top of page
logo.png

Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 14
  • 4 min read

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण

मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी

नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत 

आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / /  पचनासाठी

भोजनानंतर म्हणजेच आहारानंतर तांबूल सेवन विधी सांगितलेला आहे 

तांबूल सेवन याचा अर्थ विड्याचे म्हणजेच नागवेलीची पानं होय 

नाग वेलीच्या पानांचे प्रामुख्याने कपूरी पान आणि मलबारी पान

असे दोन प्रकार बाजारात उपलब्ध असतात 

अनेक प्रकार जरी असले तरी देखील

सर्वच प्रकारची पानं प्रामुख्याने तिखट चवीची

पोट साफ करणारी

पाचक

थोड्या प्रमाणात पित्त वाढवणारी

वात आणि कफ दोष कमी करणारी असतात 

नागवेलीच्या पानांमध्ये एक प्रकारचे सुगंधी तैल असल्यामुळे

ते मुखशुद्धी करते आणि दातांना

किडण्यापासून प्रतिबंध करत असते तसेच

पचनाला देखील सहाय्यक असते म्हणून

आयुर्वेदामध्ये भोजनानंतर पान खाणे हा विधी सांगितलेला आहे

भोजनानंतर तोंडातला चिकटपणा कमी करण्यासाठी

अन्नाचे कण दातात अडकलेले असतील तर ते बाहेर निघण्यासाठी

तसेच मुखाला सुगंधित बनवण्यासाठी उत्तम असते 

पानाला चुना + काथा लावून सेवन केले जाते याचे

प्रमाण योग्य असतील तर त्याचा फायदा होऊ शकतो अन्यथा

त्याचे तोटेच अधिक आहेत तसेच सोबत

वेलची

धण्याची डाळ

बडीशोप

सुपारी

लवंग

गुलकंद

मिठी पत्ती इत्यादी वापरले जातात परंतु हे सर्व मिश्रण

विशिष्ट आजारांवर / / /  लक्षणांवर योग्य प्रमाणात वापरल्यास उत्तम असते 

खोकला असल्यास पानांमध्ये ओवा टाकून सेवन केला जातो 

अनेक प्रकारच्या श्वसन संदर्भातील म्हणजे सर्दी / / / ताप

कफ / / / खोकला / / / फुफ्फुसांच्या संबंधित आजार यावर

लवंग / / / वेलदोडा सोबत पान सेवन केले जाते 

दात आणि हिरड्यांच्या दुखण्यांमध्ये

विड्याच्या पानात थोडं कापूर मिसळून हे पान चावून चावून सेवन केल्यास

दुखणे कमी होते 

वारंवार डोकेदुखीचा त्रास असल्यास

विड्याच्या पानांचा रस डोक्याला लावल्याने

डोकेदुखी कमी होऊ शकते 

विड्याच्या पानाच्या सेवनाने युरिक ऍसिड ची पातळी

कमी होऊ शकते म्हणजेच यूरिक ॲसिड वाढल्यामुळे जर

कोणाला सांधेदुखीची समस्या असल्यास ती

निश्चितच कमी होते 

अनेक व्यक्ती पानासोबत तंबाखू सेवन करतात आणि

त्यामुळे मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते 

पानासोबत अधिक प्रमाणात सुपारी सेवन केल्यास

कफाचे आणि sab mucous fibrosis सारखे अन्य आजार देखील होऊ शकतात 

भोजनानंतर तांबूल सेवन हे जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे त्यानुसार

नागवेलीचे पान सेवन केल्यानंतर

पाण्याद्वारे मुखाची शुद्धी करावी म्हणजेच चांगल्या प्रकारच्या गुळण्या कराव्यात अन्यथा त्यातील कण दातात अडकून मुख विकार होऊ शकतात 

ज्या व्यक्तींनी पंचकर्म केलेली आहेत विशेषतः

विरेचन म्हणजेच पोट साफ करण्याची औषधी घेतलेली आहे

ज्यांना अतिसार झालेला आहे

ज्यांनी उपवास केलेला आहे

त्यांनी पानाचे सेवन करू नये तसेच

लहान मुलं

गर्भवती स्त्रिया यांनी अधिक सेवन टाळावे 

 

 

 

Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

A small betel leaf after a meal is more than a familiar Indian tradition. Nagaveli leaves, also known as betel leaves or paan leaves, hold a respected place in Ayurveda for supporting oral hygiene, digestion, and freshness after food when used carefully.

Why Nagaveli Leaves Are Valued in Ayurveda

In Ayurveda, Nagaveli is considered warming and stimulating. It is traditionally used after meals to awaken digestion, reduce heaviness, and refresh the mouth.

Common varieties include:

Kapuri Nagaveli - Known for its pleasant aroma and softer taste. Often preferred for mouth-freshening preparations.

Malabari Nagaveli - Usually larger and stronger in flavour. It is commonly used in traditional paan preparations.

The quality of the leaf matters. Fresh, green, clean leaves are preferred over dry, damaged, or overly bitter ones.

How Betel Leaves Support Oral Health

Nagaveli leaves have a sharp, aromatic taste that helps freshen breath naturally. Chewing the leaf stimulates saliva, which helps wash food particles from the mouth.

Traditionally, betel leaves are also valued for helping maintain gum comfort and reducing mouth odour. Their natural compounds may help discourage bacterial growth, which is one reason they are linked with preventing tooth decay in traditional practice.

This does not replace brushing, flossing, or dental check-ups. Think of it as a supportive habit, not a cure.

Digestive Benefits After Meals

The traditional practice of eating Nagaveli after meals comes from its digestive role. It may help reduce bloating, support appetite, and ease post-meal heaviness.

Many people combine the leaf with a tiny amount of chuna, or slaked lime, along with ingredients like fennel, cardamom, clove, or areca nut. Proportion is crucial. Too much lime can irritate the mouth and throat, while excess areca nut or tobacco can harm health.

Possible Benefits and Key Risks

Some traditional uses link Nagaveli with easing headaches and supporting healthy uric acid levels. These benefits need more scientific support, so they should be viewed as traditional, not guaranteed medical effects.

The biggest risk comes from overuse, especially when betel leaves are consumed with tobacco or too much areca nut. This can damage oral tissues and raise serious long-term health risks.

FAQ

Can Nagaveli leaves be eaten daily?

Occasional use after meals is common, but daily use with lime, areca nut, or tobacco is not advisable.

Are betel leaves good for bad breath?

Yes, they can freshen breath naturally, especially when chewed plain or with mild spices.

Can children eat Nagaveli leaves?

Children should avoid paan preparations, especially those with lime, areca nut, or tobacco.

Takeaway

Nagaveli leaves can be a useful traditional aid for breath freshness and digestion when used in small, careful amounts. Pregnant women, children, people with mouth ulcers, acidity, or chronic health conditions should seek medical advice before use. Keep it simple, avoid tobacco, and treat it as a supportive Ayurvedic habit, not a medical treatment.

 

Recent Posts

See All
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जात

 
 
 
Durva Grass Benefits for Health and Healing During Ganesh Chaturthi

दुर्वांचे औषधी उपयोग नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण संकष्टी चतुर्थी किंवा गणेश उत्सव किंवा गणपतीच्या कोणत्याही समारंभात दुर्वांची जोडी गणरायाला अर्पण करत असतो परंतु या दुर्वांचा आपल्या आर

 
 
 

Comments


bottom of page