If there is vision, the world will be visible.
- Satish Shindadkar
- Aug 6
- 5 min read
असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण 10 जून या दिवशी डॉक्टर भालचंद्र यांच्या स्मृत्यर्थ दृष्टी दान दिन म्हणून साजरा केला जातो - - - - - - त्यानिमित्त दृष्टी विषयी बघणार आहोत
मनुष्याच्या पंच ज्ञानेंद्रयांपैकी नेत्र हे एक महत्त्वाचं ज्ञानेन्द्रिय आहे
सृष्टीतील सर्व भाव पदार्थांना जाणण्याचे सामर्थ्य यात असते
अंध व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली तरी हे जग व्यर्थ आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने जीवनाच्या अंतापर्यंत नेत्र रक्षणार्थ प्रयत्न करावे
ज्या व्यक्तीला चांगल्या उघड्या डोळ्यांनी चष्मा लावून सुद्धा दहा फुटांवरून दिवसांच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात हाताची बोटे मोजता येत नाहीत अशा व्यक्तीला सर्वसाधारणपणे अंध समजण्यात येते
अशा पद्धतीने अंध समजण्यात येणाऱ्या 60% व्यक्तींचे अंधत्व उपचाराद्वारे नष्ट करता येण्यासारखे असते
नेत्राच्या अनेक आजारांवर अद्ययावत तंत्रज्ञान / / शस्त्रक्रिया पद्धती / / / औषधोपचार उपलब्ध आहेत
तरी सुद्धा अंधत्वाचे प्रमाण कमी होत असताना दिसत नाही कारण
आजच्या युगात नेत्राच्या संबंधात आहार विहाराच्या दृष्टीने - - -
जी काळजी घ्यायला हवी ती घेतली जात नाही असे आढळते
आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने विचार केला असता आपली नेत्र ज्योत चांगली रहावी म्हणून - - -
प्रत्येक व्यक्तीने आठवड्यातून दोनदा रात्री झोपण्याच्या अगोदर तळपायांना तीळीच्या तेलाने किंवा गायीच्या तुपाने मालिश करावी
शक्यतो अशी मालिश काश्याच्या वाटीने केल्यास उत्तम
याला आयुर्वेदामध्ये पादाभ्यंग असे म्हणतात
ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्यात - - - शक्यतो गाईच्या तुपाची मालिश करावी
उन्हात जात असताना धूर धूर यांचा नेत्राशी संपर्क येऊ नये म्हणून
तसेच गाडीवरून प्रवास करीत असताना - - अति जोरात असणाऱ्या वाऱ्याचा संपर्क नेत्राशी येऊ नये म्हणून
गॉगल चा वापर करणे हितावह असतं
वाचन अथवा लिखाण करीत असताना पुरेसा प्रकाश असावा
टीव्ही कमीत कमी दहा ते बारा फूट अंतरावर पहावा
तसेच कोणत्याही स्क्रीन समोर एक ते दोन तासापेक्षा अधिक काळ राहू नये म्हणजेच ती स्क्रीन लॅपटॉपची असेल किंवा मोबाईलची पण असू शकते - - -
जे व्यक्ती आयटी सेक्टर मध्ये काम करतात त्यांच्यासाठी वेगळी पथ्य सांगितली जातील परंतु इतर व्यक्तींनी लॅपटॉप मोबाईल किंवा टीव्हीचा संच यांच्या सगळ्यांच्या मिळून स्क्रीनचा वेळ अधिकाधिक दोन तास प्रति दिवस एवढाच असावा
दृष्टी चांगली रहावी म्हणून शीर्षासन / / / सूर्यनमस्कार / / / त्राटक / / / निमेशन संतरण यासारखे व्यायाम करावेत
डोळ्यांची आग होत असेल किंवा नेत्र अस्वच्छ वाटत असतील तर स्वच्छ पाण्याने डोळ्यांची उघडझाप करावी
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दर सहा महिन्यांनी नेत्र तपासणी करून योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्यावा
ज्या व्यक्तींना चष्मा आहे त्यांनी योग्य नंबरचा चष्मा नियमित लावणे आणि दर वर्षी नंबर तपासून घेणे हितावह असते
आहारामध्ये सर्व प्रकारची चवी असणारे पदार्थ सेवन करावेत
लाल टमाटा
गाजर / / / पालक
आंबा / / / कोथंबीर
कढीलिंबाची पानं / / / संत्री / / / / मोसंबी / / / / गायचे तूप / / / मध / / / पपई / / / शतावरी
मध / // काळ्या मनुका / / / / कारले / / / / नवीन केळी
जुने गहू / / / जुने तांदूळ / / / जिरे यांचा वापर करावा
तसेच आहारात गायीचे तूप / / / लोणी / / / दूध यांचा मुबलक प्रमाणात वापर करावा
मीठ वापरायचे असल्यास सैंधव मिठाचा वापर करावा
तसेच शेवगा - - - आवळा - - - काकडी - - - मुळा - - - लाल वांगी यांचा आहारात समावेश करावा
आयुर्वेदिक औषधांमध्ये - -- साप्तांमृत लोह - - - त्रिफळा घृत - - - तिमिरघ्न कॅप्सूल - - - चाक्षुक्ष्य कॅप्सूल यांचा वापर करावा
कोणत्याही प्रकारच्या औषधांचा वापर वैद्यकीय सल्ला खेरीज करू नये
नेत्रास म्हणजेच दृष्टीस अहित करणाऱ्या गोष्टींमध्ये - - -
अतिसूक्ष्म वस्तु सतत पहात राहणे
सतत लख्ख प्रकाश पाहणे
अति दुःख
अति संताप
खूप दूरचे पाहणे
रात्री स्नान करणे
पायात चप्पल न घालणे
मलमूत्र या संवेदनांचा अवरोध करणे इत्यादी आहेत
तसेच आहारात अतिखारट पदार्थांचे सेवन
अति तेलकट
आंबट
नवीन धान्य
पावटा
तंबाखू दारू गुटखा यांचे अधिक प्रमाणात सेवन हे नेत्रास अहितकारक ठरते
अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीने नेत्रदृष्टी सतत कार्यरत राहावी म्हणून प्रयत्न करावेत कारण म्हटलेच आहे
असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी
If there is vision, the world will be visible.
