How can chemical residues in fruits and vegetables be reduced?
- Satish Shindadkar
- Aug 14
- 6 min read
फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ?
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात
रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?
जेणेकरून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम आपण
कसे टाळू शकतो ? या विषयी बघणार आहोतज्या वेळेला शेतकरी अन्नधान्य तयार करतो म्हणजे
शेतामध्ये अन्नधान्याची लागवड करतो
अगदी त्या लागवडीपासून
कीटकनाशक तणनाशक बुरशीनाशक
उंदीर नाशक यांचा वापर केला जात असतो आणि
ही सर्व केमिकल्स असतात रसायन असतात
या रसायनांचा दुष्परिणाम हा पुढे आपल्या आयुष्यामध्ये
आपल्याला होत असतो
केवळ शेतीमध्येच या रसायनांचा वापर केला जातो असे नसून
अन्न साठवण्यासाठी अन्न टिकवण्यासाठी सजावटीसाठी
चवीसाठी देखील आपण अनेक रसायनांचा
केमिकल्स चा वापर दैनंदिन जीवनामध्ये
अन्नधान्याच्या बाबतीत करत असतोया सर्व केमिकल्सचा म्हणजेच रसायनांचा आपल्या शरीरावर
जो दुष्परिणाम होतो त्याने आयुष्य कमी होत आहे
अनेकांना पचनाचे विकार मानसिक विकार गति मंदत्व
मति मंदत्व हाय ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाब
डायबिटीस / मधुमेह थायरॉईड
विविध प्रकारचे हृदयाच्या संदर्भातील किडनीच्या संदर्भातील आजार
कॅन्सर लिव्हरचे आजार डोळ्यांचे आजार इ. निर्माण होत आहेत
प्रामुख्याने स्किन डिसीज म्हणजे त्वचेचे आजार देखील याच मुळे
निर्माण होत आहेत - - - या सर्व आजारांना
आपल्याला टाळायचं असेल
याची लक्षणे कमी करायची असतील तर नेमकं काय
करायला हवं या विषयी
आपण आज चर्चा करणार आहोतउत्पादन वाढीसाठी केमिकल्स म्हणजेच रसायनांच्या फवारण्या
जमिनीतून देणं हे आवश्यक आहे परंतु
शेतकऱ्यांनी याचा वापर कमी प्रमाणात करणं आवश्यक आहे
त्याच पद्धतीने त्याची काही नियम ठरलेले आहेत - - -
१. फवारण्या झाल्यानंतर 12 ते 14 दिवसानंतर भाज्या / फळ काढणे आवश्यक असते
साधारणतः स्ट्रॉबेरी द्राक्ष पालक पीयर्स भेंडी संत्री,
शिमला मिरची कोबीचे सर्व प्रकार यामध्ये
केमिकल्स खूप अधिक प्रमाणात आढळत आहे आणि
कोणत्याही प्रकारे या भाज्या किंवा फळ वरच्यावर धुवून
किंवा भिजवून त्यातील प्रभाव फारसा कमी होत नाही
असे संशोधना अंती आढळलेले आहेअनेक व्यक्ती मिठाच्या पाण्यामध्ये भिजत टाकतात किंवा
फळ भाज्या यांना काही काळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवतात
स्वच्छ धुऊन घेतात
त्याच्याने काही प्रमाणात ही अवशेष कमी होऊ शकतात परंतु
पूर्णपणे याचे दुष्परिणाम निघत नसतात म्हणून
मनुष्याने आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली दिनचर्या
ऋतुचर्या
नियमित अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराची विशिष्ट तेलाद्वारे आपल्या प्रकृतीला अनुसरून वैद्यकीय सल्ल्याने केलेली मसाज
स्टीम बाथ / / / / घाम येईल अशा पद्धतीने केलेले प्रयोग
उदवर्तन म्हणजे उटणे लावणे,
प्राणायाम ध्यानधारणा इत्यादींचा वापर करणे
अत्यंत गरजेचं असतं
दिनचर्या या सदरामध्ये प्रत्येक मनुष्याने सकाळी किती वाजता उठाव
ते रात्री किती वाजता झोपावं तसेच
ऋतुचर्या म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये कशा पद्धतीचा
आपला आहार आणि विहार असावा याचे जे वर्णन
आयुर्वेदाने केलेले आहे
ते पाळण अत्यंत गरजेचे आहे
ते आपण इतर आपल्या youtube च्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीने योग्य वेळेला योग्य ऋतूमध्ये
पंचकर्म करण तितकेच महत्त्वपूर्ण आहे
वैद्यकीय सल्ल्याने शरद ऋतूमध्ये विरेचन
वसंत ऋतूमध्ये वमन
वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळ्यामध्ये बस्ती इत्यादी
प्रक्रिया करून घ्याव्यात
आपला जाठराग्नी म्हणजेच पचनशक्ती उत्तम राहावी यासाठी
आयुर्वेदाने वर्णन केलेल्या आहार विधीचे पालन करणे
अत्यंत आवश्यक आहे
रोज योग्य वेळी आहार घेणं
आहारामध्ये सर्व प्रकारच्या चवींचा समावेश करणं हे
तितकच महत्त्वपूर्ण आहे
नियमित व्यायाम / / / नियमित आहार हीच आरोग्याची खरी
गुरुकिल्ली आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत
आपल्याला केमिकल्स पासून वाचायचं असेल तर
केमिकल्स चा कमीत कमी वापर आपण
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे जसे
अगदी सकाळी उठल्यापासून आपण आंघोळीच्या वेळी
जे साबण किंवा शाम्पूचा वापर करतो त्याला
टाळून उटणे शिकेकाई काही इत्यादींचा वापर करावा
म्हणजे आपण सकाळपासून केमिकल मुक्त जीवन जगू शकतो
पुढे आहाराच्या बाबतीत विचार केला असता
कुठल्याही प्रकारे संरक्षित केलेल्या पदार्थांना टाळलं पाहिजे
त्याच पद्धतीने केमिकल्स असणारे तसेच
भरपूर सोडा असणारे पदार्थ वापरू नयेत घरचे जेवण गरजेचं आहे
आपल्या घरी गच्चीवर अंगणात बाल्कनीमध्ये रोजचा भाजीपाला पिकवल्यास फारच उत्तम त्यात प्रामुख्याने
अळूची पानं गिलके भोपळा दोडके टमाटे मिरची
हळद आलं गवती चहा चीवई ची भाजी मेथी
कोथिंबीर पालक यांचा समावेश होऊ शकतो म्हणजेच
आपण शंभर टक्के
सेंद्रिय भाजीपाला आपल्या घरी तयार करू शकतोज्यांच्या घरी मोठे अंगण असेल असे व्यक्ती
अंजीर, पेरू, सीताफळ, शेवगा इ. झाड देखील लावू शकतात
सुवर्ण भस्म च्या अनेक औषधी बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा
वैद्यकीय सल्ल्याने लंघन, उपवास केल्याने शरीरातील विषारी परिणाम नष्ट होण्यास मदत होते.
