top of page
logo.png

Jaundice: A Monsoon Season Ailment

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 6 min read

कावीळ पावसाळ्यातील विकार

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - आज आपण पावसाळ्यातील कॉमन विकार कावीळ या विषयी बघणार आहोत

अगदी जन्माला आलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना होऊ शकणारा आणि सर्वांनाच परिचित असणारा व्याधी म्हणजेच कावीळ - - - -   = जन्मलेल्या बाळाला काही तासातच होणाऱ्या कावीळला प्राकृत कावीळ असे म्हणतात - - - -  बाळ जन्माला आल्यानंतर शरीरात निसर्गतःच पित्त वाढून हा व्याधी होतो - - - - आणि विशेष उपचार न करता देखील बरा होऊ शकतो - - - -  तर काही बालकांना विशेष चिकित्सेची गरज पडते

कावीळची लस हा शब्द सर्वांना परिचित आहे - - - - - -  कावीळ या व्याधीचा प्रतिबंध करणारी कोणतीही लस बाजारात उपलब्ध नसून - - - ती लस केवळ हेपाटाइटिस बी / ए इत्यादी वायरस ला प्रतिबंध करणारी लस आहे - - - - - -  हे व्हायरस शरीरात गेल्यानंतर यकृत म्हणजेच लिव्हर या अवयवास आघात - - - पोहोचवून कावीळ व्याधी निर्माण करतात - - - -  या व्हायरसचे व्यतिरिक्त अनेक कारणे आहेत - - - - की जे कावीळ हा व्याधी निर्माण करू शकतात

आयुर्वेदानुसार काविळीचे दोन मुख्य प्रकार पडतात - - - - - एक प्रकार म्हणजे संपूर्ण शरीरात पित्त वाढल्याने होणार असून - - - - दुसरा पित्ताचा मार्ग अडल्यामुळे निर्माण होणारा आहे - - - - - -  पावसाळ्यात दुषित अन्नसेवन -- - - - - - - खूप तिखट - - - आंबट - -  खारट - - - उष्ण पदार्थ - - - नेहमी अधिक प्रमाणात सेवन करणे - - - - रोज जागरण करणे - - - - - उन्हात किंवा उष्णते जवळ काम करणे - - - - अति धूम्रपान - - - मद्यपान करणे - - - - अँटिबायोटिक्सचा अतिरिक्त वापर करणे - - - -    अधिक प्रमाणात विटामिन्स म्हणजे जीवनसत्वांचे वैद्यकीय सल्ल्या खेरीज सेवन, दही - - - शिळे पदार्थ - - - - लोणचे - - - हिरवी मिरची इ. - - - -  अधिक प्रमाणात नेहमी नेहमी घेत राहणे इत्यादी कारणांनी शरीरात पित्त दोष वाढून - - - - कावीळ व्याधी उत्पन्न होतो - - - - अशा प्रकारच्या कावीळमध्ये - - - - खूप थकवा येणे - - - - - अंगास खाज येणे - - - - पोट साफ न होणे अथवा पातळ मलप्रवृत्ती होणे - - - - भूक न लागणे - - - - -  काम करण्याची इच्छा नसणे - - - - -  नख //  डोळे //  त्वचा //  लघवी //   मल खूप अधिक प्रमाणात पिवळे दिसणे - - - -  क्वचित लालसर लघवी होणे इत्यादी लक्षणे असतात

या प्रकारच्या कावीळ व्याधीमध्ये - - - - कामदुधा - - -  प्रवाळ भस्म - - - - गुलकंद - - - मोरावळा - - - -  काळी मनुका - - - -  प्रवाळ पंचामृत - - - -  सुतशेखर - - - - सुवर्णगैरिक इत्यादी औषधी उपयुक्त ठरतात - - - - - -  या औषधांना वैद्यकीय सल्ल्यानेच सेवन करावे

दुसऱ्या प्रकारच्या कावीळ मध्ये दूषित पाणी - - - -  दूषित दूध - - - वायरस - - - कृमी म्हणजेच जंत इत्यादी कारणांनी यकृतामधून म्हणजेच लिव्हर मधून - - -    आतड्यांकडे पित्ताचे वहन करणाऱ्या नलिकेमध्ये - - - - अवरोध उत्पन्न होतो - - - - पित्तनलिकेत झालेल्या अवरोधामुळे - - -  यकृतात निर्माण झालेले पित्त आतड्यांमध्ये येऊ शकत नाही आणि पचनक्रिया बिघडते - - - - तसेच पित्तामुळे मलाला येणारा पिवळा रंग देखील येत नाही म्हणजे अशा वेळी रुग्णाच्या मलाचा रंग पिवळा न राहता - - - - - तिळाच्या पिंडीप्रमाणे पांढरा किंवा काळा असतो

