Heart Disease and Salt
Updated: 4 days ago

हृदयविकार आणि मीठ
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - हृदयविकार असणाऱ्यांसाठी तसेच आपल्याला भविष्यामध्ये - - - हृदयविकार होऊ नये यासाठी पाकशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक - - मीठ या बद्दल बघणार आहोत - - -- -
मिठा शिवाय कोणतेही अन्नपदार्थ हे बेचव असतात
व्यंजनांमध्ये मीठ नसल्यास आपण पदार्थ सेवन करू शकत नाही
मीठाचे प्रमाण अधिक झाले तरी देखील आपण असे अन्नपदार्थ सेवन करू शकत नाही म्हणजेच योग्य प्रमाणात मीठ आहारात असल्यास ते पदार्थ चविष्ट होत असतात
मिठाचे शास्त्रीय नाव सोडियम क्लोराइड असे आहे
सोडियम शिवाय शरीरातील कोणत्याही पेशींचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही
किंबहुना रक्तातील सोडियमची प्रमाण एका विशिष्ट पातळीखाली गेले की मज्जा संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतात
परंतु हेच प्रमाण अधिक झाल्यास
उच्च रक्तदाब
हृदयविकार आणि अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण होऊ शकतात
म्हणून मीठ हे प्रमाणातच सेवन करावे
शरीरात मिठाचे प्रमाण अधिक गेल्यास म्हणजेच
सोडियम हा क्षार शरीरात अधिक वाढला तर शरीरातील इतर भागात पेशींमध्ये पाणी चे प्रमाण वाढते आणि सूज येत असते म्हणजेच
शरीरावर अतिरिक्त सूज येते
यामुळे हृदयाच्या स्पंदन क्रियेचा वेग वाढवून
हृदयाच्या कार्यशक्तीवर याचा परिणाम होतो
सर्वसाधारणतः मनुष्याला रोज जास्तीत जास्त ४ ग्रॅम पर्यंत मिठाची आवश्यकता असते
जे व्यक्ती अधिक परिश्रम करतात / / घाम गाळतात म्हणजे
ज्यांना अधिक प्रमाणात घाम येतो
अशा व्यक्तींसाठी ५ ते ६ ग्रॅम प्रतिदिन ही मिठाची गरज असते परंतु
अनेक व्यक्ती लोणची / / / पापड / / चटण्या / / फास्टफूड / / खारवलेले अन्न याच्याद्वारे अधिक प्रमाणात मिठाचे सेवन करीत असतात
काही व्यक्ती प्रत्येक पदार्थावर वरून मीठ घेत असतात
फळांवर देखील वरून मीठ घेण्याची सवय अनेकांना असते त्यामुळे
सहाजिकच ४ ग्रॅम पेक्षा अधिक प्रमाणात मीठ शरीरामध्ये जाते
या व्यतिरिक्त सोडा असणारे पदार्थ
ब्रेड
केक
शीतपेय म्हणजे कोल्ड्रिंक्स इत्यादीं मधून देखील अधिक प्रमाणात
मिठाचे किंवा क्षाराचे म्हणजेच सोडियमचे सेवन आपण करीत असतो
क्वचित प्रसंगी आपल्या आहारात एखाद्या पदार्थांमध्ये मीठ टाकणे विसरले जाते अशा वेळी वरून मीठ घेऊ नये
ज्या व्यक्तींना हृदयविकार
उच्च रक्तदाब
किडनीचे विकार इत्यादी असतात त्यांनी
आहारामध्ये एका दिवसाला ३ ग्रॅम पेक्षा अधिक प्रमाणात मिठाचं सेवन करू नये
अशा प्रकारे हृदयविकार किंवा अन्य विकार असणाऱ्या व्यक्तींनी
मिठाचे प्रमाणात सेवन करावे तसेच
भविष्यात आपल्याला हे आजार होऊच नयेत म्हणून
४ ग्रॅम पेक्षा कमी प्रमाणात प्रति दिन मिठाचे सेवन करावे
Heart Disease and Salt
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar, today we are going to look at - - - for those who have heart disease as well as to prevent - - - heart disease in the future, an extremely important ingredient in culinary science - - salt - - -- -
Without salt, any food item is bland
If there is no salt in dishes, we cannot consume the food
Even if the amount of salt is excessive, we cannot consume such food, meaning that if salt is present in the diet in the right amount, the food becomes tasty
The scientific name of salt is sodium chloride
Without sodium, the functioning of any cells in the body cannot take place properly
In fact, when the level of sodium in the blood falls below a certain level, it adversely affects the nervous system
But if this level becomes excessive
high blood pressure
heart disease and many other serious illnesses can develop
Therefore, salt should be consumed only in moderation
If the amount of salt in the body becomes excessive, that is,
if the mineral sodium increases excessively in the body, the amount of water in the cells in other parts of the body increases and swelling occurs, meaning
there is additional swelling in the body
This increases the rate of the heart's beating action
and affects the heart's functioning capacity
Generally, a person needs a maximum of up to 4 grams of salt per day
People who do more physical exertion / / sweat, meaning
those who sweat more
such people need 5 to 6 grams of salt per day, but
many people consume excessive amounts of salt through pickles / / / papad / / chutneys / / fast food / / salted foods
Some people add salt on top of every dish
Many people also have the habit of adding salt on top of fruits, therefore
naturally, more than 4 grams of salt enters the body
In addition to this, foods containing soda
bread
cake
soft drinks, meaning cold drinks, etc., also contain excessive amounts of
salt or minerals, that is, sodium, which we consume
On rare occasions, we may forget to add salt to a food item in our diet, in such a case, salt should not be added on top
People who have heart disease
high blood pressure
kidney disorders, etc., should
not consume more than 3 grams of salt per day in their diet
In this way, people with heart disease or other disorders should
consume salt in moderation, as well as
so that we do not develop these diseases in the future
consume less than 4 grams of salt per day


Comments