top of page
logo.png

Attention diabetics!

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 11
5 min read

मधुमेहींनो जरा इकडे लक्ष द्या

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मधुमेही व्यक्तींनी - - - -  कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे - - -  या विषयी बघणार आहोत - -

मधुमेह म्हणजेच डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी

आपली रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी

औषध आणि पथ्य पाळणा गरजेचं तर आहेच परंतु

त्या व्यतिरिक्त

त्यांनी त्यांचे शारीरिक स्वास्थ्य कसे जपले पाहिजे हे - - - -- बघणार आहोत

मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत

अधिक रक्तगत शर्करेमुळे

मूत्रपिंड म्हणजे किडनी यांना हानी पोहोचू शकते आणि

कालांतराने ते निकामी होऊ शकतात म्हणून

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दर दोन वर्षांनी किडनी फंक्शनल टेस्ट करणं गरजेचं आहे

तसेच मधुमेह सोबत उच्च रक्तदाब असल्यास

किडनी फेल्युअर होण्याची शक्यता अधिक असते म्हणून अशा व्यक्तींनी देखील

रक्तातील साखर नियंत्रित राहील असे बघावे

मधुमेहामुळे डोळ्यांमधील दृष्टी पटलं - - --  हळूहळू निकामी होऊ शकतात

त्याला डायबिटीस रेटीनोपॅथी असे म्हणतात

दृष्टी पटले निकामी झाल्यामुळे - --  त्या व्यक्तीची दृष्टी ज्ञान हळूहळू कमी होते

असा डायबेटिक रेटीनोपॅथी नावाचा आजार - - -  डायबिटीस होऊन १० पेक्षा अधिक वर्ष झाल्यानंतर होण्याची शक्यता अधिक असते आणि

लवकर निदान केल्यास दृष्टी कमी होण्यापासून बचाव होऊ शकतो म्हणून

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे आवश्यक असते

डोळ्यांचा विचार करता मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना - - - - -

मोतीबिंदू / / / /  डोळ्यांमध्ये प्रेशर वाढणे / / / / काचबिंदू / // / रंगज्ञान कमी होणे आणि अन्य आजार होऊ शकतात म्हणून

देखील वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना - - - मज्जातंतूचे देखील विकार उद्भवू शकतात जसे - - - - - पायांची आग होणे

हातापायात मुंग्या येणे

बधीरपणा जाणवणे इत्यादी

अनेक रुग्णांमध्ये कपड्याचा स्पर्श देखील नकोसा होतो आणि

असा स्पर्श झाल्यास आग आणि वेदना अधिक प्रमाणात निर्माण होतात

भरपूर वेळेला स्पर्शज्ञान कमी झाल्यामुळे पायांना जखम होऊन देखील - समजत नाही आणि रक्तात साखर अधिक असल्यामुळे अशी जखम लवकर भरत नाही म्हणून - - -- -

प्रत्येक मधुमेही व्यक्तींनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी

पाय रोज सकाळी आणि रात्री स्वच्छ धुवून कोरडे करावेत

पायाच्या बोटांमधील जागा कोरडी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे तसेच

पायाला कुठलीही जखम झालेली असल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा

अनवाणी पायाने फिरू नये

बाहेर जाताना स्वच्छ कोरडे मोजे आणि शूज घालावेत

मधुमेहामुळे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणावर चरबीचे थर साचण्याची क्रिया लवकर सुरू होते त्याला - - --  एथेरोस्लेरोसिस असे म्हटले जाते यामुळे

त्या रक्तवाहिन्यांमधून - - - रक्तप्रवाह कमी होतो आणि

प्रसंगी त्या ठिकाणी रक्ताची गाठ तयार झाल्यामुळे - - - - त्या रक्तवाहिनीतून होणारा रक्तप्रवाह बंद देखील होऊ शकतो आणि

याच गोष्टीमुळे पॅरालिसीस / / /  हृदयाचा झटका किंवा पायाची बोटे / / /  पायाचा काही भाग काळा निळा पडतो आणि - - - - गॅंगरीन देखील होऊ शकते

क्वचित प्रसंगी - - -  पाय कापण्याची वेळ देखील येऊ शकते म्हणून

प्रत्येक व्यक्तीने रक्तातील साखर नियंत्रित राहावी अशा पद्धतीचे औषध आणि पथ्य पालन करावे - - - - -   

