top of page
logo.png

Moringa Health Benefits Ayurveda Uses Sweet vs Bitter Varieties and Daily Remedies

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 10
4 min read

आरोग्यवर्धक शेवगा

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर - - - -  आज सर्वांनाच परिचित असणारी शेवगा भाजी - - - -  या विषयी बघणार आहोत

आयुर्वेदात अति प्राचीन काळापासून औषधी उपयोगात शेवगा वापरला जात आहे

शेवग्याची पानं

शेवग्याचे मूळ

मुळाची साल

शेवग्याच्या झाडाची साल आणि

शेवग्याच्या शेंगा

शेंगेमधील बी हे सर्वच औषधी उपयोगा मध्ये वापरले जाते

आयुर्वेदाच्या प्रमुख ग्रंथांपैकी चरक आणि सुश्रुत या

दोन्ही ग्रंथांमध्ये याचे वर्णन आहे

गोड शेवगा आणि कडू शेवगा असे याचे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात

सामान्यतः गोड शेवगा भाजीसाठी उपयोगाचा असतो तर

कडू शेवगा - - - वातव्याधी आणि बाह्य उपचारासाठी अधिक गुणकारी असतो

कडू शेवगा चवीला

कडू / /  उष्ण / / कफ कमी करणारा

सूज आणि वातनाश करणारा असतो तर

गोड शेवगा

भूक वाढविणारा

मल साफ करणारा

चवीला गोड

सूज कमी करणारा

पोटफुगी

वात वेदना यात उत्तम असतो

दोषांचा विचार केल्यास पित्त आणि कफ दोषाचा नाश करण्यासाठी गोड शेवगा उपयुक्त आहे

शेवग्याच्या बिया डोळ्यांसाठी हितकर असून

उष्ण असतात ह्या  - -  

कफ आणि वात दोष नष्ट करणाऱ्या असतात

आपणा सर्वांना शेवग्याच्या शेंगाची भाजी माहित आहे परंतु

याच्या फुलांची तसेच - -  कोवळ्या पानांची देखील भाजी केली जाते

फुलांची भाजी ही वात रोगींसाठी उपयुक्त असून

स्नायूंच्या सुजेवर

जंत आणि गुल्म या रोगांवर

अत्यंत उपयुक्त आहे

शेवग्याची शेंग - - - -  चवीला मधुर / /  तुरट असून

भूक वाढवणारी असते तसेच

दोषांचा विचार केल्यास - - - कफ पित्त या दोन दिवसांना कमी करणारी

विविध वेदनात

त्वचा विकारत 

क्षय आणि श्वासविकारात उत्तम असते

याच्या कोवळ्या पानांची भाजी वात कमी करणारी आणि प्रामुख्याने

कॅल्शियम देणारी असते

मुळव्याधीत प्रामुख्याने ज्या मुळव्याधीत रक्त जात नसतं अशा

मूळव्याधीत शेवगा सालीचा काढा करून त्यात बसल्यास वेदना कमी होतात

उचकी आणि श्वास रोगात शेवग्याच्या पानांचा रस दिल्यास ताबडतोब बरे वाटते

पोटफुगी आणि पोट दुखी असल्यास

शेवगा पानांचा रस + हिंग आणि सुंठ एकत्र करून दिल्यास तात्काळ बरे वाटते

शेवग्याच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून दिवसातून दोन वेळेला दिल्यास

पोटातील कृमी निघून जातात आणि नवीन

कृमींची उत्पत्ती देखील बंद होते

अर्धांग वायू व्याधीत म्हणजे पॅरालिसीस मध्ये

शेवगा मूळ आणि एरंडमूळ काढा सेवन केल्यास वात दोष कमी होऊन

वातवाहिन्यांची विकृती कमी होते

डोक्यात छोट्या छोट्या पुटकुळ्या झाल्या असतील आणि

खाज येत असेल तर

शेवग्याच्या पानांचा रस डोक्यावर लावल्यास पुळ्या नष्ट होतात

शेवगा हा तीष्ण आणि उष्ण असल्याने मेदाचे पाचन आणि शोषण करतो म्हणून

स्थूलता कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो

ज्या स्त्रियांना मासिक पाळीत अंगावरून व्यवस्थित जात नाही किंवा

गाठी अधिक प्रमाणात जातात

अशां साठी शेवग्याची भाजी हे उत्तम औषध आहे

संध्यांवर सूज आली असता - -   

पानांचा वाटून लेप केल्यास - -  सूज कमी होऊन दुखणे - कमी होते

किडनीचे विकार असल्यास शेवगा वर्ज्य करावा तसेच

शेवग्याच्या सालीचा लेप काही त्वचा विकारात केला जातो हा लेप अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ त्वचेवर ठेवू नये अन्यथा त्वचेवर आग होते - - लालीमा येते

