top of page
logo.png

Sagargota Medicinal Uses Ayurvedic Benefits for Stomach Joint and Skin Health

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

सागरगोटा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण सागरगोटा या शेताला कुंपण स्वरुपात लावण्यात येणाऱ्या वनस्पती विषयी चर्चा करणार आहोत - - - - -  सागरगोटा, या वनस्पतीला आयुर्वेदात लताकरंज असे म्हणतात. औषधात बीया, मूळ, पानं आणि खोड यांचा उपयोग केला जातो.

सागरगोटी गुणाने उष्ण असून चवीला तिखट-कडू-तुरट असते तसेच कफ आणि वात दोषाचा नाश करते, पित्त दोषाला वाढवीत नाही.

पोट दुखत असल्यास सागरगोटी बीज चुर्ण, सुंठ, सैंधे मीठ, हिंग, लिंबू रस एकत्र करुन घेतल्यास बरे वाटते.

अतिसारावर सागरगोटी बीज चुर्ण, जीरे, बडीशोप आणि खडी साखर एकत्र करुन घ्यावी, लगेच आराम पडतो.

शरीराच्या एखाद्या सांध्याला सूज आलेली असल्यास रुई - एरंड आणि सागरगोटीची पाने एकत्र वाटून गरम करुन लेप करावा, सूज नाहीशी होते. 

लहान मुलांमध्ये जंत होण्याची शक्यता नेहमी असते तेव्हा अशा कृमींमध्ये सागरगोटी पानांचा रस, आंबे हळद आणि पळस बी एकत्र करुन द्यावे, असेच मिश्रण मोठ्या व्यक्तींना पण देता येऊ शकते.

मुख्यत: विषम ज्वर म्हणजे मलेरीया या विकारात उत्तम काम करते, यांत लताकरंज पानांचा रस, तुळस रस, आद्रक रस समभाग एकत्र करून द्यावे.   

लघवी अति प्रमाणात होत असेल तर लताकरंज फुलं पाण्यात भिजवून त्यांना कुचकरून ते पाणी पिल्यास लघवीचे प्रमाण कमी होते.

अनेक स्त्रियांना गर्भ न राहण्याच्या कारणांमध्ये - व्लोकेज आफ़ फ़ेलोपियन ट्युब म्हणजे गर्भ नलिका बंद असणे हे कारण असते अशा रुग्णांना लता करंज म्हणजे सागर गोटी एक आशेचा किरण आहे.    अनेक प्रकारच्या त्वचा विकारात सागर गोटी उत्तम कार्य करते.

अर्धे डोके दुखी या विकारात सागर गोटी बीज, तेजपान आणि वेखंड यांना अत्यंत बारीक करून नाकाने जोरात हुंगण्याने म्हणजे नस्य केल्याने बरे वाटते.

तीळ तेलात याच्या पानांचा रस टाकून उकळून केलेया तेलाची मालिश डोक्याला केल्यास केस गळणे बंद होतात.

मुख दुर्गन्धता येत असेल तर सागरगोटीच्या काडीने दात घासावे, लगेच फायदा होतो.

अनेक त्वचा विकारात लताकरंज बीज, हळद, हिरडा आणि रुईची पान यांना एकत्र कुटून लेप केल्यास खाज, स्त्राव इ. कमी होतात.

असे अनेक उपयोग आपल्या घरात असणाऱ्या पदार्थांचे असतात - - -  पण शक्यतो वैद्यकीय सल्ल्या खेरीज - - - - कोणतेही प्रयोग कुणीही करू नये - - -  - कारण प्रत्येक मनुष्याची प्रकृति वेगवेगळी असते. - - -  - - - औषधाचे प्रमाण हे मनुष्याची प्रकृति, - - - वय, - - - त्याचे शारीरिक बल, - - - मानसिक बल, - - - -   शरीरातील दोषांची स्थिती, - - - -  प्रतिकार क्षमता, - - - -  ऋतु, - - -  -  काल म्हणजे सकाळ, सायंकाळ वा रात्र इ. वर अवलंबून असते.          

 

  

Sagargota Medicinal Uses Ayurvedic Benefits for Stomach Joint and Skin Health

सागरगोटा, also called लताकरंज, is a thorny climbing shrub known in Ayurveda for its bitter seeds and strong medicinal value. It is commonly identified with Caesalpinia bonduc, often called fever nut in English. Traditional healers have used it for digestive complaints, fever, swelling, and some skin problems, but it should be used with care.

What makes सागरगोटा important in Ayurveda

The plant has grey, hard seeds inside prickly pods. Its leaves are compound, the stem is thorny, and the roots are used in traditional preparations. In Ayurveda, सागरगोटा is valued for its bitter, warming, and digestive-supporting qualities.

It is mainly used to support:

Weak digestion and stomach discomfort

Loose motions and diarrhoea

Fever management in traditional practice

Joint swelling and stiffness

Itching, minor skin eruptions, and inflammation

Medicinal parts of the plant

Different parts of सागरगोटा are used in different ways.

Seeds 

The seeds are the most used part. They are traditionally powdered after proper purification and used for stomach issues, fever, and intestinal complaints.

Roots 

Roots are used in decoctions for swelling, pain, and fever-related weakness.

Leaves 

Leaves are often used externally as a paste for skin irritation and local swelling.

Stem 

The stem is less commonly used but appears in some traditional preparations for inflammatory conditions.

Traditional remedies for diarrhoea and fever

For diarrhoea, Ayurvedic practitioners may use a very small quantity of purified सागरगोटा seed powder with honey or warm water. This is not suitable for self-medication, especially in children, pregnancy, dehydration, or bloody stools.

For fever, seed powder or root decoction has been used traditionally. This does not replace proper diagnosis, especially if fever is high, persistent, or linked with dengue, malaria, typhoid, or infection.

Benefits for joints and skin

For joint swelling, सागरगोटा leaf paste or seed-based preparations may be used externally in traditional care. Its bitter nature is believed to reduce local inflammation.

For skin disorders, leaf paste may help with itching or minor eruptions. Avoid applying it on open wounds, severe rashes, or infected skin without medical advice.

FAQs

Is सागरगोटा safe for daily use?

No. It is a potent herb and should be used only under guidance from an Ayurvedic doctor or qualified healthcare professional.

Can सागरगोटा cure diarrhoea?

It may support traditional diarrhoea management, but it is not a guaranteed cure. Hydration and medical evaluation are essential.

Who should avoid सागरगोटा?

Pregnant people, children, people with chronic illness, and those on regular medicines should avoid it unless prescribed.

Can I use सागरगोटा for joint pain?

External use may be suggested in traditional practice, but persistent swelling needs medical diagnosis.

सागरगोटा has a respected place in Ayurveda, yet its strength demands caution. Use it as a guided herbal remedy, not as a casual home experiment.

 

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जात

 
 
 

Comments


bottom of page