Ayurvedic Causes of Impure Blood and Natural Remedies for Better Health
आयुर्वेदानुसार रक्त अशुध्द होण्याची कारणे
नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर आज आपण आयुर्वेदानुसार
रक्त अशुद्ध होण्याची कारणे बघणार आहोत
त्यासोबतच आपण घरच्या घरी काय करू शकतो किंवा
काय पथ्य पाळू शकतो की जेणेकरून
रक्त शुद्ध राहील हे आपण बघणार आहोत
आयुर्वेदानुसार रक्त हे जीवन
सामर्थ्य आणि प्रतिकारशक्तीच कारण आहेजवळपास सर्वच प्राण्यांमध्ये रक्त असते
रक्तामुळे आपली प्रतिकार क्षमता उत्तम राहते
आपले बल म्हणजे ताकद किंवा शक्ती ही चांगली राहते
त्वचेचा वर्ण म्हणजेच त्वचेचा रंग
त्वचेची कांती ही देखील आपल्या रक्ताच्या शुद्धतेमुळे
चांगली राहत असते
थोडक्यात सुख
आनंद
आराम आणि दीर्घायुष्य हे आपल्याला शुद्ध रक्तामुळेच
प्राप्त होत असते म्हणजेच
जीवनातील महत्त्वाची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी
रक्ताची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते
रक्त अशुद्ध होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये प्रामुख्याने
आहारातल्या कारणांमध्ये अस्वच्छ
उष्ण
तीक्ष्ण आणि मोठ्या प्रमाणात आहाराचे सेवन
हे कारणीभूत असतंसोबत अधिक प्रमाणात खारट आणि
क्षारयुक्त पदार्थ यामध्ये
आंबट आणि तिखट याचा देखील समावेश होतो म्हणजेच
आपण जर अधिक प्रमाणात आंबट
खारट आणि तिखट अन्न सेवन केलं तर
रक्त अशुद्ध होतं त्यासोबतच
अधिक प्रमाणामध्ये हरभरे म्हणजे चणाडाळ
पावटा
तीळ
मुळा
हिरवे वाटाणे
जलचर प्राणी म्हणजे मासे इत्यादी
अधिक प्रमाणामध्ये मांसाहार
अधिक प्रमाणात वेळी अवेळी आहार घेणे
दही अधिक प्रमाणात
मद्यपान
कुजलेले अन्न तसेच कोणत्याही प्रकारचे अन्न की जे
अधिक प्रमाणात सेवन केले तरी देखील
रक्त अशुद्ध होऊ शकते
अन्य रक्त अशुद्ध निर्माण करणाऱ्या क्रियांमध्ये
तेलकट
अधिक द्रव आणि पचायला जड अन्न घेतल्यानंतर लगेच
दिवसा झोपणे
अधिक प्रमाणामध्ये क्रोध किंवा
तीव्र उन्हामध्ये अधिक काळ राहणे किंवा फिरणे
जे व्यक्ती अग्नीच्या संपर्कात असतात म्हणजे उष्णतेच्या
संपर्कात नेहमी असतात जसे स्वयंपाकी इत्यादी
उलटीचा वेग आला असता म्हणजे उलटीची संवेदना
झाली असताना देखील उलटी होऊन देणे म्हणजे
उलटीला दाबणे तसेच
खूप परिश्रम केल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच
आहार घेणे
खूप मोठी दुखापत झालेली असताना देखील
अधिक प्रमाणात आहार घेणे
उष्णतेतून आल्यानंतर लगेच आहार घेणे किंवा
पूर्वीचा आहार पचण्याच्या अगोदर आहार घेणं हे
देखील रक्त अशुद्ध होण्याचं प्रमुख कारण आहे
निसर्गतः शरद ऋतू म्हणजेच अंदाजे ऑक्टोबर हिट असताना
रक्त अशुद्ध होत असतं
रक्त अशुद्ध झाल्यामुळे
तोंडात छाले पडणे म्हणजेच ज्याला आपण तोंड येणं असं
म्हणतो ते होतं सोबत
डोळ्यांची आग होणं
तोंडातून दुर्गंध येणं
ओटी पोटामध्ये एखादी गाठ फिरत आहे असं वाटणं
अनेक प्रकारचे त्वचा विकार
कित्येक तरुणांना चेहऱ्यावर मुरूम येणे तसेच
शरीराच्या वेगवेगळ्या भागातून रक्तस्राव होणं जसं
नाकातून रक्त येणे
लघवी वाटे रक्त येणे इत्यादी याच प्रमाणे
विविध प्रकारचे सांध्यांचे विकार
त्वचा निस्तेज होणे
पचन क्षमता कमी होणं
अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा तहान लागणं
शरीरात जडपणा वाटणं किंवा शरीरामध्ये आग होणे
अधिक अशक्तपणा येणं
डोकेदुखी
खूप थकवा
कोणत्याही कारणाने क्रोधित होणं म्हणजे अधिक
प्रमाणात राग येणे
तोंडाला खारट पणा येणे किंवा तोंडाला चवच नसणं
अधिक प्रमाणात घाम येणे
शरीराचा उग्र वास येणे किंवा थरथर होणे
झापड बसल्यासारखं वाटणं इत्यादी लक्षण किंवा
रोग निर्माण होतात
अशा प्रकारे रक्त अशुद्ध झाल्याची जी कारणं आहेत
ती आपण वर्ज्य करणे आवश्यक असतं
जेणे करून रक्त शुद्ध होण्यास मदत होईल
त्याच पद्धतीने वैद्यकीय सल्ल्याने
पंचकर्म
रक्त शुद्ध होणारी औषध
उपवास इत्यादी करणं आवश्यक असतं
आयुर्वेदानुसार प्रामुख्याने मंजिष्ठा
अनंत मूळ
खदीर
हिरडा
आवळा,
हळद
जाती
बहावा इत्यादी वनस्पती प्रमुख आहेत
औषधांमध्ये महामंजिष्ठादी काढा
रक्त शुद्धीकर काढा इत्यादी
घेता येऊ शकतात
