Benefits of Massage, i.e. Abhyanga
- Satish Shindadkar
- Aug 11
- 5 min read
मसाज म्हणजेच अभ्यंगाचे फायदे
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - - - आपण आपल्या मोबाईल मध्ये - - - कॉम्प्युटरमध्ये - - - - लॅपटॉप मध्ये व्हायरस जाऊ नये म्हणून - - - - - जितकी काळजी घेतो - - -- तेवढी काळजी आपण
त्यापेक्षाही अति महत्वपूर्ण असणाऱ्या - - - - आपल्या शरीराची घेत नाही
आपल्याला दीर्घायुष्य लाभाव
निरामय आरोग्य लाभाव
अशी इच्छा आपण बाळगत असतो परंतु
त्यानुसार आपण आपलं आचरण करीत नाही
आपल्या प्रकृतीनुसार / / / / / ऋतुमानानुसार
आहार आणि व्यायाम यात नियमितता / / / / / सातत्य असणे गरजेचे आहे
व्यायाम या प्रकारामध्ये आपण - - - आज अभ्यंग म्हणजेच मसाज हा - - - आरोग्यसंपन्न जीवनासाठी का आणि किती महत्त्वपूर्ण आहे - - - - -- हे बघणार आहोत
चिरकाल तारुण्य टिकवून - - - - ते उपभोगण्याचा एकमेव सहज सोपा मार्ग म्हणजे अभ्यंग / / / मालिश होय
आयुर्वेदातील दिनचर्येमध्ये अभ्यंगाला विशेष महत्त्व असून - - - निरोगी व्यक्तीने आपले निरोगीत्व टिकवून ठेवण्यासाठी - - - - - आपल्या प्रकृतीनुरूप - - - - विविध ऋतूंचा विचार करून - - - - आठवड्यातून किमान दोन दिवस - - - - - - - विशिष्ट तेलाने मालिश करणे आवश्यक असते
अभ्यंग केल्याचे फायदे तात्काळ दिसतात
विविध वेदनांमध्ये विशिष्ट औषधी सिद्धतेलाने - - - अभ्यंग करावयास सांगितले आहे
त्यानुसार वेदना तत्काळ नष्ट होत असल्याचा अनुभव जवळपास सर्वांनाच येत असतो
अभ्यंगामुळे शरीरातील थकवा नाहीसा होऊन - - - -
शरीर ताजेतवाने होते
अभ्यंगामुळे त्वचा - - मऊ स्निग्ध कांतीवन आणि तेजस्वी होते
वार्ध्यक्य अवस्था लवकर येऊ देत नाही
दीर्घायु प्राप्त होते
मांसपेशी स्नायू संधी यांचे पोषण होते
नाडी संस्थेला उत्तेजना मिळते
संधी मधील आणि संधी बंधनांमधील ताठरता / / / कार्यक्षमता इत्यादी विकृती दूर होऊन सांधे योग्य पद्धतीने काम करतात
अभ्यंग केल्याने शरीराचे तापमान थोड्या प्रमाणात वाढते यामुळे
रक्तप्रवाह सुरळीत होतो
पेशींना / / / त्वचेला रक्तपुरवठा वाढल्याने - - - ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळून चालना मिळते
हे रक्त परिभ्रमण वाढल्याने पेशींमध्ये असलेले दोष त्वचेद्वारे - - - घामावाटे बाहेर टाकण्यास सोपे जाते
अभ्यंगामुळे शरीराचे बलसंवर्धन होते
शरीराची लवचिकता वाढते
प्रतिकारक्षमता / / / / काम करण्याचे समर्थ वाढून मानसिक उदासीनता / / / चिंता कमी होते
अभ्यंगामुळे शांत / / / अखंडित निद्रा प्राप्त होते म्हणजेच झोपे संदर्भातील - - -
कोणतेही दोष - - - जसे झोप न लागणे
खूप झोप लागणे
थोड्या थोड्या वेळाने जाग येणे
खूप स्वप्न पडणे इत्यादी प्रक्रिया निर्माण होत नाहीत थोडक्यात - - - -
अभ्यंगामुळे एकाग्रता / / / उत्साह / / / स्फूर्ती / / / आत्मविश्वास आणि दीर्घायु मिळतात
अभ्यंग सर्वांनीच करावा असे आयुर्वेद सांगते - - - परंतु
प्रामुख्याने ज्यांना वात व्याधी आहेत
ज्यांची नोकरी बाहेरगावी आहे आणि रोज ज्यांना प्रवास करावा लागतो
ज्यांची शिफ्ट ड्युटी आहे
जे व्यक्ती रात्रपाळी करतात किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण करतात
ज्यांना शारीरिक आणि मानसिक कामांचा अतिरिक्त ताण आहे
तसेच ओझे वाहणाऱ्या कामगारांनी आणि
विविध प्रकारच्या क्रीडा जसे क्रिकेट - - - फुटबॉल - - - कबड्डी नेहमी खेळणाऱ्यांनी - - - संपूर्ण शरीराची मसाज करून घ्यावी
ज्या व्यक्तींनी नुकतेच पंचकर्म केलेले आहेत - - -
ज्यांना ताप आलेला आहे
स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी असताना - - - अभ्यंग वर्ज्य करावे
तसेच ज्या व्यक्तींना त्वचेचे विशिष्ट आजार आहेत - - - त्यांनी अभ्यंग वर्ज्य करावे
सूज किंवा जखम झालेल्या भागावर मसाज करू नये
हृदयविकार असेल अशा व्यक्तींनी - - - मसाज करताना विशेष काळजी घ्यावी
पहिले अन्न पचल्या नंतर म्हणजे - - - अंदाजे जेवणानंतर ३ ते ५ तासानंतर अभ्यंग करावे शक्यतो अभ्यंग हे सकाळी म्हणजेच पहाटे पाच ते आठ या दरम्यानेच करावे - - - म्हणजे रिकामे पोटी अभ्यंग केल्यास त्याचे उत्तम फायदे प्राप्त होतात
अशा प्रकारे आपली प्रकृती
आपली दिनचर्या
यांचा समन्वय साधून
वैद्यकीय सल्ल्याने
विशिष्ट तेलांचे अभ्यंग केल्यास निश्चितच - - -
निरामय दीर्घायु प्राप्त होणे सहज शक्य आहे
Benefits of Massage, i.e. Abhyanga
Namaskar, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - - - - We take as much care as possible - - - to prevent viruses from entering our mobile phones - - - computers - - - - laptops - - - - but we do not take the same care
