Enlarged Tonsils
- Satish Shindadkar
- Aug 6
- 6 min read
टॉन्सिल्स वाढणे
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - आज आपण टॉन्सिल्स वाढणे या आजारा विषयी बघणार आहोत - - - - - अगदी मोठ्या शहरांपासून खेडेगावांपर्यंत सर्वत्र टॉन्सिल्स काढणे ही एक फॅशन झाली आहे - - - - असं म्हटल्यास चुकीचं होणार नाही टॉन्सिलच्या संदर्भात थोडा देखील त्रास आहे - - असे वाक्य डॉक्टरांच्या तोंडून ऐकताच - - - रुग्णांचे नातेवाईक किंवा स्वतः रुग्ण डॉक्टरांना सल्ला देतात - - - - टॉन्सिल्स काढून टाका
मानवाच्या शरीरात असणाऱ्या प्रत्येक अवयवाचे आरोग्य दृष्टीने महत्त्व असते - - - - अगदीच उपायच नसल्यास एखादा अवयव - - - शस्त्र कर्म द्वारे काढला जाऊ शकतो
मनुष्य शरीरात टॉन्सिल्स हे घशात दोनही बाजूला असतात - - - हे मानवी शरीरातील गार्ड आहेत - - - कारण घशात किंवा त्यापुढे धूळ किंवा अन्य कोणतेही इन्फेक्शन शरीरात प्रवेश करू नये याची ते काळजी घेत असतात
अनेक वेळा थंड हवामान सर्दी इत्यादी गोष्टींमुळे टॉन्सिल्सला- - - - सूज येते आणि अशा प्रकारची सूज थोड्या औषधोपचाराने बरी होऊ शकते - - - - - - - - परंतु जेव्हा टॉन्सिलला खूप सूज येऊन ते सेप्टिक बनतात - - - - किंवा कोणत्याही औषधींचा त्यांच्यावर परिणाम होत नाही अशा वेळी शस्त्रक्रमाद्वारे त्यांचे निर्हरण करणे आवश्यक असते
टॉन्सिल्स वाढण्याच्या प्रमुख कारणांमध्ये - - थंड पदार्थांचे नित्य नियमाने सेवन - - - थंड वारा - - - पावसात भिजणे तसेच अति बोलणे - - - - गरम आणि थंड पदार्थ आलटून पालटून घेत राहणे म्हणजेच गरम चहा घेतल्यानंतर लगेच एखादे कोल्ड्रिंक्स घेणे इत्यादी - - - - - - - - काही व्यक्तींना नेहमी सर्दी / / / कफ / / / / खोकला / / / ताप असे विकार असतात - - - - - त्यांचे देखील टॉन्सिल्स वाढू शकतात
टॉन्सिल्स वाढणे या व्याधीच्या प्रमुख लक्षणे मध्ये - - - - टॉन्सिल ग्रंथींना सूज येते - - -घशाच्या आतील बाजूला स्वच्छ प्रकाशाद्वारे बघितल्यास - - - दोन्ही बाजूस लाल वाढलेल्या ग्रंथी दिसतात - - - - - सोबत आतील बाजूचा संपूर्ण घसा लालसर दिसतो - - - - संपूर्ण शरीरात ताप येतो - - - - गिळताना त्रास होतो - - - - बोलणे देखील त्रासदायक असते किंवा आवाज बसतो - - - - - तसेच घशात सुई टोचल्यासारख्या वेदना - - - - खवखव होणे - - - - - सर्दी / / खोकला विकार वाढतात - - - - भूक मंदावते - - - - - - लहान मुलांच्या बाबतीत उंची वाढत नाही किंवा उंची वाढण्याची प्रक्रिया संथ होते - - - - - - कानातून पु येतो किंवा कान ठणकतो इत्यादी लक्षणांवरून टॉन्सिल्स वाढलेले आहे असे समजावे
वरील लक्षण दिसल्यास सर्वप्रथम मीठ आणि कोमट पाणी यांच्या गुळण्या दिवसातून चार ते पाच वेळा केल्यास त्रास कमी होऊ शकतो
कोमट पाणी आणि मिठासोबत हळद टाकल्यास उत्तम परिणाम होऊ शकतो
तसेच गरम पाणी किंवा इतर गरम द्रव स्वरूपाचा आहार घेतल्यास बरे वाटते
कोमट पाण्याच्या गुळण्या करणे आवश्यक आहे यामुळे टॉन्सिल ग्रंथींना शेक होऊन सूज कमी होण्यास मदत होते
सर्दी / / / कफ - - - - खोकला यासाठी त्रिभुवन कीर्ती - - - - सितोपलादि चूर्ण - - - - कांचनार गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी लक्ष्मी विलास रस इत्यादी औषधी वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्यात
कोणत्याही औषधी उपचारांचा फरक पडत नसेल तरच शस्त्र कर्म हाच एक खात्रीशीर मार्ग यात असतो
पथ्य पथ्य संदर्भात विचार केल्यास हा आजार लहान मुलांना अधिक प्रमाणात आढळून येत असल्यामुळे - - - - बालकांना थंड पदार्थांपासून दूर ठेवावे जसे आईस्क्रीम - - - कोल्ड्रिंक बर्फाचे गोळे - - - फळांना फ्रीजरमध्ये ठेवून बर्फ रूपात खाणे उदाहरणार्थ द्राक्ष फ्रिजरमध्ये ठेवून गोठवून बर्फाप्रमाणे चावून खाणे - - - - - फ्रीजचे पाणी - - - - पावसात भिजणे तसेच दुधाचे पदार्थ / / / तेलकट तळलेले पदार्थ / / / आंबट पदार्थ सेवन करणे टाळावे सर्दी / / ताप / / कफ / / खोकला होऊ नये अशा पद्धतीने आपली वर्तवणूक असावी
आहारात लसूण / / पुदिना / / ओली हळद / / तुळस चटणी स्वरूपात असावी
नेहमी कोमट पाणी प्यावे
ज्वारीचा घाटा उत्तम द्रव आहार आहे
घसा आणि गळा यांना थंड हवा लागू नये या दृष्टीने खबरदारी घ्यावी
अति बोलणे टाळावे
अशा प्रकारे वेळीच उपचार केल्यास टॉन्सिल काढण्याची गरज नसते
Enlarged Tonsils
