How should anger be managed
रागाचे व्यवस्थापन कसे असावे
राग / / लोभ / / / / द्वेष / / ईर्षा इत्यादी अनेक गोष्टी सजीवांची
लक्षणे आहेत म्हणजे सजीव असण्याचे प्रमाण आहे पण
या गोष्टी विशिष्ट प्रमाणात असतील तरच जीवन सुसह्य आहे अन्यथा
आपणास माहित आहेच
मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज रागाचे व्यवस्थापन कसे असावे ?
या विषयी बोलणार आहे
आपल्याला अपेक्षित न घडल्यास राग येतो
मुलांनी ऐकलं नाही तर राग
नवऱ्याने ऐकलं नाही तर राग
उदाहरण म्हणजे मी आज कोणाला मदत केली आणि उद्या माझ्यावर मदतीची वेळ आली तर समोरच्या व्यक्तीने मदत केली नाही तर मला राग येणे स्वाभाविक आहे पण तो राग किती यावा याला काही मर्यादा असाव्यात
राग आल्याने आपण स्वतःच आपली मानसिक स्वास्थ बिघडवून घेतो
मानसिक स्वास्थ्यासोबत शारीरिक स्वास्थ्य देखील बिघडते.
समोरच्याने आपल्याला मदत केली नाही याची देखील काही कारण असू शकतात
याचा विचार आपण करत नाहीत अथवा जाणून घेण्याचा
प्रयत्न देखील करत नाही फक्त मी मदत केली होती म्हणून
त्यांनी करायला हवी होती अशी अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे
याची जाणीव आपल्याला असायला हवी
नेहमी नेहमी राग येणाऱ्या व्यक्तींना समाजात
शेगडी
सटकी
सर्किट इत्यादी अनेक नावाने ओळखले जाते मग आपण आपली अशी ओळख समाजात ठेवायची आहे का ?
थोड्या प्रमाणात राग येणे अपेक्षित आहे
रागाची व्याख्या सांगतो
दुसऱ्याने केलेल्या चुकीची स्वत:ला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग
अति राग येणाऱ्यांना हार्ट अटेक येतो
ज्याच्यामुळे राग आला आहे त्याला काही एटेक येत नाही
म्हणून आपण स्वत:ला का म्हणून शिक्षा द्यावी ?
राग येण्याच्या प्रकारांमध्ये काही लोकांना लवकर राग येतो आणि ते लवकर विसरतात देखील
काही लोकांना राग येतो पण ते दीर्घकाळ लक्षात ठेवतात आणि
वेळ आली की परतफेड करतात
काही लोक दीर्घकाळ रागात राहून आपले स्वास्थ्य बिघडवीत असतात
कोणताही प्रकार असो
आपल्या स्वास्थ्यावर परिणाम व्हायला नको हे बघणे गरजेचे आहे
रागाच्या व्यवस्थापनात सर्वात पहिली गोष्ट लक्षात असावी ती म्हणजे अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका
एखाद्याला मदत करताना तर नक्कीच कोणती अपेक्षा ठेवू नका
दुसऱ्यांनी आपल्या सोबत कसे वागावे हे आपल्याला वाटत असते तसे आपण इतरांसोबत वागा पण तरी देखील अपेक्षा ठेवू नका
कोणत्याही परिस्थितीत आपले मानसिक बल कमी होणार नाही असे बघा
नेहमी चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या
आनंदी रहा
एखादी गोष्ट आपल्याला न मिळाल्यास - - - अगदी आपली योग्यता असून देखील - आपण डावलले गेले तरी देखील
कदाचित आपल्यापेक्षा दुसऱ्याला त्याची अधिक गरज असेल म्हणून निसर्गाने असे केले असे समजावे
निद्रानाश / / / ऍसिडिटी इत्यादी लक्षणे आजार हे देखील रागाचे मूळ कारण असू शकतात जर असे आजार किंवा लक्षण आपणास असतील तर आहारासोबत राग व्यवस्थापनाचा देखील विचार करावा
आपणास राग येत आहे हे ओळखावे आणि स्वतःवर नियंत्रण करावे अन्यथा आपले नियंत्रण दुसऱ्याकडे जाते
कोणत्याही रागानंतर लगेच प्रतिक्रिया देऊ नये
३० सेकंद शांत बसावे
खूप राग आल्यावर चेहरा - प्रसन्न / / हसरा ठेवा
रागावर नियंत्रणासाठी आयुर्वेदात पित्त शामक औषधी
आहार विहार सांगितलेला आहे त्यानुसार आहार हा सात्विक असावा
गायीच्या शुद्ध तुपाचा वापर अधिक प्रमाणात करावा
दूध तूप भात दुधाची खीर दूध आणि तूप सेवन करावे
औषधांमध्ये ब्राह्मी अश्वगंधा शंखपुष्पी वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्यात
नस्य शिरोधारा पादाभ्यंग संपूर्ण शरीराचे अभ्यंग स्वेदन बस्ती ही पंचकर्म वैद्यकीय सल्ल्याने दरवर्षी करून घ्यावीत
अशा प्रकारे स्वतःचे मनावर ताबा आणि आयुर्वेद माध्यमातून दीर्घायु स्वास्थ्यपूर्ण आरोग्याचा लाभ घ्यावा.
How should anger be managed
Anger / / Greed / / / / Hatred / / Jealousy etc. are many things that are characteristics of living beings
