पांढ-या पेशी कमी होणे
- Abhishek Patil
- May 31, 2024
- 1 min read
Updated: Apr 25
पांढ-या पेशी वाढणे आणि कमी होणे असे दोनही प्रकार आढळतात. पांढ-या पेशी शरीरातील सैनिक म्हटल्या जातात. शरीरावर जीवाणु-विषाणुंचे आक्रमण झाल्यास त्यांचेवर हल्ला करुन त्यांना नष्ट करण्याचे काम पाढ-या पेशींचे असते,. या पेशींचे प्रमुख पाच प्रकार आहेत.
साडेचार हजार ते दहा हजार प्रती मायक्रोलिटर रक्त हे याचे प्राकृत प्रमाण आहे.
पांढ-या पेशी कमी होण्याचे कारणांमध्ये जीवाणू-विषाणुंचे आक्रमणाने बोनमॅरो मध्ये बिघाड, यकृत आणि पांथरीचे विकार प्रामुख्याने येतात. तर —
अॅलर्जी,काही संधीवात, कॅन्सर, मानसिक ताणतणाव, त्वचा जळणे इ. मध्ये पांढ-या पेशी संख्येने वाढतात.
ज्या व्यक्तींची पांथरी शरीरातून काढून टाकली असेल त्यांना आयुष्यभर थोडया अधीक प्रमाणात पांढ-या पेशी आढळतात. काही औषधी पांढ-या पेशी वाढवतात उदा. क्लोरोफॅर्म, अॅस्पेरीन इ. तर काही औषधी पांढ-या पेशी कमी करतात उदा. अॅन्टीबायोटिक्स, केमेथेरपी, लघवी वाढवीणारे औषधी इ.
अनेक विषाणु-जिवाणु संसर्ग झाल्याने बोनमॅरोवर आघात होतो आणि पांढ-या पेशींची निर्मीती कमी होते.
उपचार —
१. संपुर्ण विश्रांती, वैदयकिय सल्ल्याने त्यांचे निगराणीत औषधोपचार इ.
२. शरीर प्रतीकारक्षमता वाढविण्यासाठी गुळवेल, तुळस, जेष्टमध, सुंठ, पिंपळी, आवळा इ. चा वापर आयुर्वेद तज्ञांचे मार्गदर्शनात करावा.
३. फळांचा वापर भरपुर प्रमाणात असावा.
४. थंड पाणी पिणे एवजी कोमट पाणी प्यावे, त्यातल्या त्यात नुसते कोमट पाणी न घेता त्यात सुंठ, तुळस, गुळवेल इ. टाकून घेतल्यास उत्तम.
५. खजुर, काळी मनुका, साळीच्या लाह्या, गायीचे तुप इ. घ्यावे.


Comments