top of page
logo.png

Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 13
  • 4 min read

प्रेग्नेंट म्हणजे गर्भवती महिलेने कोणती फळे सेवन करावित

 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

प्रेग्नेंट म्हणजेच गर्भवती महिलेने कोणत्या प्रकारची फळं 

केव्हा आणि कशी सेवन करावीत  या विषयी बघणार आहोत

फळांचा विचार केला असता ताजी फळ आणि सुकवलेली / /  

वाळलेली ज्याला आपण ड्रायफ्रूट्स म्हणतो

असे दोन प्रकार येतात 

शक्यतो कोणत्याही व्यक्तीसाठी ताजी फळ ही श्रेष्ठ असतात 

प्रेग्नेंट म्हणजेच गर्भिणी महिलेचा विचार केला असता

पपई / / /  अननस आणि फणस या तीन फळांचे सेवन

वर्ज्य करणे गरजेचे आहे 

अन्य फळांच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने नियम असे आहे की

जी फळे सेवन केली जाणार आहेत ती ताजी असावीत 

कुठल्याही प्रकारे शीतगृहात संरक्षित केलेली नसावीत 

फळं सेवन करत असतांना भोजनाच्या म्हणजेच

जेवणाच्या अर्धा तास अगोदर सेवन करावीत 

फळांचे रस म्हणजेच ज्यूस काढून सेवन करण्यापेक्षा

फळे कापून आणि आंब्यासारखी फळे पिळून सेवन करावीत 

जेणे करून शरीराला फायबर प्राप्त होतील. 

पोट साफ न होण्याची समस्या दूर होईल तसेच

भरपूर वेळेला ज्यूस सेवन करत असताना त्यात साखर किंवा

अन्य काही गोष्टी टाकल्या जातात

तर अनेक वेळा बाजारातून प्रीझर्व्ह केलेली ज्यूस सेवन केली जातात

असे ज्यूस गर्भवती साठी अयोग्य आहेत.

साधारणतः ज्या ऋतूमध्ये जी फळे येतात ती सेवन करणे उत्तम असतं

परंतु चव बदल म्हणून एखादे फळ थोड्या प्रमाणात

सेवन करण्यास हरकत नाही 

केळी किंवा अनेक फळांच्या बाबतीत शक्यतो ती फळं 

कुठल्याही रासायनिक पद्धतीने पीकवलेली नाहीत असेल बघावे 

गर्भवती महिलांसाठी गोड मोसंबी

गोड संत्री

केळी

आंबा

ड्रॅगन फ्रुट

चिकू इत्यादी उत्तम असतात 

शहाळ्याचे पाणी आणि त्यातील मलई गर्भवती साठी उत्तम असते.

बाळाचे वजन कमी असेल तर ज्या शहाळ्यात मध्यम मलई

असेल असे निवडून त्यातील गोड मधुर पाणी घ्यावे आणि

सोबत त्यातील मलई देखील सेवन करावी

यामुळे बाळाचे वजन वाढते तसेच

गर्भातील पाणी देखील योग्य टिकून राहते.

ज्या महिलेचे वजन अधिक असते अशा महिलेने मलई नसणारे

नारळ पाणी प्यावे असे नारळ पाणी चवीस थोडे तुरट गोड असते.

ड्राय नट्स चा विचार केला असता अक्रोड आणि  

रात्री भिजवून सकाळी सेवन केलेले बदाम

उत्तम असतात

अक्रोड साधारणता एक ते दोन या प्रमाणात आणि बदाम

दोन ते तीन या प्रमाणात सेवन करावेत तसेच

याच्या सोबत चार ते आठ काळी मनुका सेवन केल्यास उत्तम

असे हे ड्राय नट्स सकाळच्या वेळी सेवन करावेत परंतु

ज्या गर्भवती महिलेस सकाळी मळमळ किंवा उलटी

याचा त्रास होत असेल त्यांनी हे ड्राय नट्स सेवन करणे टाळावे

किमान सकाळच्या वेळेला तरी हे सेवन करू नयेत 

पीस्ते काजू त्यांचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात

किंवा क्वचित सेवन करावेत 

अन्यथा ते उष्णता वाढवतात  

Dry fruits मधील अंजीर हे देखील उत्तम असते तर ताजे अंजीर श्रेष्ठ असते.