शेवग्याच्या मुळाची साल गर्भपातक आहे त्यामुळे गर्भावस्थेत शेवग्याचे मूळ अभ्यंतर सेवनासाठी वापरू नये

अशा प्रकारे शेवग्याचा आपण घरगुती उपयोग करून घेऊ शकतो

 

 

Moringa Health Benefits Ayurveda Uses Sweet vs Bitter Varieties and Daily Remedies

Moringa, known as shevga in Marathi, is more than a common kitchen plant. In Ayurveda, its leaves, pods, flowers, bark, and roots have long been used for food and medicine, especially for digestion, swelling, skin concerns, and weakness.

Why moringa is valued in Ayurveda

Ayurveda describes moringa as light, sharp, warming, and useful for clearing sluggishness in the body. Its leaves are rich in plant protein, iron, calcium, fibre, and antioxidants. The tender pods are easy to cook and support daily nutrition.

Common traditional uses include:

Leaves - Used in vegetables, soups, chutneys, and powders to support strength and nourishment.

Pods - Often added to dal, sambar, and curries. They are gentle on digestion and widely used as a food remedy.

Roots - Traditionally used in small, careful amounts under guidance. They are strong in action and not meant for casual home use.

This article is for general information only. People with chronic illness, pregnancy, or those on regular medicines should seek medical advice before using moringa as a remedy.

Sweet moringa and bitter moringa differ in action

Sweet moringa is usually milder in taste and commonly preferred for food. It suits regular use in meals and helps improve nutrition without being too harsh.

Bitter moringa has a sharper taste and is traditionally considered stronger. It is often linked with clearing excess kapha, reducing heaviness, supporting digestion, and helping inflammatory conditions. Because of its intensity, it should be used in moderation.

This is where Moringa Health Benefits Ayurveda Uses Sweet vs Bitter Varieties and Daily Remedies becomes a practical theme: choose the variety and part of the plant based on need, taste, and tolerance.

Daily ways to use moringa safely

Simple kitchen use is often the best starting point.

Add fresh leaves to dal, thalipeeth, paratha, or rice bhakri dough.

Cook pods with tur dal, sambar, or light curry.

Use dried leaf powder in small amounts in soups or buttermilk.

Apply a paste of fresh leaves externally for minor skin irritation, after a patch test.

For indigestion, a light moringa leaf soup with cumin and ginger may help. For inflammation, regular use of leaves and pods in meals can support the diet, though it should not replace treatment.

FAQ

Can moringa be eaten daily?

Yes, tender leaves and pods can be eaten regularly as part of meals. Start with small portions.

Is bitter moringa better than sweet moringa?

Not always. Bitter moringa is stronger, while sweet moringa is easier for daily cooking.

Can moringa help skin problems?

Traditional use supports its role in skin care, especially as a leaf paste. Persistent skin issues need medical diagnosis.

A simple takeaway

Moringa is a valuable Ayurvedic food plant when used wisely. Let the kitchen be the first medicine cabinet: fresh leaves, tender pods, simple spices, and regular moderation.

 

Recent Posts

See All
Health Benefits of Dill Leaves You Should Know

शेपूची भाजी खाण्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शेपूची भाजी खाण्याचे काय काय फायदे आहेत या विषयी बघणार आहोत शेपूची भाजी सेवन केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि पोट देखी

 
 
 
Vegetarianism or non-vegetarianism

शाकाहार का मांसाहार नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपणास शाकाहार करावा की मांसाहार करावा या विषयी आयुर्वेद मत आणि माझं मत सांगणार आहे आयुर्वेदा मध्ये शाकाहार म्हणजे शाक + आहार असा तो शब्द आ

 
 
 
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 

Comments


bottom of page