top of page
logo.png

Curry Mango Pickle Varieties Health Benefits Spices and Storage Tips

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 14
4 min read

लोणचं खावं का 

नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

लोणचं या विषयी बघणार आहोत 

लोणचे तसे भरपूर प्रकारचे असतात

कैरीचे लोणचे

लिंबाचे लोणचे

करवंदाचे लोणचे

मिरचीचे लोणचे

हळदीचे लोणचे

अजून मला सांगता येणार नाहीत इतके प्रकारचे लोणचे

आपण घरी करतो किंवा बाजारात उपलब्ध होतात

परंतु आज आपण कैरीच्या लोणच्या बद्दल बघणार आहोत 

तसं बघायला गेलं तर

आंब्याच्या अनेक जाती प्रजाती आहेत त्यापैकी

लंगडा आंबा / देशी आंबा आपण ज्याला म्हणतो त्याचं

लोणचं हे उत्तम समजलं जातं तरी पण कोणत्याही प्रकारची कैरी असो

त्याचे दोन प्रकार लोणच्या संदर्भात असतात 

जसे

साधारणतः अशी कैरी की ज्यामध्ये असणारी कोय ही

नरम आहे म्हणजे कडक झालेली नाहीये जी सहज

पावशीने तुम्हाला कापता येऊ शकत आहे

त्याचे लोणचे करणे आणि

दुसरी अशा प्रकारची कैरी

जी थोडी व्यवस्थित मोठी झालेली आहे आणि त्यातील कोय ही

अत्यंत टणक झालेली आहे म्हणजे तुम्हाला ती कोय

मोठ्या अडकित्या शिवाय कापता येणार नाही 

प्रत्येक ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या भागात

थोड्याफार प्रमाणात लोणच्यामध्ये जी मसाले वापरली जातात ती

अलग अलग असतात परंतु सर्वसामान्यतः

कैरीच्या लोणच्यामध्ये

तिखट मसाला मोहरी, हिंग तेल इत्यादींचा वापर केला जातो 

लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर ज्या कैरी मधील

कोय कडक झालेली आहे तिचं लोणचं

मे महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा जून महिन्यामध्ये टाकलं जातं 

आणि कैरी येण्याच्य सुरुवातीच्या काळात मऊ कैरी असणाऱ्या

कैरीचे लोणचे टाकले जाते आणि हे लोणचे

तयार केल्यापासून साधारणतः दोन ते तीन आठवड्यामध्ये संपविले जाते

कोणत्याही प्रकारचे लोणचे असो

योग्य प्रमाणात सेवन केले असता

भूक वाढवतात

जे अन्न सेवन केलं आहे त्याचं पचन योग्य पद्धतीने करवितात

शरीरातील वात दोष कमी करतात

पचनक्रिया मुखापासून तर अगदी मलप्रवृत्ती साफ होईपर्यंत उत्तम राहते

आपणास माहितीच आहे की लोणचं बघितल्याबरोबर आपल्या तोंडाला पाणी सुटतं म्हणजेच पचनक्रियेसाठी मुखात लाळ तयार होते 

मात्र यासाठी महत्त्वपूर्ण आहे ते त्याचं प्रमाण 

प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी

साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा म्हणजेच पोहे खाण्याचा अर्धा ते पाऊण चमचा

रायतं आणि एक मध्यम आकाराची फोड हेच योग्य प्रमाण आहे 

सामान्यतः सकाळच्या आहारामध्येच लोणचं सेवन करावे

शक्यतो रात्री लोणचं सेवन करू नये 

लोणचं अधिक प्रमाणात सेवन केलं गेलं तर

अनेक प्रकारचे पित्ताचे विकार उत्पन्न होऊ शकतात 

चला तर मग आज पासून योग्य प्रमाणात लोणचं

सेवन करू या आणि आरोग्याचा लाभ घेऊ या  

 

 

Curry Mango Pickle Varieties Health Benefits Spices and Storage Tips

A spoonful of लोणचं can turn a simple plate of dal, rice, bhakri, or curd rice into a memorable meal. In many Indian homes, pickle is more than a side dish. It is a seasonal ritual, a flavour booster, and a smart way to preserve produce.

Popular types of लोणचं

Indian pickle varieties change from region to region, but a few favourites are common across many kitchens:

कैरी लोणचं made with raw mango

Lemon pickle with salt, chilli, and oil

Chilli pickle with mustard and spices

Garlic pickle with a sharp, earthy taste

Mixed vegetable pickle with carrot, cauliflower, and green chilli

Among these, कैरी, or raw mango pickle, holds a special place because it balances sourness, spice, salt, and oil so well.

Why the right कैरी matters

Good कैरी लोणचं starts with the mango. Choose raw mangoes that are firm, sour, and mature but not ripe. Soft or yellowing mangoes can turn mushy and may not last well.

The skin should look fresh, and the flesh should be crisp when cut. A good raw mango absorbs spices better and keeps its bite even after days of marination.

Spices that build the flavour

The classic flavour comes from a few powerful ingredients:

तिखट मसाला for heat and colour

मोहरी for a nutty, sharp flavour

हिंग for aroma and digestive support

Turmeric for colour and mild bitterness

Salt for preservation

Oil, often sesame or groundnut oil, to protect the pickle

Preparation is usually quick. Cutting, drying, and mixing may take about an hour, but the pickle tastes better after resting for a few days.

Storage tips for कैरी लोणचं

Use a clean, dry glass jar. Moisture can spoil pickle, so dry the mango pieces well before mixing. Always use a dry spoon, keep the jar tightly closed, and store it in a cool place. For longer storage, make sure the oil covers the pickle pieces.

Health benefits and serving ideas

Pickle can stimulate appetite and may support digestion because of spices like हिंग, mustard, and chilli. That said, it is high in salt and oil, so enjoy it in small portions.

Serve कैरी लोणचं with:

Dal rice

Curd rice

Paratha or thepla

Bhakri and pithla

Simple khichdi

FAQ

Which mango is best for कैरी लोणचं?

Firm, sour, raw mangoes are best. Avoid ripe or soft mangoes.

How long does कैरी लोणचं take to mature?

It can be eaten in a few days, but the flavour improves as the spices settle.

Is pickle good for digestion?

In small amounts, spices like हिंग and mustard may aid digestion. This is general food information, not medical advice.

Can I eat लोणचं every day?

Yes, but only a small spoonful. Overeating can increase salt and oil intake.

A good pickle is about balance. Choose the right कैरी, keep everything dry and clean, and enjoy लोणचं as a flavourful side, not the main dish.

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page