of something even more important - - - - our body
We wish to have a long life
and healthy well-being
We nurture such wishes, but
we do not conduct ourselves accordingly
According to our constitution / / / / / according to the seasons
regularity / / / / / consistency in diet and exercise is necessary
Among the various forms of exercise, today we - - - will see why and how important Abhyanga, that is, massage - - - is for a healthy life - - - - --
The only simple and easy way to preserve youth for a long time - - - - and enjoy it is Abhyanga / / / massage
Abhyanga has special importance in the daily routine of Ayurveda, and - - - for a healthy person to maintain their health - - - - - according to their constitution - - - - considering the different seasons - - - - it is necessary to have an oil massage at least two days a week - - - - - - -
The benefits of Abhyanga are seen immediately
For various types of pain, Abhyanga with specific medicated oils - - - has been recommended
Accordingly, almost everyone experiences that the pain disappears immediately
Abhyanga removes fatigue from the body - - - -
and refreshes the body
Abhyanga makes the skin - - soft, smooth, radiant and glowing
It prevents old age from setting in early
It promotes longevity
It nourishes the muscles, tissues and joints
It stimulates the nervous system
Stiffness / / / reduced functionality and other disorders in the joints and their ligaments are relieved, allowing the joints to function properly
Abhyanga slightly increases body temperature, and because of this
blood circulation becomes smooth
With increased blood supply to the cells / / / skin - - - oxygen is received in abundant amounts, providing stimulation
As blood circulation increases, waste products present in the cells can be more easily eliminated through the skin - - - through sweat
Abhyanga strengthens the body
It increases the body's flexibility
Immunity / / / / the capacity to work increases and mental depression / / / anxiety decreases
Abhyanga provides calm / / / uninterrupted sleep, meaning that sleep-related - - -
any disorders - - - such as difficulty falling asleep
excessive sleep
waking up at short intervals
having too many dreams, etc., do not occur. In short - - - -
Abhyanga provides concentration / / / enthusiasm / / / vitality / / / self-confidence and longevity
Ayurveda says that everyone should practice Abhyanga - - - but
especially those who have Vata disorders
those whose jobs are away from their hometown and who have to travel every day
those who work shift duties
people who work night shifts or stay awake until late at night
those who are under excessive physical and mental workload
as well as workers who carry heavy loads and
those who regularly participate in various sports such as cricket - - - football - - - kabaddi - - - should get a full-body massage
People who have recently undergone Panchakarma - - -
those who have a fever
in the case of women, during menstruation - - - Abhyanga should be avoided
Similarly, people who have certain skin diseases - - - should avoid Abhyanga
Massage should not be done on swollen or injured areas
People who have heart disease - - - should take special care while getting a massage
Abhyanga should be done after the first meal has been digested, that is - - - approximately 3 to 5 hours after a meal. Preferably, Abhyanga should be done in the morning, that is, between 5 and 8 a.m. - - - meaning that performing Abhyanga on an empty stomach provides the best benefits
In this way, by coordinating
our constitution
our daily routine
and
with medical advice
if Abhyanga is performed with specific oils, then certainly - - -
achieving healthy longevity is easily possible

Comments