top of page
logo.png

Krushta or Underweight Causes Symptoms and Ayurvedic Treatment Guide

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 6
  • 6 min read

कृशता

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कृशता म्हणजे लुकडेपणा - - - -  बारीक असणे - - - -   या विषयी बघणार आहोत - - - -

कृश कोणाला म्हणावे ? ? ? ?  हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे - - -  कारण कृश व्यक्तींची व्याख्या करतांना आयुर्वेदात म्हटले आहे की - - - -  ज्या व्यक्तीच्या शरीरात मांस चा अभाव आहे - - - म्हणजे दंड - - - छाती - - - मांड्या - - - पाठ येथे मांसल भाग दिसतच नाही - - -- - - केवळ अस्थी म्हणजे हाड दिसतात - - - - -   गाल बसलेले दिसतात - -  डोळे खोल गेलेले दिसतात - - - - -  सर्व सांध्यांच्या ठिकाणी स्पष्टपणे हाडांचा पिंजरा दिसतो - - -   सोबत चक्कर येणे   - - - - -  थकवा येणे - - - - - - नेहमी नेहमी तोंडाला कोरड पडणे - - - - - - चव नसणे - - - - - - - -    शरीरात रुक्षता म्हणजे कोरडेपणा जाणवणे - - - -  इत्यादी लक्षणे आढळतात - - - अशा व्यक्तीस कृश समजावे

आधुनिक दृष्ट्या - - - - - -  वय आणि उंची या दोघांचा विचार करून वजन ठरविले जाते परंतु प्रकृतीचा विचार करून - - - - ज्या व्यक्तीला आपल्या दैनंदिन व्यवहारात - - ताजेतवाने म्हणजे फ्रेश वाटते - - - - उत्साह असतो - - - - शरीरात मेद व मांसल भाग व्यवस्थित दिसतात - - - - - त्वचेवर कोरडेपणा नसतो - - - -  भूक - - - रुची आणि मलप्रवृत्ती या गोष्टी व्यवस्थित असून - - - - - - - झोप शांत येते - - - - - - मन प्रसन्न असते अशी व्यक्ती स्वस्थ समजावी

कृशतेच्या कारणांमध्ये - - - - - नेहमी कोरडे पदार्थ - - - - शिळे पदार्थ - - -   सोडा टाकलेले पदार्थ सेवन करणे - - - - लंघन - - -  उपवास करणे इत्यादी प्रमुख आहेत - - - उलटी होणे - - - - संडासी होणे - - - - - मानसिक त्रास असणे - - - - - जागरण - - -  अनुवंशिकता - - - - -  व्यायाम न करणे - - - - -  भूक न लागणे हा विकार असणे - - -  वार्धक्य - - - - दीर्घकाळ आजार असणे - - - - संतापी स्वभाव - - - - -  -   सतत दुसऱ्या बद्दल द्वेष -  मत्सर असणे - - - -  अपूर्ण आणि चुकीचा आहार - - -  नेहमी मलावरोध - - - - - -  कृमी - - -  अजीर्ण - - - - रक्त कमी असणे - - - - ग्रहणी हा विकार असणे  - - - - - क्षयरोग म्हणजे टीबी विकार असणे - - - - क्षारयुक्त पाण्याचे नेहमी सेवन करणे - - - - -  शारीरिक आणि मानसिक विश्रांती नसणे - - -  अति श्रम इत्यादी कारणांमुळे कृशता निर्माण होते

या सर्व कारणांमुळे - - - - शरीरात वातदोष वाढून कृशता निर्माण करतो - - - - यामध्ये प्रामुख्याने जी लक्षणे दिसतात त्यात - - - - - थोड्या चालल्याने देखील श्वास लागतो - - - - - थोडा अधिक आहार घेतल्यास देखील श्वास लागतो - - - - - हवामानातील शीत उष्ण हे बदल सहन होत नाही - - - - -  पोट / / मान / /  नितंब हे सर्व शरीर अवयव शुष्क आणि सुरकुतलेले दिसतात - - - -   शरीरावर शिराजल दिसतो - - - - - शरीरात केवळ हाडे आणि कातडी शिल्लक आहे असे दिसते - - - - - सांधे मोठे आणि जाड वाटतात

पुढे अधिक काळ गेल्यास पांथरी म्हणजेच प्लिहा किंवा स्प्लीन ही वाढते - - - - - मुळव्याध दमा इत्यादी व्याधी होऊ शकतात

उपचारांमध्ये सर्वप्रथम रुग्णाची - - - - -  मानसिक चिंता दूर करावी - - - - - -  रुग्ण सदैव आनंदीत राहील असे बघावे - - - - - पचण्यास हलका परंतु सकस आहार द्यावा - - वेळेवर आणि पुरेशी झोप होईल असे बघावे - - - - - - - वजन हे आहार / /  पाणी / /  झोप / / / मन: स्वास्थ्य यावर अवलंबून असते - - - - - म्हणून केवळ औषधी देऊन वजन वाढवण्याची अपेक्षा करू नये