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - Today we are going to look at the illness of enlarged tonsils - - - - - From big cities to villages, removing tonsils has become a fashion everywhere - - - - It would not be wrong to say so. If there is even a slight problem related to the tonsils - - as soon as patients hear such words from doctors - - - the patient's relatives or the patient themselves advise the doctors - - - - Remove the tonsils.
Every organ in the human body has importance from a health perspective - - - - Only if there is absolutely no other option can an organ - - - be removed through surgery.
In the human body, the tonsils are located on both sides of the throat - - - They are the guards of the human body - - - because they help prevent dust or any other infection from entering the body through the throat or beyond.
Many times, due to cold weather, colds, etc., the tonsils become- - - - swollen, and this type of swelling can be cured with a little medical treatment - - - - - - - - However, when the tonsils become very swollen and septic - - - - or when no medicines have any effect on them, then it becomes necessary to remove them through surgery.
Among the main causes of enlarged tonsils are - - regular consumption of cold foods - - - cold wind - - - getting drenched in the rain as well as excessive talking - - - - repeatedly consuming hot and cold foods alternately, such as drinking a hot cup of tea and immediately having a cold drink afterward, etc. - - - - - - - - Some people frequently suffer from colds / / / phlegm / / / / cough / / / fever - - - - - their tonsils may also become enlarged.
Among the main symptoms of enlarged tonsils - - - - the tonsil glands become swollen - - -if the inside of the throat is examined with proper light - - - enlarged red glands are visible on both sides - - - - - along with this, the entire inner throat appears reddish - - - - fever develops throughout the body - - - - there is difficulty swallowing - - - - speaking also becomes painful or the voice becomes hoarse - - - - - there is also pain in the throat like being pricked by a needle - - - - soreness - - - - - colds / / cough disorders worsen - - - - appetite decreases - - - - - - in the case of small children, height does not increase or the process of growing taller becomes slow - - - - - - pus comes from the ear or there is throbbing ear pain, etc. These symptoms indicate enlarged tonsils.
If the above symptoms appear, first of all, gargling with salt and lukewarm water four to five times a day may reduce the discomfort.
Adding turmeric to lukewarm water and salt may produce even better results.
Likewise, drinking warm water or consuming other warm liquid foods provides relief.
It is necessary to gargle with lukewarm water because it warms the tonsil glands and helps reduce the swelling.
For colds / / / phlegm - - - - cough, medicines such as Tribhuvan Kirti - - - - Sitopaladi Churna - - - - Kanchanar Guggulu, Triphala Guggulu, Arogyavardhini Lakshmi Vilas Ras, etc., should be taken under medical advice.
Only if medicinal treatment has no effect is surgery the only reliable option.
Considering dietary precautions, since this illness is more commonly seen in small children - - - - children should be kept away from cold foods such as ice cream - - - soft drinks, ice candies - - - eating fruits after keeping them in the freezer until frozen, for example, freezing grapes in the freezer and chewing them like ice - - - - - refrigerator water - - - - getting drenched in the rain as well as avoiding milk products / / / oily fried foods / / / sour foods. One should behave in a way that prevents colds / / fever / / phlegm / / cough.
The diet should include garlic / / mint / / fresh turmeric / / basil in the form of chutney.
Always drink lukewarm water.
Jowar gruel is an excellent liquid diet.
Care should be taken to prevent the throat and neck from being exposed to cold air.
Avoid excessive talking.
With timely treatment in this way, there is no need to remove the tonsils.

Comments