सोबत कोणतेही व्यसन असल्यास तात्काळ बंद करावे

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींमध्ये क्वचित प्रसंगी - - - - -  औषधी सुरू असताना आहार घेतला गेला नाही किंवा

प्रमाणापेक्षा अधिक इन्सुलिन किंवा

गोळ्यांचा डबल डोस घेतला गेला तर

हायपोग्लेसिमिया म्हणजे रक्तातील साखर अत्यंत कमी होणे असा विकार उद्भवू शकतो आणि त्यात

डोकेदुखी / / / / धुरसट दिसणे / / // थरथरणे / / / चक्कर येणे / / / / खूप घाम येणे / / / अवेळी भूक लागणे / / // छातीत धडधड होणे / / /  अशक्तपणा इत्यादी लक्षणे दिसून येतात आणि

या लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यास असा रुग्ण

बेशुद्ध होऊन गंभीर स्वरूपाची लक्षणे निर्माण होऊ शकतात म्हणून

औषधांचा जास्त डोस होणार नाही तसेच औषधी घेत असताना आहार व्यवस्थित असेल अशी व्यवस्था करावी

तेव्हा म्हणूनच मधुमेहींनो जरा या सर्व आजारांकडे लक्ष द्या

मधुमेह हा गांभीर्याने घेण्याचा विषय आहे

दुर्लक्ष करणे मृत्युकारक ठरू शकते आणि

योग्य औषधोपचार पथ्यापथ्य पालन

निश्चितच मधुमेहावर विजय मिळवण्याची गुरुकिल्ली आहे

 

Attention diabetics!

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar, today we are going to look at some of the things that diabetics need to pay attention to.People with diabetesTo keep your blood sugar under controlMedication and diet are necessary.In addition to thatHow to take care of their physical healthFor diabetic patientsDue to high blood sugarcan cause damage to the kidneys andOver time, they can become ineffective.People with diabetes should have a kidney function test every two years.If you have diabetes and high blood pressureSuch people are also more likely to suffer from kidney failure.Keep your blood sugar under controlDiabetes can cause gradual loss of visionThis is called diabetic retinopathy.Due to the failure of vision --- the person's vision gradually decreases.Diabetic retinopathy is more likely to occur after more than 10 years of diabetes.Early detection can prevent vision lossPeople with diabetes should have an eye exam once a year.For people with diabetes...Cataract / / / Increase in pressure in the eyes / / / / / / / / / / / / / Glaucoma / / / As it can cause loss of color and other diseasesAlso check your eyes from time to time.People with diabetes may also have neurological disorders, such as burning in the legs.Numbness in the handsfeeling dizzy, etc.In many patients the touch of clothes also becomes unwanted.Such touch causes more pain and burning sensation.Many times due to loss of sense of touch, the feet also get injured - due to lack of understanding and due to high blood sugar, such injuries do not heal quickly.Every diabetic person should take special care of their feet.Wash your feet every morning and night.Particular attention should be paid to drying the area between the toes.Seek immediate medical attention if you have any injuries.Don't walk barefootWear clean, dry socks and shoes when going out.Atherosclerosis is a condition in which fatty deposits form on the inner lining of the arteries.the blood flow decreases, andOccasionally the formation of a blood clot in that place can also stop the flow of blood through that blood vessel andThe same thing can cause paralysis / / / heart attack or toe / / / part of the foot becomes dark blue and --- gangreneIn some cases --- it may even be time to amputate the leg.Everyone should follow a healthy diet to keep their blood sugar under control.Stop the drug immediately if you have any symptomsIn people with diabetes, on rare occasions, the diet was not taken while the medication was being administered, ormore than the amount of insulin orIf a double dose is taken.Hypoglycemia is a condition in which the blood sugar level is too low.Headache, dizziness, nausea, vomiting, etc. are some of the symptoms.If you ignore these symptomsIt can lead to serious symptomsThere should not be an overdose of medicines and arrangements should be made so that the diet is proper while taking medicines.That's why diabetics should pay attention to this disease.Diabetes is a serious issue.Negligence can lead to death andAdhere to the right medication regimen.This is definitely the key to overcoming diabetes.

 

Recent Posts

See All
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page