top of page
logo.png

Jaggery in Winter Health Benefits for Warmth Digestion Immunity and Joint Pain

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

हिवाळ्यात गुळाचे सेवन करा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण थंडीच्या दिवसात म्हणजेच हिवाळ्यामध्ये गुळ सेवनाने काय फायदे होऊ शकतात  ? हे बघणार आहोत

थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील थंडतेमुळे - - - तसेच लोकांच्या निष्काळजीपणा मुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात - - - हिवाळ्यात शरीराचे तापमान सामान्य ठेवणे आवश्यक असते - - - - ते कमी झाल्यास शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात - - - -  म्हणून हिवाळ्यात उबदार वस्त्र आणि उष्ण किंवा गरम पदार्थांचे सेवन अत्यंत आवश्यक असते - - - -   उष्ण पदार्थांमध्ये मधुर रसाचा म्हणजेच गोड चवीचा गुळ हा आरोग्यदायी अन्न म्हणून प्रसिद्ध आहे - - - - - - साखरे पेक्षा गूळ हा आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असतो

गुळामध्ये उत्तम प्रमाणात फायबर्स असतात - - - -   जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात - - - - -  म्हणजेच पोट साफ करणे आणि आतड्यांच्या हालचाली व्यवस्थित करणे - - - -  हे काम गुळाच्या प्रमाणातील सेवनाने घडत असते - - - - - गुळामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात - - - - -  जे शरीराची रोगप्रतिकारक्षमता उत्तम ठेवतात - - - - -   गुळ हा उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात होणारी सांधेदुखीची समस्या यापासून निश्चितच आपणास आराम मिळतो - - - - - -  गुळामध्ये लोह मुबलक प्रमाणात असल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी म्हणजेच रक्तातील लोहाचे प्रमाण उत्तम राहते - - - - -- - - -  गुळ हे उष्ण असल्यामुळे चहापाच्या क्रिया सुधारून शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होऊ देत नाही तसेच - - - - - -  स्त्रियांच्या संदर्भात मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास देखील कमी होतो

गुळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण देखील भरपूर असते त्यामुळे कॅल्शियम कमतरतेने होणाऱ्या समस्या निर्माण होऊ शकत नाही हिवाळ्यात थंडतेमुळे सर्दी कफ खोकला होऊ शकतो परंतु गुळाच्या उष्ण गुणामुळे असे आजार दूरच राहतात

हिवाळ्यामध्ये दही सेवन करायचे असल्यास - - -  गुळासोबत दही सेवन निश्चितच लाभदायक ठरते 

हे सर्व करत असताना अति प्रमाणात गुळाचे सेवन होता कामा नये जर याचे अति प्रमाणात सेवन झाले तर वजन देखील वाढू शकते कारण शेवटी गोड चवीचे पदार्थ शरीरामध्ये स्निग्धता आणि स्थूलता निर्माण करू शकतात गुळाचे अतिरिक्त सेवन रक्तातील साखरेची पातळी देखील वाढू शकते म्हणून मधुमेह असणाऱ्यांनी प्रमाणातच गुळाची सेवन करावे

अतिरिक्त सेवनामुळे नाकातून रक्तस्राव देखील होऊ शकतो आणि हे सर्व उष्ण गुणांचेच लक्षण आहेत

ज्यांच्या संपूर्ण अंगावर सूज आहे म्हणजेच सूज असण्याचा आजार आहे अशा व्यक्तींनी शक्यतो गुळाचे सेवन टाळावे

बाजारातून गूळ आणत असतांना त्याची शुद्धता तपासून घ्यावी म्हणजेच चांगल्या क्वालिटीचा कंपनीचा गुण सेवन करावा अन्यथा लाभ होण्याऐवजी त्याचे दुष्परिणामच अधिक होऊ शकतात

चला तर मग आपण प्रमाणातच गुळाचे सेवन करून आपले आरोग्य अबाधित राखू या नमस्कार

 

 

 

Jaggery in Winter Health Benefits for Warmth Digestion Immunity and Joint Pain

Cold weather often brings sluggish digestion, stiff joints, and a craving for something warm and sweet. Jaggery, or gur, has long been used in Indian homes during winter for exactly this reason. It is still a sweetener, but when eaten wisely, it offers more than plain refined sugar.

Jaggery can help the body feel warmer

Jaggery is traditionally valued as a warming food. After eating it, the body digests and metabolises its natural sugars, which can create a gentle feeling of warmth. This is why many people enjoy a small piece of gur after meals or add it to winter drinks like til-gur laddoo, chikki, or warm milk.

This does not mean jaggery “heats” the body like a medicine. It simply supports quick energy and comfort in cold weather, especially when paired with foods such as sesame, peanuts, ginger, or ghee.

It is more nutritious than refined sugar

Refined sugar is mostly empty calories. Jaggery is less processed, so it can retain small amounts of minerals such as iron, magnesium, potassium, and calcium.

It may also contain trace plant compounds and tiny fibre-like residues depending on how it is made. These can support digestion slightly, though jaggery should not be treated as a high-fibre food. For better digestive benefits, pair it with fibre-rich winter foods like roasted chana, sesame seeds, nuts, or whole grains.

It may support immunity and ease winter stiffness

Traditional diets often include jaggery in winter because it pairs well with immunity-supporting ingredients. Gur with ginger, tulsi, sesame, or nuts can make a nourishing seasonal snack.

Some people also find jaggery helpful for joint stiffness and mild aches, especially when eaten with sesame or dry ginger. This may be due to the warming nature of the combination, but persistent joint pain needs medical advice.

Moderation matters

Jaggery is healthier than sugar in some ways, but it is still high in natural sugars. Too much can lead to weight gain and blood sugar spikes, especially for people with diabetes or insulin resistance.

A small piece after a meal is enough for most people. This article is for general information only and is not medical advice.

How to choose good-quality jaggery

Look for jaggery that is:

Firm, clean, and free from dust or stones

Dark golden to brown, not unnaturally bright yellow

Mildly earthy in smell, not chemical-like

Sold by a trusted local seller or packaged brand

Free from excessive stickiness, mould, or crystals

FAQ

Can jaggery be eaten daily in winter?

Yes, in small amounts. Daily use is fine for many people, but portion size matters.

Is jaggery better than sugar?

Nutritionally, yes. It has trace minerals, while refined sugar offers mainly calories.

Can people with diabetes eat jaggery?

They should be careful. Jaggery can still raise blood sugar and should be taken only with medical guidance.

What is the best way to eat jaggery in winter?

Try it with sesame, peanuts, roasted chana, ginger tea, or warm milk in small portions.

Jaggery can be a comforting winter sweetener when used wisely. Choose good-quality gur, keep portions small, and enjoy it as part of a balanced seasonal diet.

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page