top of page
logo.png

Shirodhara in Ayurveda Benefits for Mind Sleep Hair and Skin

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 12
  • 4 min read

आयुर्वेदोक्त शिरोधारा चे महत्त्व

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

आयुर्वेदातील शिरोधारा या विषयी बघणार आहोत

डोक्याला अभ्यंग करण्याचा हा एक प्रकार आहे यामध्ये

ज्याप्रमाणे महादेवाच्या पिंडीवर एका कळशीतून

थेंब थेंब पाण्याचा अभिषेक केला जातो त्याच पद्धतीने

मनुष्याला झोपवून

विशिष्ट औषधीयुक्त तेल

काढे

ताक इत्यादींची

कपाळपट्टीच्या मध्यभागी धारा लावून चिकित्सा केली जाते 

या प्रकारामध्ये महादेवाच्या पिंडीवर ज्या पद्धतीने

कळशी लावून धारा केली जाते त्याच पद्धतीने

कळशी मध्ये विशिष्ट औषधीयुक्त तेल

काढे किंवा ताक यांना कोमट स्वरूपामध्ये

कपाळाच्या मध्यभागी धार सतत पडत राहील अशी

व्यवस्था केली जाते

अंदाजे ही धार

रोज 18 मिनिट ते 50 मिनिटांपर्यंत केली जाऊ शकते आणि असे

सतत  १ ते ४ आठवडे केले जाते

ही एक चिकित्सा पद्धती आहे  

ज्या पद्धतीने आपण संपूर्ण शरीराचं अभ्यंग करतो आणि

त्याचे जे फायदे आपल्याला होतात त्याच पद्धतीने

आपल्या डोक्यासाठी

आपल्या मस्तीष्कासाठी

शिरोधारा महत्वपूर्ण असते 

नियमित वैद्यकीय सल्ल्याने शिरोधारा केल्यास

आपला स्वर सुधारतो

स्वर म्हणजे आपली बोलण्याची क्षमता

बोलण्याची ताकद

बोलण्याची लय आणि समोरच्या व्यक्तीला

मंत्रमुग्ध करणारा स्वर निर्माण होण्यासाठी देखील हे महत्त्वपूर्ण असते.

मानेच्या वरील सर्व सांध्यांना

शिरोधारेमुळे बळ मिळते आणि तेथील स्थानिक

कोरडेपणा / / / / /  रुक्षता नष्ट होते 

झोप छान आणि गाढ येण्यासाठी

शिरोधरा हा उत्तम पर्याय आहे त्यामुळे

ज्या व्यक्तींना गाढ झोप लागत नाही किंवा

झोपच लागत नाही

खूप स्वप्न पडतात

थोड्याशा आवाजाने जाग येते किंवा

लवकर झोप लागत नाही

रात्री उशिराने / / / मध्यरात्री जाग येते आणि त्यानंतर झोपच लागत नाही आणि अगदी सकाळी सकाळी झोप लागते

अशा व्यक्तींसाठी देखील शिरोधरा हा उत्तम पर्याय आहे 

डोक्यात कोंडा होणे

डोक्याची त्वचा कोरडी होणे

केस रुक्ष होणे

केस गळणे 

केस पांढरे होणे

केस दुभंगण इत्यादी केसांच्या विकारांमध्ये

शिरोधरा अत्यंत उपयुक्त आहे यामुळे

केसांची मुळे घट्ट होतात

केस लांब

काळे आणि घनदाट होतात

टक्कल पडत नाही 

मायग्रेन

सततची डोकेदुखी यामध्ये देखील शिरोधारा अत्यंत उपयुक्त आहे

अनेक पेन किलर घेऊन

वर्षानुवर्ष अनेक उपचार करून देखील

बरे न वाटणारे व्यक्ती

शिरोधारेच्या काही दिवसांच्या उपचाराने बरे होत असतात 

चेहऱ्यावरील त्वचा मुलायम आणि प्रसन्न राहण्यासाठी

देखील शिरोधारा अत्यंत फायदेशीर असते 

एकाग्रता वाढण्यासाठी म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी

शिरोधारासारखा उपचार नाही 

म्हणून थोडक्यात सांगायचे झाल्यास

आपली एकाग्रता वाढवण्यासाठी

केसांचे विकार दुरुस्त होण्यासाठी

आपली पंच ज्ञानेन्द्रिय योग्य प्रकारे काम करण्यासाठी

मायग्रेन सारख्या अनेक वात विकारांमध्ये

शिरोधारा हा उत्तम पर्याय आहे

वैद्यकीय सल्ल्याने शिरोधारा करा आणि निरोगी जीवन जगा

 