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at vision on the occasion of June 10, which is observed as Eye Donation Day in memory of Dr. Bhalchandra.
Among the five sense organs of humans, the eyes are one important sense organ.
They have the ability to perceive all the objects and emotions in the world.
No matter how much wealth a blind person has, this world is meaningless to them, so every person should make efforts to protect their eyes until the end of life.
A person who, even with glasses and open eyes, cannot count the fingers of a hand from ten feet away in clear daylight is generally considered blind.
In this way, blindness in 60% of those considered blind can be cured through treatment.
Modern technology / / surgical methods / / / and medicines are available for many eye diseases.
Even so, the rate of blindness does not seem to be decreasing because
In today's era, regarding the eyes, from the perspective of diet and lifestyle - - -
it is observed that the necessary care is not being taken.
From the perspective of Ayurveda, to keep the light of our eyes healthy - - -
every person should massage the soles of their feet twice a week before going to sleep at night with sesame oil or cow's ghee.
If possible, it is best to do this massage using a bronze bowl.
In Ayurveda, this is called Padabhyanga.
During the summer season - - - preferably massage with cow's ghee.
While going out in the sun, to prevent smoke from coming into contact with the eyes,
and while traveling by vehicle - - to prevent very strong wind from coming into contact with the eyes,
it is beneficial to use goggles.
There should be sufficient light while reading or writing.
The TV should be watched from a distance of at least ten to twelve feet.
Also, one should not remain in front of any screen for more than one to two hours, whether that screen is a laptop or a mobile phone - - -
People who work in the IT sector will be given different guidelines, but for others, the total screen time from laptops, mobile phones, and TV combined should be no more than two hours per day.
To maintain good vision, practice Shirshasana / / / Surya Namaskar / / / Trataka / / / and blinking exercises.
If the eyes are burning or feel unclean, blink them repeatedly with clean water.
People with diabetes should have an eye examination every six months and seek appropriate medical advice.
Those who wear glasses should regularly use the correct prescription and have their prescription checked every year.
The diet should include foods with all types of tastes.
Red tomatoes
Carrots / / / spinach
Mango / / / coriander
Curry leaves / / / oranges / / / / sweet lime / / / / cow's ghee / / / honey / / / papaya / / / shatavari
Honey / // black raisins / / / / bitter gourd / / / / fresh bananas
Aged wheat / / / aged rice / / / cumin should be used.
Also, include plenty of cow's ghee / / / butter / / / milk in the diet.
If salt is to be used, rock salt should be preferred.
Also include drumstick - - - Indian gooseberry - - - cucumber - - - radish - - - red eggplant in the diet.
Among Ayurvedic medicines - -- Saptamrit Loha - - - Triphala Ghrita - - - Timiraghna capsules - - - Chakshushya capsules may be used.
Do not use any medicines without medical advice.
Things that are harmful to the eyes, that is, to vision, include - - -
Constantly looking at very tiny objects
Constantly looking at bright light
Excessive sorrow
Excessive anger
Looking at very distant objects
Bathing at night
Not wearing footwear
Suppressing the urge to pass urine or stool, etc.
Also, consuming excessively salty foods
Excessively oily
Sour foods
Newly harvested grains
Hyacinth beans
Excessive consumption of tobacco, alcohol, and gutkha is harmful to the eyes.
In this way, every person should make efforts to keep their eyesight functioning continuously because, as it is rightly said,
If there is vision, the world will be visible.

Comments