top of page
logo.png

Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 13
  • 3 min read

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात

या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जातात

ज्या पद्धतीने मेहंदी चे झाड कुंपण म्हणून लावतात तसेच निर्गुंडीची झाडी देखील अनेक ठिकाणी कुंपणाच्या स्वरूपामध्ये लावली जातात 

निर्गुंडी चे मूळ

निर्गुंडीची पानं ही औषधी उपयोगासाठी वापरली जात असतात

प्रामुख्याने वातदोष कमी करण्यासाठी यांचा उपयोग होतो 

निर्गुंडी पानांच्या पासून बनवलेल्या तेलाचे विशेष उपयोग आहेत आणि

तेच आज आपण बघणार आहोत 

निर्गुंडीच्या पानांचा रस काढून त्याच्या एक चतुर्थांश तीळीचे तेल घ्यावे

म्हणजे जर चार लिटर निर्गुंडीच्या पानांचा रस असेल तर त्यात

एक लिटर तीळ तेल टाकून

मंद आचेवर म्हणजेच कमी गॅसवर सातत्याने उकळवावं

जोपर्यंत त्यातील पाण्याचा अंश म्हणजेच जो रस आहे तो पूर्ण

आटत नाही म्हणजेच शेवटी एक लिटर तेल शिल्लक राहील इथपर्यंत

ते तेल गॅसवर ठेवायचे असते

तसे पहिले तर निर्गुंडी तेल बनवण्याची शास्त्रोक्त विधी

अजून थोडी किचकट आहे पण येथे थोडक्यात सांगितली आहे

म्हणून असे तेल घरच्या घरी बनवण्यापेक्षा

वैद्यांकडून किंवा चांगल्या कंपनीचे आणावे

असे निर्गुंडी तेल हे ज्या ज्या ठिकाणी वेदना आहेत म्हणजेच

उदाहरणार्थ गुडघे दुखत असतील तर गुडघ्यांसाठी

पायाच्या पोटऱ्या दुखत असतील तर पायासाठी

कंबर पाठ दुखत असेल तर त्या भागी हलक्या हाताने लावण्यासाठी किंवा

त्याचा मसाज करण्यासाठी याचा उपयोग होतो 

पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस झाला असताना देखील

वातदोष कमी करण्यासाठी

संपूर्ण शरीराला मालिश करण्यासाठी आणि बस्ती रुपात देखील

याचा उपयोग केला जाऊ शकतो 

तसेच साधारणतः स्वस्थ राहण्यासाठी म्हणजेच

आपण निरोगी राहण्यासाठी पंचकर्म करीत असतांना त्यातील

पूर्व कर्मात म्हणजेच मसाज प्रक्रियेमध्ये

संपूर्ण शरीराच्या मालिश साठी देखील निर्गुंडी तेल उत्तम असते परंतु

प्रत्येकाची प्रकृती

वय आणि असणारे आजार

तसेच लक्षणं यावर वैद्य ठरवू शकतो

प्रामुख्याने कफ प्रकृती आणि वात प्रकृती असणाऱ्या व्यक्तींसाठी

हे तेल अत्यंत उपयुक्त असते शक्यतो

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींसाठी याचा वापर केला जात नाही 

निर्गुंडी तेल हे केसांसाठी देखील उत्तम असते म्हणून

डोक्याच्या मालिश साठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो 

आमवात असणाऱ्या व्यक्तींसाठी या तेलाचा उपयोग करू नये तसेच

काही विशिष्ट लक्षणं असतांना याचा उपयोग वर्ज्य आहे

म्हणूनच केव्हाही कोणत्याही औषधांचा वैद्यकीय सल्ल्याखेरीस वापर

करणे चुकीचं ठरू शकते

 

 

 

 

Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

Nirgundi oil, made from the leaves of Vitex negundo, is widely used in Ayurveda for stiffness, body ache, and Vata-related discomfort. Its warming and soothing nature makes it useful in external applications, especially when pain feels worse with cold, dryness, or overexertion.

Key benefits of Nirgundi oil

Nirgundi oil is mainly used for pain relief, swelling, stiffness, and joint discomfort. In Ayurvedic practice, it is valued for balancing aggravated Vata dosha, which is often linked with dryness, cracking joints, muscle tightness, and wandering pain.

Common uses include:

Massaging painful joints, knees, shoulders, or back

Reducing muscle stiffness after strain

Supporting comfort in neck and lower back pain

Applying around mildly swollen areas, if the skin is intact

Using as part of warm oil massage for Vata-prakriti people

How to make oil from Nirgundi leaf juice

To prepare traditional Nirgundi oil, fresh leaves are washed and crushed to extract juice. This leaf juice is then cooked with a base oil, often sesame oil, on low heat until the water content evaporates and the oil absorbs the plant properties.

A common home method is:

Wash fresh Nirgundi leaves well.

Crush or grind them and squeeze out the juice.

Mix the juice with sesame oil.

Heat gently on a low flame.

Stop when the moisture evaporates and only medicated oil remains.

Cool, strain, and store in a clean glass bottle.

Avoid overheating, as it can reduce the quality of the oil.

How to use it for pain and hair care

For pain, warm a small amount of oil and massage gently for 5 to 10 minutes. Covering the area with a warm cloth may improve comfort. Do not apply on wounds, rashes, or infected skin.

For hair, apply a small quantity to the scalp, massage lightly, and leave it for 30 minutes before washing. It may help with scalp dryness and tension-related heaviness.

Who may find it useful

Nirgundi oil is especially suitable for people with Vata prakriti or Vata imbalance. People with sensitive skin, pregnancy, chronic illness, or ongoing medication should use it only after professional advice.

FAQ

Can Nirgundi oil cure arthritis?

No. It may support pain relief, but it is not a cure. Medical diagnosis and treatment are essential.

Can it be used daily?

Some people use it regularly for massage, but daily use should be guided by an Ayurvedic doctor.

Is it safe for children?

Use in children only after consulting a qualified practitioner.

Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care are best understood as supportive Ayurvedic care. Always seek medical advice before using it for persistent pain, swelling, skin issues, or hair problems.

 

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Durva Grass Benefits for Health and Healing During Ganesh Chaturthi

दुर्वांचे औषधी उपयोग नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण संकष्टी चतुर्थी किंवा गणेश उत्सव किंवा गणपतीच्या कोणत्याही समारंभात दुर्वांची जोडी गणरायाला अर्पण करत असतो परंतु या दुर्वांचा आपल्या आर

 
 
 

Comments


bottom of page