अशा प्रकारे मार्ग अडल्याने आतड्यात न येणारे पित्त - - --  रक्तामध्ये मिसळून - - - संपूर्ण शरीराला पिवळेपणा निर्माण करते - - - या विकारात संपूर्ण शरीर पिवळे होणे - - - भूक मंदावणे - - - यकृताला सूज येणे - - - - मलाचा रंग पांढरा किंवा काळा असणे इत्यादी लक्षणे दिसतात - - - - - - या प्रकारच्या कावीळ मध्ये वैद्यकीय सल्ल्याने रेचक औषधी घेणे - - - - - तसेच कुटकी - - - गुळवेल - - - - एरंड पानांचा रस - - - - - आरोग्यवर्धिनी - - - - - कोरफडीचा गर - - -  कुमारी आसव  इत्यादी औषधी उपयुक्त ठरतात

यकृतात एखादी गाठ निर्माण झाल्याने - - -  अथवा कर्करोगामुळे देखील अशा प्रकारचा कावीळ होऊ शकतो - - - -  म्हणून कोणत्याही प्रकारच्या कावीळ मध्ये - - - - घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वपूर्ण असते

सर्व प्रकारच्या कावीळमध्ये - - - -  उकळलेले पाणी पिणे आवश्यक असते - - - - - तर वनस्पती तूप आणि तेल - - पूर्णतः वर्ज करणे - - - - जास्तीत जास्त विश्रांती घेणं - - आवश्यक असते - - - - - जुने गहू - - - - जुने तांदूळ - - -- मुगाचे वरण - - - गाईचे दूध दुधी भोपळा - - - गिलके - - - - गंगाफळ - - - लोणी - - - साजूक तूप इत्यादी आहार वैद्यकीय सल्ल्याने घेत राहणे रुग्णहिताचे असते

कावीळ व्याधीत व्यवस्थित पथ्य पाळून - - -  योग्य वैद्यकीय उपचार केल्यास व्याधी लवकर बरा होऊ शकतो - - - - - अन्यथा मृत्यू देखील येऊ शकतो

 

Jaundice: A Monsoon Season Ailment

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today, we are going to discuss a common monsoon-season illness: jaundice.

 

Jaundice is a condition that can affect everyone, from a newborn baby to the elderly, and is familiar to almost everyone.

 

Jaundice that develops within a few hours after birth is called physiological jaundice. After birth, bile naturally increases in the baby's body, causing this condition. It often resolves on its own without any special treatment, although some infants may require specific medical care.

 

The term "jaundice vaccine" is familiar to many people. However, there is actually no vaccine available that directly prevents jaundice. The vaccines available, such as those for Hepatitis B and Hepatitis A, only protect against those viruses. When these viruses enter the body, they damage the liver and can lead to jaundice. Besides these viruses, there are many other causes that can also result in jaundice.

 

According to Ayurveda, jaundice is mainly classified into two types. One type occurs due to an increase in bile (Pitta) throughout the body, while the other results from an obstruction in the bile pathway.

 

During the monsoon, consuming contaminated food; eating excessive spicy, sour, salty, and hot foods regularly; staying awake late every day; working in the sun or near heat; excessive smoking; alcohol consumption; overuse of antibiotics; taking excessive vitamins without medical advice; and frequently consuming curd, stale food, pickles, green chilies, etc., can increase the Pitta dosha in the body and lead to jaundice.

 

Symptoms of this type of jaundice include:

- Severe fatigue

- Itching all over the body

- Constipation or loose stools

- Loss of appetite

- Lack of interest in work

- Yellow discoloration of the nails, eyes, skin, urine, and stool

- Occasionally reddish-colored urine

 

In this type of jaundice, medicines such as Kamdudha, Praval Bhasma, Gulkand, Morawala (preserved amla), black raisins, Praval Panchamrut, Sutshekhar, and Suvarna Gairik may be beneficial. These medicines should only be taken under medical supervision.

 

In the second type of jaundice, contaminated water, contaminated milk, viruses, worms (intestinal parasites), etc., cause an obstruction in the bile duct that carries bile from the liver to the intestines. Because of this blockage, the bile produced by the liver cannot reach the intestines, resulting in impaired digestion. Since bile is responsible for the yellow color of stool, the stool loses its normal yellow color and may instead appear white like sesame cake or black.

 

When bile is unable to reach the intestines due to the obstruction, it mixes with the blood and causes yellow discoloration throughout the body. Symptoms of this condition include yellowing of the entire body, reduced appetite, swelling of the liver, and white or black-colored stools.

 

In this type of jaundice, laxative medicines may be prescribed under medical supervision. Herbs and medicines such as Kutki, Guduchi (Giloy), castor leaf juice, Arogyavardhini, aloe vera pulp, and Kumari Asava may also be beneficial.

 

This type of jaundice can also occur due to a tumor in the liver or because of cancer. Therefore, in any type of jaundice, it is important to seek medical advice rather than relying on home remedies.

 

For all types of jaundice, drinking boiled water is essential. Vegetable oils and fats should be completely avoided. Adequate rest is necessary. Foods such as aged wheat, aged rice, moong dal soup, cow's milk, bottle gourd, ridge gourd, Gangaphal, butter, and pure ghee may be taken under medical guidance, as they can be beneficial for the patient.

 

By following the recommended dietary restrictions and receiving proper medical treatment, jaundice can recover quickly. Otherwise, it may even become life-threatening.

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page