अशा प्रकारे गर्भिणीने योग्य वेळी म्हणजेच भोजनाच्या

अर्धा तास अगोदर फळांचे सेवन केल्यास

निश्चितच ते गर्भवती महिलेसाठी आणि बाळासाठी पोषण करणारे ठरत असते 

योग्य प्रमाण म्हणजे साधारणत: दिवसाला

एक ते दोन फळे सेवन केल्यास ते आरोग्यदायक ठरत असते 

 

 

 

 

Best Fruits for Pregnancy Safe Eating Tips for Expecting Mothers

Fruit can be a simple, nourishing snack during pregnancy, but the right choice, portion, and timing matter. Fresh fruits give fibre, fluids, vitamins, and natural sugars, which can help with digestion, energy, and hydration.

This guide is informational only. Pregnancy needs can differ, so follow your doctor’s advice, especially if you have diabetes, acidity, allergies, or a high-risk pregnancy.

Fruits that are usually good during pregnancy

Choose fresh, seasonal, well-washed fruits whenever possible. Good options include:

Apples for fibre and gentle sweetness

Bananas for energy and potassium

Oranges and sweet lime for vitamin C and fluids

Pomegranate for antioxidants and iron-supporting nutrients

Guava for fibre and vitamin C

Chikoo, grapes, and mango in moderate portions if blood sugar is normal

Eat whole fruit more often than juice. Whole fruit keeps fibre intact and reduces sudden sugar spikes.

Fruits to avoid or limit with care

Some fruits are commonly avoided during pregnancy in India, especially in large amounts or when unripe.

Papaya 

Raw or semi-ripe papaya contains latex-like compounds, which may trigger uterine contractions in sensitive cases. Avoid raw papaya. If considering ripe papaya, ask your doctor first.

Pineapple 

Pineapple contains bromelain. Normal food quantities may not affect everyone, but many doctors advise caution, especially in early pregnancy or high-risk cases.

Jackfruit 

Jackfruit can feel heavy to digest and may cause gas or discomfort. It is also naturally sweet, so limit it if you have gestational diabetes.

When and how to eat fruit

Have fruit as a mid-morning or evening snack, not immediately after a heavy meal. Wash, peel where needed, and cut just before eating.

A practical daily pattern can be:

1 to 2 servings of fresh fruit per day

Small portions at a time

Avoid fruit late at night if it worsens acidity

Coconut water, malai, and dry fruits

Tender coconut water helps hydration and may feel soothing during nausea or heat. The soft malai gives healthy fats, but eat it in moderation.

Dry fruits are nutrient-dense, so small amounts are enough. Soaked almonds, walnuts, and figs can be useful. Try 4 to 6 almonds, 1 to 2 walnuts, or 1 fig, based on digestion and medical advice.

FAQ

Can pregnant women eat fruit every day?

Yes, most can eat fresh fruit daily in moderate portions, unless advised otherwise.

Is fruit juice healthy during pregnancy?

Whole fruit is usually better because it has fibre and less concentrated sugar.

Are dry fruits safe in pregnancy?

Yes, in small amounts. Soaking almonds or figs can make them easier to digest.

Which fruit is best for hydration?

Orange, sweet lime, watermelon, and tender coconut water can support hydration.

Takeaway

The safest approach is simple: eat fresh, seasonal fruits in small portions, avoid risky or hard-to-digest choices, and time fruit between meals. With the right balance, fruit can be a healthy part of pregnancy nutrition.

 

Recent Posts

See All
Fresh Coconut Health Benefits and Easy Ways to Add It to Daily Meals

रोजच्या आहारात ओल्या नारळाचा समावेश करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ओल्या नारळाचा आपल्या दैनंदिन आहारात कसा समावेश करून घेता येईल जेणेकरून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकू याबद्दल बघणार

 
 
 
How can chemical residues in fruits and vegetables be reduced?

फळ आणि भाज्यांमधील रसायनांचे ( केमिकल्सचे ) अवशेष कसे कमी करता येतील ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आपल्या खाद्यपदार्थांमध्ये जे काही केमिकल्स असतात रसायन असतात ते कसे कमी करता येतील ?

 
 
 
Enrich life with fresh fruits

ताज्या फळांनी जीवन समृद्ध करा बहुतेकांना असं वाटतं की त्यांनी त्यांच्या मुख्य जेवणासोबत फळ खाल्ले तर ते निरोगी राहण्यासाठी अत्यंत उत्तम असतात परंतु असे नसते म्हणूनच मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

 
 
 

Comments


bottom of page