी घेणे - - - - विविध पथ्य पालन - - - व्यायाम - - - इ. सर्व करून देखील बरे वाटत नसते तेव्हा आपण काय करायला हवे या विषयी बघू या - - - -
अनेक वेळा औषध निस्तेज / / नि:ष्प्रभ असतात म्हणजे काम करत नाही आणि त्यात वेळही बराच जातो.
मग अशा वेळी औषधी घ्याव्यात अथवा नाही अशा विचार मनात येत असतो आणि नेमक काय कराव हे सुचत नाही - - - - अशा वेळी - - - -
त्या दरम्यान - - - आपले लक्ष कामावर किंवा इतर कोणत्याही प्रकल्पावर / योजनेवर केंद्रित करणे आवश्यक असते - - - हे केवळ आपले मन दुसरीकडे गुंतविण्यासाठी नव्हे तर ते बरे होण्याच्या स्थितीत परत आणण्यासाठी देखील महत्वाचे असते.
असे करणे हे निराशा आणि माझे काय होणार ? या विचारांपासून दूर ठेवणारे असते म्हणून
कामात मन गुंतवून ठेवणे आवश्यक असते.
दिवसभर हात आणि पाय दुमडून झोपणे सोपे आहे आणि यामुळे - - - - - काही काळ आपल्या वेदना विसरण्यासही मदत होते पण त्यानंतर - - - स्वतःला काही कामात व्यस्त ठेवणे केव्हाही चांगले असते.
वेगवेगळ्या योजना / कामं / गतीविधी ह्या मनाला वैयक्तिक वादळांपासून मुक्त राहण्यास सक्षम करतात.
असे वागणे आपल्याला अधोगतीला जाण्यापासून रोखण्यात मदत करते आणि आपण उंच भरारी घेऊ शकतो / / आपली उन्नती होते तसेच मनातील भय निघून जाते - - - मनात आत्मविश्वास जागृत होतो / / मन हलके होते म्हणजे मनाला भय मुक्त करणारी हीच युक्ती कामाला येते.
70 देशांमध्ये केलेल्या 30 वर्षांच्या विस्तृत संशोधनातून एक मनोरंजक निष्कर्ष समोर आला आहे की वरवर पाहता आपल्या जीवनातील समाधान हे - - -
केवळ 15% - - - बाह्य परिस्थितीशी जसे की - - - आर्थिक आणि सामाजिक स्थिती, शिक्षण, छंद आणि वय यावर अवलंबून आहे
25% वंशाणु यांचेवर अवलंबून आहे. तर - - - - - -
आपण काय विचार करतो आणि आपण कसे वागतो तसेच कोणत्या गोष्टीवर काय प्रतिक्रिया देतो यावर 60% अवलंबून असते
आपली जीवनशैली कशी आहे इ. हे महत्वपूर्ण आहे.
म्हणून आपल्याला बरे करणाऱ्या मनाच्या - - - समाधान या कडे लक्ष दिल्यास अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते - - -
मनाला समाधान मिळण्याच्या आपल्या विचारसरणीला आकार दिल्यास ६०% आजार दूर होण्यास मदत होते अन्य गोष्टी औषधी, व्यायाम पथ्य द्वारे दूर होतीलच म्हणून
मनाला समाधान मिळणाऱ्या गोष्टींकडे लक्ष द्या सर्व आजार दूर होतील
Mental health and illness


Comments