भूक वाढीसाठी - - - - अग्नी तुंडी रस - - - - पंचकोलासव इत्यादी द्यावे

मानसिक बल वाढण्यासाठी ब्राह्मी - - -  सारस्वतारीष्ट द्यावे - - - -   तसेच गरजेनुसार चवनप्राश / / / शतावरी कल्प / / / / सिद्ध योग कल्प - - - - कुष्मांड पाक - - - -  मनुका - - - - दूध - - - - तूप - - - -  सुवर्णभस्म इत्यादी औषधांचा उपयोग करता येतो

वैद्यकीय सल्ल्याने संपूर्ण शरीरास अभ्यंग - - - - व्यायाम - - - -  योगासन आणि बस्ती चिकित्सा करून घ्यावी

अशा प्रकारे कृशता या विकारावर विजय मिळवणे सहज शक्य आहे

 

 

Krushta or Underweight Causes Symptoms and Ayurvedic Treatment Guide

Being thin is not always a disease. But when low weight comes with weakness, dryness, poor appetite, fatigue, and loss of muscle, Ayurveda describes it as Krushta, or excessive leanness.

This guide is for information only. Underweight, sudden weight loss, breathlessness, long-term digestive issues, anaemia, or suspected TB need medical assessment.

What does Krushta mean in Ayurveda?

In Ayurveda, a person is considered Krushta when there is a clear lack of mamsa dhatu, or muscle tissue. The body may look bony, with very little flesh over the arms, chest, thighs, back, and joints.

Common signs include:

Sunken cheeks and deep-set eyes

Visible bones around the joints

Dizziness and tiredness

Dry mouth again and again

Lack of taste or poor interest in food

Dryness of skin and body

Low stamina, even after mild activity

From a modern view, weight is usually judged by age, height, and body build. But health is not only a number. A healthy person generally feels fresh, has good appetite, proper bowel movement, sound sleep, clear skin, stable energy, and a pleasant mind.

Common causes of underweight

Ayurveda links Krushta mainly with an increase in Vata dosha, often due to drying, depleting, or irregular habits.

Possible causes include:

Eating very dry, stale, poor-quality, or soda-added foods

Frequent fasting or excessive dieting

Vomiting, diarrhoea, worms, indigestion, or constipation

Poor appetite and weak digestion

Mental stress, anger, jealousy, grief, or constant worry

Lack of sleep and overwork

No exercise, or sometimes excessive strain

Long-term illness, old age, anaemia, grahani disorders, or tuberculosis

Hereditary tendency

Lack of physical and mental rest

When these causes continue, the body may fail to build proper nourishment.

Symptoms that need attention

Krushta may progress slowly. A person may notice breathlessness after walking a short distance, discomfort after eating slightly more food, and poor tolerance to heat or cold.

The abdomen, neck, and hips may look dry or wrinkled. Veins may appear prominent. Joints may look large compared with the rest of the body. If neglected, associated complaints such as piles, asthma-like symptoms, or spleen-related problems may develop.

Ayurvedic treatment approach

Treatment does not mean only taking weight-gain medicines. Weight depends on food, water, sleep, digestion, and mental health.

The first steps are simple:

Reduce worry and mental stress

Eat light-to-digest but nourishing food

Sleep on time and rest properly

Build appetite before increasing heavy foods

Follow treatment under a qualified Ayurvedic doctor

For appetite and digestion, medicines such as Agnitundi Ras or Panchakolasava may be advised. For mental strength, Brahmi or Saraswatarishta may be used. Depending on the person, preparations like Chyawanprash, Shatavari Kalpa, Kushmanda Pak, raisins, milk, ghee, or Suvarna Bhasma may be considered.

Ayurvedic therapies such as abhyanga, suitable exercise, yoga, and basti chikitsa may also help when done with medical guidance.

FAQ

Is being thin always unhealthy?

No. If energy, appetite, sleep, digestion, and mood are good, a naturally slim body may be healthy.

Can Ayurveda help in gaining weight?

Ayurveda may help by improving digestion, sleep, nourishment, and Vata balance. Treatment should be individualised.

Should I take Suvarna Bhasma or other medicines on my own?

No. Herbo-mineral medicines must be taken only under qualified medical supervision.

When should I see a doctor?

Seek help if weight loss is sudden, appetite is very low, fever persists, breathlessness occurs, stools are abnormal, or weakness is severe.

A steady recovery from Krushta comes from correcting the cause, improving digestion, calming the mind, and nourishing the body patiently.

 

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page