Is it necessary to take steam therapy after a massage ?
- Satish Shindadkar
- Aug 14
- 3 min read
मसाज नंतर स्टीम थेरपी घेणे गरजेचे आहे ?
अभ्यंगानंतर म्हणजे मसाज केल्या नंतर वाफ – स्टीम थेरपी घेणे फार महत्वाचे आहे
हे असे करणे आपल्या आरोग्यावर / / / शरीरावर कसे कार्य करते ते पाहू या - - - -
वाफेमुळे मसाज केलेले तेल त्वचेतून निघून जाण्यास मदत होते – हे सामान्यत: सर्वांना माहित आहे पण
तेल मसाज केल्यानंतर स्टीम थेरपी किंवा उष्ण उपचाराचा फायदा असामान्य आहे हे आपणास आता कळेलच - - - - - -
साधारणतः पंचकर्म ही शरीरातून विकृत दोष - रोगजन्य पदार्थ बाहेर काढण्याची प्रक्रिया आहे.
ही विकृती काही अवयवांमध्ये आणि
काही वाहिन्यांमध्ये अडकली आहे तेव्हा
तेल मसाज केल्याने दोष मऊ // / / स्निग्ध होतात.
मसाज केल्यानंतर स्टीम थेरपीमुळे दोष आणखी मऊ / / / पातळ म्हणजे द्रव स्वरूप होतात आणि
दोषांना अवयवांच्या वाहिन्यांच्या आतील अस्तरांपासून वेगळे केले जाते.
अशा प्रकारे, ते दोष शरीरातून बाहेर काढण्यास सुरवात होते.
शरीरातील वात दोष हा रुक्ष म्हणजे कोरडा असतो आणि गुणाने थंड असतो.
तर तेल हे स्निग्ध आणि उष्ण असते म्हणजे वात दोषाच्या विरुद्ध गुणाचे तेल असते
म्हणून तेल लावल्याने वात कमी होण्यास मदत होते त्यामुळेच
वेदना कमी होण्यास मदत होते.
याच्या पुढे जर वाफ दिली तर अजून उष्णता निर्माण होते आणि पर्यायाने
पुन्हा वात कमी होते आणि स्नायू शिथिल होतात.
सांधे कडक होणे टाळण्यासाठी देखील अभ्यंगानंतर वाफ गरजेची असते
स्टीम थेरपीशिवाय नुसतेच तेल लावल्यास
काही प्रकरणांमध्ये सांध्यामध्ये कफ वाढतो - - - यामुळे कडकपणा वाढू शकतो.
म्हणून अनेक प्रकारच्या सांध्यांचे विकारात किंवा सामान्य व्यक्तींमध्ये तसेच ऑस्टियो-आर्थरायटिस / / डीजनरेटिव्ह डिसऑर्डरमध्ये
नियमित मसाज नंतर - - - स्टीम थेरपी किंवा
किमान गरम पाण्याने आंघोळ करण्याची शिफारस केली जाते.
असे असले तरी काही अवस्थेत वाफ टाळावी जसे
शरीरात आग / / / दाह होत असेल
पित्ताचे आजार असतील इ.
Is it necessary to take steam therapy after a massage ?
After Abhyanga, that is, after a massage, taking steam – steam therapy is very important
Let us see how doing this works on our health / / / body - - - -
It is generally known to everyone that steam helps the massage oil to penetrate through the skin – but
you will now understand that the benefit of steam therapy or heat treatment after an oil massage is extraordinary - - - - - -
Generally, Panchakarma is a process of eliminating vitiated doshas - disease-causing substances from the body.
When this vitiation is trapped in some organs and
in some channels
oil massage makes the doshas soft // / / and unctuous.
After the massage, steam therapy makes the doshas even softer / / / thinner, that is, into a liquid form and
the doshas are separated from the inner linings of the channels of the organs.
In this way, the process of eliminating these doshas from the body begins.
The Vata dosha in the body is dry, that is, rough, and is cold by nature.
Whereas oil is unctuous and hot, meaning it has qualities opposite to those of the Vata dosha
therefore applying oil helps reduce Vata and that is why
it helps reduce pain.
If steam is given after this, it generates even more heat and consequently
Vata is reduced further and the muscles relax.
Steam is also necessary after Abhyanga to prevent stiffness of the joints
If oil is applied alone without steam therapy
in some cases Kapha increases in the joints - - - which can increase stiffness.
Therefore, in many types of joint disorders or in normal individuals as well as in osteo-arthritis / / degenerative disorders
after regular massage - - - steam therapy or
at least bathing with warm water is recommended.
Even so, steam should be avoided in some conditions such as
if there is heat / / / inflammation in the body
if there are Pitta disorders etc.

Comments