या पद्धतीने जर आपण नियम करून घेतले तर निश्चितच
केमिकल्स च्या दुष्परिणामां पासून आपण दूर राहू शकतो.
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at how the chemicals
and substances present in our food
can be reduced?
So that we can
avoid the harmful effects on our body? We are going to look at this
today.
When a farmer produces food grains, that is,
when food grains are cultivated in the field,
right from the cultivation stage,
insecticides, herbicides, fungicides,
rodenticides are used, and
all these are chemicals and substances.
The harmful effects of these chemicals later
affect us in our lives.
These chemicals are not used only in agriculture;
for storing food, preserving food, for decoration,
and for taste as well, we use many chemicals
and substances in our daily lives
with regard to food grains.
The harmful effects of all these chemicals, that is, substances, on our body
are causing life expectancy to decrease.
Many people are developing digestive disorders, mental disorders, slowness of movement,
intellectual disability, high blood pressure, that is, hypertension,
diabetes / mellitus, thyroid disorders,
various types of heart-related kidney-related diseases,
cancer, liver diseases, eye diseases, etc.
Primarily, skin disease, that is, skin disorders, are also
developing because of this - - - if we want to
avoid all these diseases,
if we want to reduce their symptoms, then exactly what
should we do? About this
we are going to discuss today.
For increasing production, spraying chemicals, that is, substances,
and applying them through the soil is necessary, but
farmers need to use them in smaller quantities.
Similarly, there are some rules laid down for their use - - -
1. After spraying, it is necessary to harvest vegetables / fruits after 12 to 14 days.
Generally, strawberries, grapes, spinach, pears, okra, oranges,
capsicum, all types of cabbage contain
chemicals in very high quantities, and
it has been found through research that in no way does simply washing
or soaking these vegetables or fruits
reduce their effects to a great extent.
Many people soak them in salt water or
keep fruits and vegetables soaked in water for some time,
and wash them thoroughly.
This can reduce the residues to some extent, but
their harmful effects are not completely eliminated. Therefore,
one should follow the daily routine described in Ayurveda,
seasonal regimen,
regular Abhyanga, that is, a massage of the entire body with a specific oil according to one's constitution under medical advice,
steam bath / / / / practices that induce sweating,
Udvartana, that is, applying herbal powder,
pranayama meditation, etc.
are extremely necessary.
In the section on daily routine, Ayurveda describes
what time every person should wake up in the morning
and what time they should sleep at night, as well as
Ritucharya, that is, what kind of
diet and lifestyle one should follow in each season.
It is extremely important
to follow what Ayurveda has described.
We have described this through our other YouTube
medium as well. In the same way, performing
Panchakarma at the appropriate time and in the appropriate season
is equally important.
Under medical advice, Virechana should be performed in Sharad Ritu,
Vamana in Vasant Ritu,
and Basti, etc., during Varsha Ritu, that is, the rainy season.
To keep our Jatharagni, that is, digestive power, excellent,
it is extremely necessary to follow the dietary regimen described by Ayurveda.
Eating at the right time every day,
and including all types of tastes in the diet
is equally important.
Regular exercise / / / regular diet is the true
key to health. Therefore, under any circumstances,
if we want to protect ourselves from chemicals,
we should use chemicals as little as possible
in our daily lives, such as
right from getting up in the morning, when we bathe,
instead of using the soap or shampoo
we should avoid them and use herbal powder, shikakai, etc.
In this way, we can live a chemical-free life from the morning itself.
Further, when considering diet,
we should avoid foods that have been preserved in any way.
Similarly, foods containing chemicals as well as
foods containing a lot of soda should not be used.
Home-cooked food is necessary.
If we grow daily vegetables on the terrace, in the courtyard, on the balcony at home, it is very good. These can primarily include
taro leaves, ridge gourd, pumpkin, sponge gourd, tomatoes, chilli,
turmeric, ginger, lemongrass, chivai greens, fenugreek,
coriander, spinach, which means
we can produce
one hundred percent
organic vegetables at home.
People who have a large courtyard at home
can also plant trees such as figs, guava, custard apple, drumstick, etc.
Many medicinal preparations containing Suvarna Bhasma are available in the market; they should be used under medical advice.
Under medical advice, Langhana and fasting can help eliminate toxic effects from the body.
If we make rules for ourselves in this way, then certainly
we can stay away from the harmful effects of chemicals.

Comments