top of page
logo.png

Easy safe delivery in your hands

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 11
4 min read

सुलभ सुरक्षित प्रसूती आपल्या हाती

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - -  आज आपण सुलभ आणि सुरक्षित प्रसूती ही कशी आपल्या हातात आहे - - - या बद्दल बघणार आहोत

परमेश्वराने स्त्रीला दिलेली एक महान देणगी म्हणजे आई होणे 

हा स्त्री जन्मातील सर्वात सुखद अनुभव असतो

गर्भावस्था राहणं संपूर्ण घरामध्ये एक आनंदाचा उत्सव असतो

केवळ सासरकडचीच मंडळी नव्हे तर माहेरची मंडळी देखील गर्भिणी अवस्थेचा आनंद उत्सव साजरा करीत असतात सोबत

आप्त / /  मित्र मैत्रिणी आणि परिचित देखील आपापल्या परीने त्या गर्भिणीची काळजी घेत असतात

या काळजी सोबतच गर्भारपणात काही सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असते ज्यामुळे सुलभ आणि सुरक्षित प्रसूती होऊ शकते जसे - - -

गर्भावस्था राहण्याच्या अगोदर सर्वोत्कृष्ट बालक जन्माला यावं म्हणून आयुर्वेदाने काही पथ्य सांगितलेले आहेत तसेच

शरीराची शुद्धी आणि काही औषधी यांचा उपचार गर्भावस्था राहण्याच्या अगोदर वैद्यकीय सल्ल्याने केल्यास उत्तम असते

गर्भावस्थेत नियमितपणे वैद्यकीय सल्ल्यासाठी दवाखान्यात जाणे आणि वेळोवेळी तपासण्या करणे गरजेचे आहे

आपणास असणाऱ्या आरोग्याच्या अडचणी किंवा तक्रारी यांची खरी माहिती डॉक्टरांना देणे आवश्यक असते

रक्तस्राव / /   पोट दुखणे  / / / / कंबर दुखणे / / / लघवीचा त्रास / / / ऍसिडिटी / / / उलट्या याव्यतिरिक्त कोणताही त्रास असल्यास - - - -

वैद्यकीय सल्ल्यानेच औषध उपचार करावा

माती / /  खडू / / / पेन्सिल अशा कोणत्याही गोष्टींची सेवन करण्याची इच्छा झाल्यास त्यावर देखील वैद्यकीय सल्ला घ्यावा - - -  अशा वस्तू सेवन करू नये

वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य ते औषध / / / आहार आणि व्यायाम यांचे पालन करावे कोणतेही औषध वैद्यकीय सल्ल्या खेरीज घेऊ नये

अति जड वजन उचलणे / / / ओढणे किंवा ढकलणे या क्रिया करू नये

रोज रात्री ६ ते ८ तास आणि दुपारी १ ते २ तास झोप घेणे आवश्यक असते

बाजारातील फास्ट फूड / / / नॉनव्हेज इत्यादींचे सेवन कटाक्षाने टाळावे

आहारामध्ये भरपूर फळभाज्या / /  फळ / / / पाणी / / / दूध यांचा वापर करावा

आहार शाकाहारी आणि सात्विक स्वरूपाचा असावा

आहार हा दिवसातून ४ ते ६ वेळा थोड्या थोड्या प्रमाणात सेवन केल्यास - - - - -

गर्भावस्थेत होणारी ऍसिडिटी / / उलट्या / / जळजळ इत्यादी लक्षणे कमी होऊ शकतात

गर्भावस्थेत अधिक व्यायाम / / /  अधिक प्रवास टाळावा

शरीरात परिधान करण्यात येणारी वस्त्रे - - - - ही सुती आणि सैल असावीत

उंच टाचांच्या चपला किंवा शूज वापरू नये

वैद्यकीय सल्या खेरीज एक्स-रे / /  सोनोग्राफी करू नये

स्नान करताना जननेंद्रियाची विशेष स्वच्छता ठेवावी

अनावश्यक चिंता

अनावश्यक क्रोध

लोभ 

ताणतणाव यापासून दूर राहावे आणि

मन प्रसन्न आनंदित राहील अशा स्वरूपाची वातावरण निर्मिती स्वतः करावी

अशा प्रकारे आपण पथ्य पालन केले तर

गर्भावस्था आणि पुढे होणारी सुलभ प्रसूती हे एक सुखद स्वप्न असू शकते

 

 

Easy safe delivery in your hands

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - - today we are going to look at how an easy and safe delivery is in our hands - - -

One of the greatest gifts given to a woman by God is becoming a mother

This is the most pleasant experience in a woman’s life

Becoming pregnant is a joyous celebration throughout the entire household

Not only the in-laws’ family but also the maternal family members celebrate the joy of pregnancy, along with her

Relatives / / friends and acquaintances also take care of the pregnant woman in their own ways

Along with this care, it is extremely important to follow certain instructions during pregnancy, which can help in having an easy and safe delivery, such as - - -

Before becoming pregnant, Ayurveda has prescribed certain dietary and lifestyle guidelines for giving birth to the best possible child, as well as

It is best to undergo body purification and certain medicinal treatments, under medical advice, before becoming pregnant

During pregnancy, it is necessary to visit the hospital regularly for medical advice and undergo check-ups from time to time

It is necessary to give doctors accurate information about any health problems or complaints you may have

Bleeding / /   abdominal pain  / / / / back pain / / / difficulty urinating / / / acidity / / / vomiting, or any other problem - - - -

Medication should be taken only under medical advice

If you feel like consuming things such as soil / / chalk / / / pencil, you should also seek medical advice about it - - -  such things should not be consumed

Follow the appropriate medicines / / / diet and exercise as advised by the doctor; no medicine should be taken without medical advice

Do not perform activities such as lifting / / / pulling or pushing excessively heavy weights

It is necessary to sleep for 6 to 8 hours every night and 1 to 2 hours in the afternoon

Strictly avoid consuming fast food / / / non-vegetarian food and similar items from the market

The diet should include plenty of vegetables / / fruits / / / water / / / milk

The diet should be vegetarian and wholesome in nature

If food is consumed 4 to 6 times a day in small quantities - - - - -

Symptoms such as acidity / / vomiting / / heartburn during pregnancy may be reduced

Avoid excessive exercise / / / excessive travel during pregnancy

The clothes worn on the body - - - - - should be cotton and loose-fitting

Do not use high-heeled sandals or shoes

Do not undergo X-rays / / ultrasonography without medical advice

Maintain special cleanliness of the genital area while bathing

Unnecessary worry

Unnecessary anger

Greed

Stress should be avoided, and

You should create an environment for yourself that keeps your mind cheerful and happy

If we follow these guidelines in this way

Pregnancy and the easy delivery that follows can be a pleasant dream

Recent Posts

See All
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page