हे सर्व माहितीसाठी असून वैद्यकीय सल्ल्यानेच याचा वापर करावा प्रामुख्याने पंचकर्मातील विरेचन किंवा बस्ती
यांचा वापर करावा
अधिक प्रमाणात अशक्तपणा आलेला असेल तर
बलवर्धक औषधांचा उपयोग करावा
अशा पद्धतीने जर आपण रक्त शुद्ध राहील
असाच प्रयत्न केला तर
निरोगी जीवन जगणं सहज शक्य आहे
Ayurvedic Causes of Impure Blood and Natural Remedies for Better Health
Clear, well-nourished blood supports energy, skin health, immunity, and steady digestion. In Ayurveda, blood is linked with Rakta dhatu, one of the body’s vital tissues. When Rakta becomes disturbed, signs may show up as acne, itching, burning sensation, fatigue, mouth ulcers, or frequent irritation.
This article is for general information only. For ongoing symptoms, pregnancy, chronic illness, or medication use, consult a qualified Ayurvedic physician or doctor.
Why blood purity matters in Ayurveda
Ayurveda sees healthy blood as a carrier of nourishment and vitality. When digestion is strong and waste is cleared well, the body absorbs nutrients better. When digestion weakens, toxins called ama may build up and affect Rakta.
Balanced blood supports:
Fresh-looking skin
Better stamina
Comfortable digestion
Stable body heat
Healthy healing and repair
Common Ayurvedic causes of impure blood
Diet plays a major role. Ayurveda often connects Rakta imbalance with excess pitta, which is hot, sharp, and intense in nature.
Common triggers include:
Very spicy foods, fried snacks, and oily meals
Excess sour foods such as pickles, vinegar, and fermented items
Stale, unhygienic, or overly processed food
Too much tea, coffee, alcohol, or tobacco
Irregular meals and late-night eating
Lack of sleep, stress, and sitting for long hours
During Indian summers, excess heat, dehydration, and spicy food can make these symptoms feel worse.
Simple home habits to support clean blood
Good food discipline is the first remedy.
Choose lighter, cooling foods such as cucumber, bottle gourd, amla, coriander, pomegranate, moong dal, and fresh seasonal fruits. Drink enough water through the day. Avoid skipping meals, and keep dinner light.
Helpful habits include:
Eat freshly cooked food whenever possible
Reduce red chilli, deep-fried food, and excess sour items
Sleep on time and avoid heavy meals late at night
Practise gentle yoga, walking, and breathing exercises
Keep the bowels regular with fibre-rich foods
Ayurvedic herbs and therapies
Ayurveda uses herbs such as manjistha, turmeric, neem, guduchi, and amla to support Rakta balance. Manjistha is traditionally valued for skin and blood health. Turmeric supports healthy inflammation response and digestion.
Panchakarma, especially procedures like virechana, may be advised for stronger pitta and Rakta imbalance. This should only be done under expert supervision.
FAQ
Can diet alone purify blood?
Diet can help a lot, especially when the issue is linked to spicy, sour, oily, or stale food. Persistent symptoms need medical guidance.
Is turmeric safe for daily use?
Small food amounts are generally common in Indian cooking. High-dose supplements should be taken only with professional advice.
When should I see a doctor?
Seek help if skin eruptions, itching, ulcers, fatigue, fever, or burning sensations continue or worsen.
A healthy takeaway
Ayurveda encourages steady, simple habits. Eat clean, sleep well, manage heat and stress, and use herbs wisely. Small daily choices can support purer blood and a healthier life.


Comments