 

 

 

 

Shirodhara in Ayurveda Benefits for Mind Sleep Hair and Skin

A restless mind often shows up in the body as poor sleep, headaches, tense muscles, dull skin, or hair concerns. In Ayurveda, Shirodhara is valued as a calming therapy that works through steady touch, warmth, and medicated oil.

Shirodhara means a gentle, continuous stream poured over the forehead, usually around the area between the eyebrows. This is done with warm herbal oil, though buttermilk, milk, or decoctions may be used in specific cases.

What happens during Shirodhara

During a session, the person lies comfortably while a practitioner pours warm medicinal oil in a slow rhythm across the forehead. The oil is selected based on the person’s constitution, symptoms, season, and overall health.

The experience is deeply soothing because the forehead and scalp are sensitive areas linked with relaxation. The repeated flow can help settle mental activity and reduce physical tension.

How Shirodhara supports the mind

Shirodhara in Ayurveda is often recommended for stress, mental fatigue, irritability, and overthinking. Its calming effect may support the nervous system and help the mind feel more grounded.

Many people also find it useful for concentration, especially when stress or disturbed sleep affects focus. By encouraging relaxation, it may create a better mental state for clarity and attention.

Benefits for sleep, migraines, hair, and skin

Shirodhara is commonly used to improve sleep quality. The warmth and rhythm may help the body shift into a calmer state, making it easier to rest.

It may also support people who experience migraines or recurring headaches, especially when stress is a known trigger. This should not replace medical care, but it can be used as part of a guided wellness plan.

For hair health, the oil nourishes the scalp, reduces dryness, and may support stronger-looking hair. The scalp massage effect can also improve comfort and relaxation.

Skin may benefit indirectly too. Better sleep and lower stress often reflect in the skin, while herbal oils can support softness and moisture.

Why expert guidance matters

Shirodhara looks simple, but the results depend on the right oil, temperature, duration, and diagnosis. A qualified Ayurvedic practitioner can assess whether it suits your body type and health condition.

This article is for information only and is not a substitute for medical advice.

FAQs

Is Shirodhara painful?

No. It is usually gentle, warm, and relaxing when performed correctly.

How many sessions are needed?

It varies. Some feel relaxed after one session, while chronic concerns may need a planned course.

Can everyone try Shirodhara?

Not always. People with fever, severe cold, certain skin conditions, or specific medical concerns should consult a practitioner first.

Does Shirodhara cure insomnia or migraines?

It may support relief, but it should not be seen as a guaranteed cure or a replacement for medical treatment.

The takeaway

Shirodhara is a meaningful Ayurvedic therapy for calming the mind, supporting sleep, nourishing the scalp, and encouraging healthier-looking skin. For the safest and most effective results, choose a trained practitioner who can personalise the treatment.

 

Recent Posts

See All
Is it necessary to take steam therapy after a massage ?

मसाज नंतर स्टीम थेरपी घेणे गरजेचे आहे ? अभ्यंगानंतर म्हणजे मसाज केल्या नंतर वाफ – स्टीम थेरपी घेणे फार महत्वाचे आहे हे असे करणे आपल्या आरोग्यावर / / / शरीरावर कसे कार्य करते ते पाहू या - - - - वाफेमुळ

 
 
 
Benefits of Massage, i.e. Abhyanga

मसाज म्हणजेच अभ्यंगाचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - - - - - आपण आपल्या मोबाईल मध्ये - - - कॉम्प्युटरमध्ये - - - - लॅपटॉप मध्ये व्हायरस जाऊ नये म्हणून - - - - - जितकी काळजी घेतो

 
 
 
Aromatic Ubtan for Diwali The Traditional Abhyanga Snan Glow for Healthy Skin

दिवाळीतील सुगंधी ऊटणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानात वापरण्यात येणाऱ्या उटण्या बद्दल बघणार आहोत - - - - - -- दिवाळी या सणामध्ये अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व

 
 
 

Comments


bottom of page