top of page
logo.png

Brass Plate Foot Massage Benefits for Vata Balance Better Sleep and Circulation

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 4
  • 3 min read

तळ पायाला कास्याच्या द्वारे मसाज करण्याचे फायदे

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आयुर्वेदात वर्णन केलेल्या पादाभ्यंग  म्हणजेच पायाचे अभ्यंग - - - -  म्हणजेच तळ पायाला मसाज केल्याने - - - -  काय फायदे होऊ शकतात ? या विषयी बघणार आहोत - - - -

तळपायाला मसाज केल्यामुळे शरीरात वातदोषाचे संतुलन उत्तम होते आणि

अनेक प्रकारचे वात रोग कमी होण्यास मदत होते तसेच

चांगली झोप येण्यासाठी देखील याचा उपयोग होतो

पोटाच्या संबंधित अनेक आजारांमध्ये जसे

पोटात आवाज येणे

सतत पोट भरल्यासारखे वाटणे

नेहमी अपचन असणे

ऍसिडिटी

गॅसेस

पोट साफ न होणे

इरिटेबल बाऊल सिंड्रोम     इत्यादींच्या समस्यांपासून आपण दूर राहतो

रात्री झोपताना पायाला अभ्यंग केल्यास

झोप छान येते आणि

ज्यांना झोपेत घोरण्याची सवय असते त्यांचे घोरणे देखील कमी होऊ शकते

तळ पायापासून कमरेपर्यंतचे रक्त अभिसरण सुधारल्याने अनेक आजारांपासून आपणास मुक्ती मिळू शकते

ज्या व्यक्तींना व्हेरिकोज व्हेन चा आजार झालेला आहे - - - -  त्यांचा हा आजार अधिक वाढत नाही आणि किंवा - - - - - ज्यांना हा आजार

होण्याची शक्यता असते ती शक्यता दूर होते

रक्ताभिसरण सुधारल्यामुळे - - -  रक्तदाब नियंत्रणात राहतो म्हणजेच ब्लड प्रेशर कंट्रोल राहते

पाय दुखी - - -  गुडघे दुखी या  सारख्या आजारापासून आपण दूर जातो

पायाचे अभ्यंग करण्यासाठी तसा कोणताही स्पेसिफिक वेळ नसतो

आपण केव्हाही पायाची मसाज करू शकतात तसेच

तेल किंवा तूप तुपामध्ये गाईचे किंवा म्हशीचे तूप यांचा वापर आपण करू शकतो

प्रामुख्याने ज्या व्यक्तींना अधिक प्रमाणामध्ये वातदोषाचे आजार आहेत अशांनी तेलाद्वारे पायाचे अभ्यंग करावे तर

ज्या व्यक्तींना तळ पायात आग होणे तसेच

वाता सोबत पित्ताचे विकार असतील

अशा व्यक्तींनी गायीच्या तुपाद्वारे तळपायाची मसाज करावी

तळपायाची मसाज करण्यासाठी कोणतीही स्पेसिफिक वेळ नसली तरी देखील - - -

ज्या व्यक्तींना शांत झोप येणे

झोपेत अधिक प्रमाणात स्वप्नांचा भडीमार न होणे

केस दाट आणि लवकर वाढणे अपेक्षित असते अशांनी

शक्यतो रात्रीच्या वेळी कास्य थाली यंत्रा द्वारे मसाज करून घ्यावी

तळपायाची मसाज शक्यतो काश्याच्या वाटीने किंवा सध्या उपलब्ध असणाऱ्या कास्य थाली  यंत्राद्वारे केल्यास निश्चितच अनेक प्रकारच्या आजारांपासून आणि लक्षणांपासून आपणास मुक्ती मिळू शकते.

 

Brass Plate Foot Massage Benefits for Vata Balance Better Sleep and Circulation

Cold feet, restless sleep, leg heaviness, and body stiffness often point to one Ayurvedic idea: disturbed Vata dosha. In Ayurveda, foot massage is called पादाभ्यंग or Padabhyanga, a simple nightly practice used to calm the nervous system and ground the body.

When done with warm ghee, sesame oil, or a suitable herbal oil, foot massage becomes more than relaxation. Using a brass plate adds gentle friction and cooling-metal contact, which many traditional practitioners value for relieving burning feet, fatigue, and Vata-related discomfort.

How Padabhyanga helps balance Vata

Vata is linked with movement, dryness, pain, anxiety, irregular sleep, and stiffness. The feet have many nerve endings, so slow massage here can signal safety and rest to the body.

Regular foot massage may help with common Vata-related concerns such as:

Dryness and cracking in the feet

Calf tightness and joint stiffness

Nervous restlessness

Tingling or mild fatigue in the legs

Difficulty settling down at night

For dry, cold, or stiff feet, warm sesame oil is often preferred. For excess heat or burning sensation, ghee can feel soothing.

Better sleep and reduced snoring

A calm body sleeps better. Padabhyanga before bedtime can relax the feet, ease mental agitation, and prepare the body for deeper rest. Better relaxation may also reduce snoring in some people, especially when snoring worsens with stress, fatigue, or poor sleep posture.

If snoring is loud, frequent, or linked with breath pauses, seek medical advice.

Circulation from feet to waist

Massaging the soles, ankles, calves, and lower legs supports blood movement from the feet towards the waist. This can reduce heaviness and may support vein health when paired with walking, hydration, and leg elevation.

It may also support healthy blood pressure through relaxation, though it should not replace prescribed treatment.

How to use a brass plate

Sit comfortably at night. Apply warm oil or ghee to the soles. Rub each foot gently on a clean brass plate in circular and back-and-forth movements for 5 to 10 minutes. Follow with hand massage around the heels, arches, toes, and ankles. Wipe excess oil and wear cotton socks if needed.

FAQs

Can I do brass plate foot massage daily?

Yes, most people can do it daily, especially before sleep. Avoid it on wounds, infections, or severe swelling.

Which is better, ghee or oil?

Use ghee for burning or heat. Use warm sesame oil for dryness, coldness, and stiffness.

Is this a medical treatment?

No. It is a supportive Ayurvedic self-care practice. For pain, varicose veins, blood pressure, or severe snoring, consult a qualified doctor.

A brass plate foot massage is simple, affordable, and deeply calming. Practised regularly, it can support Vata balance, better sleep, and healthier legs.

 

Recent Posts

See All
Is it necessary to take steam therapy after a massage ?

मसाज नंतर स्टीम थेरपी घेणे गरजेचे आहे ? अभ्यंगानंतर म्हणजे मसाज केल्या नंतर वाफ – स्टीम थेरपी घेणे फार महत्वाचे आहे हे असे करणे आपल्या आरोग्यावर / / / शरीरावर कसे कार्य करते ते पाहू या - - - - वाफेमुळ

 
 
 
Shirodhara in Ayurveda Benefits for Mind Sleep Hair and Skin

आयुर्वेदोक्त शिरोधारा चे महत्त्व नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आयुर्वेदातील शिरोधारा या विषयी बघणार आहोत डोक्याला अभ्यंग करण्याचा हा एक प्रकार आहे यामध्ये ज्याप्रमाणे महादेवाच्या पिंडीवर

 
 
 
Benefits of Massage, i.e. Abhyanga

मसाज म्हणजेच अभ्यंगाचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - - - आपण आपल्या मोबाईल मध्ये - - - कॉम्प्युटरमध्ये - - - - लॅपटॉप मध्ये व्हायरस जाऊ नये म्हणून - - - - - जितकी काळजी घेतो

 
 
 

Comments


bottom of page