that is, they are signs of being alive but
only if these things are present in a certain proportion is life comfortable otherwise
you already know
I am Dr. Satish Vasant Shindadkar and today how should anger be managed ?
I am going to talk about this
We get angry when things do not happen as we expect
Anger if children do not listen
Anger if the husband does not listen
For example, if I helped someone today and tomorrow when I need help the other person does not help me, it is natural for me to get angry but there should be some limit to how much anger one should have
By getting angry we ourselves damage our own mental health
Along with mental health, physical health also deteriorates.
There may also be some reason why the other person did not help us
We do not think about this or even try to find out
we simply expect that just because I had helped them
they should have helped me, and this is wrong
We should be aware of this
People who get angry all the time are known in society
as
Shegdi
Satki
Circuit etc. by many names, so do we want to establish such an identity for ourselves in society ?
A little anger is expected
Let me give the definition of anger
Anger is the punishment one inflicts upon oneself for someone else's mistake
Those who get excessively angry suffer heart attacks
The person because of whom the anger arose does not suffer any attack
so why should we punish ourselves ?
Among the types of anger, some people get angry quickly and they also forget quickly
Some people get angry but remember it for a long time and
when the time comes they retaliate
Some people remain angry for a long time and damage their health
Whatever the type
it is important to ensure that our health is not affected
The very first thing to remember in anger management is do not keep expectations from anyone
Especially when helping someone, do not keep any expectations at all
Treat others the way you would like them to treat you, but still do not keep expectations
Make sure that under no circumstances will our mental strength decrease
Always keep a pleasant expression on your face
Stay happy
If we do not get something we want - - - even though we are qualified - even if we are overlooked
we should understand that perhaps someone else needs it more than us and therefore nature has made it so
Insomnia / / / Acidity etc. symptoms and illnesses can also be the root cause of anger, if you have such illnesses or symptoms, along with diet, anger management should also be considered
Recognize that you are getting angry and control yourself otherwise control passes to someone else
Do not react immediately after any anger
Sit quietly for 30 seconds
When very angry, keep the face - pleasant / / smiling
For controlling anger, Ayurveda has prescribed pitta-pacifying medicines
diet and lifestyle, accordingly the diet should be sattvic
Use pure cow's ghee in greater quantity
Milk Ghee Rice Milk pudding consume milk and ghee
Among medicines, Brahmi Ashwagandha Shankhpushpi should be taken under medical advice
Nasya Shirodhara Padabhyanga full body Abhyanga Swedana Basti should be done every year as Panchakarma under medical advice
In this way, by gaining control over one's own mind and through Ayurveda, one should benefit from long-lived, healthy well-being.

Comments