Vegetarianism or non-vegetarianism
- Satish Shindadkar
- Aug 14
- 4 min read
शाकाहार का मांसाहार
नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज
आपणास शाकाहार करावा की मांसाहार करावा या विषयी
आयुर्वेद मत आणि माझं मत सांगणार आहे
आयुर्वेदा मध्ये शाकाहार म्हणजे शाक + आहार असा तो शब्द आहे
शाक म्हणजे भाजीपाला
जो आपल्या निसर्गामध्ये
जमिनीत लागवड करून उपलब्ध केला जातो आणि
मांसाहार या प्रकारामध्ये प्राणी
पक्षी
जलचर म्हणजे पाण्यात राहणारे यांचा समावेश होतो
अजून थोडं विस्तृत वर्णन करायचं झालं तर
मांसाहार करणारे प्राणी जसे सिंह लांडगे कुत्रे इत्यादी
शाकाहार करणारे प्राणी जसे गाय / / / बैल
म्हैस / / हत्ती / / / उंट जिराफ इत्यादी
पक्षांमध्ये देखील पाण्यामध्ये राहणारे
जमिनीवर राहणारे आणि आकाशात उडणारे
असे प्रकार होतात
जलचरांमध्ये जे पाण्यामध्ये निर्माण होणारे व त्यातही दोन प्रकार
खाऱ्या पाण्यात म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये निर्माण होणारे आणि
गोड्या पाण्यात निर्माण होणारे
माशांचा विचार केला तर खाऱ्या पाण्यातले आणि गोड्या पाण्यातले असे अनेक प्रकार होत असतात
आयुर्वेदामध्ये शाकाहार आणि मांसाहार या दोघांचे वर्णन अगदी
विस्तृतरित्या दिलेले आढळते
याचाच अर्थ असा होतो की आयुर्वेदाला मांसाहार मान्य आहे
आयुर्वेदातले अनेक संदर्भ बघता मांसाहार हा विशिष्ट
आजारातील लक्षणांवर सांगितलेला आहे
या सृष्टीत आढळणाऱ्या प्रत्येक प्राणी
पक्षी आणि जलचर यांच्या मांसा बद्दलचे विस्तृत वर्णन आयुर्वेदा मध्ये आहे
मांसाहार करताना तो भाजून
चांगल्या प्रकारे शिजवून
पचनाला हलका करून आणि सोबत
विशिष्ट प्रकारचे मसाले टाकूनच तयार करायला सांगितलेला आहे
अशा पद्धतीने बनवलेला मांसाहार विविध आजारांमध्ये आणि
आजारांच्या काही लक्षणांना नष्ट करण्यासाठी उत्तम असतो असे वर्णन
आयुर्वेदामध्ये आलेले आहे तसेच एखादा व्यक्ती मांसाहार करत नसेल
आणि त्याला त्या स्वरूपाचे मांस देणे गरजेचे असतील तर
त्या रुग्णाला त्या मांसाहाराला लपवून
आहारामध्ये सेवन करायला देखील सांगितलेले आहे
म्हणजेच आयुर्वेदाने मांसाहार हा केवळ औषधी रूपामध्ये
सेवन करायला सांगितलेला आहे
तसं पाहिलं तर मनुष्याने मांसाहार करावा का ? किंवा करू नये याबद्दल
मी अधिक बोलणार नाही परंतु जी काही सृष्टीची
रचना आहे त्यावरून
मनुष्य प्राणी हा शाकाहारी असावा असा तर्क आपण काढू शकतो
आणि आयुर्वेदाला अपेक्षित असणाऱ्याच काळामध्ये मांसाहार करणं उत्तम आहे
मांसाहारामध्ये आयुर्वेदाने उडणारे पक्षी
जलचर उदाहरणार्थ मासे इत्यादी उत्तम सांगितलेले आहे तसेच
अधिक प्रमाणात मांसाहार केल्याने निर्माण होणाऱ्या व्याधींचे देखील वर्णन केलेले आहे
अधिक प्रमाणात पाण्यात राहणारे जलचर सेवन केल्यास
मधुमेह म्हणजेच डायबिटीस सारखे विकार होतात असे देखील
आयुर्वेदाने म्हटले आहे
आपले शरीर आणि मन सात्विक राहण्यासाठी
शाकाहार हाच उत्तम आहार आहे असे आयुर्वेदाचे आणि माझे ठाम मत आहे म्हणून आयुर्वेदाला अपेक्षित असणाऱ्या आहाराला
जर आपण सेवन केलं तर निश्चितच 100 वर्षे निरोगी दीर्घायु प्राप्त होणे सहज शक्य आहे
Vegetarianism or non-vegetarianism
Greetings, I am Dr. Satish Vasant Shindadkar today
I am going to tell you about whether one should follow a vegetarian or non-vegetarian diet, according to Ayurveda and my opinion
In Ayurveda, the word vegetarianism means shaak + aahaar
Shaak means vegetables
which are made available in nature by cultivating them
and in the non-vegetarian category, animals
birds
and aquatic creatures, meaning those that live in water, are included
To describe it a little more extensively
carnivorous animals such as lions wolves dogs etc.
herbivorous animals such as cows / / / bulls
buffaloes / / elephants / / / camels giraffes etc.
Among birds too, there are those that live in water
those that live on land and those that fly in the sky
there are such types
Among aquatic creatures, those that originate in water are also of two types
those that originate in salt water, meaning seawater, and
those that originate in fresh water
If we consider fish, there are many types such as those from salt water and those from fresh water
In Ayurveda, descriptions of both vegetarian and non-vegetarian diets are found in great
detail
This means that Ayurveda accepts non-vegetarian food
Looking at many references in Ayurveda, non-vegetarian food is prescribed for symptoms of specific
diseases
Ayurveda contains detailed descriptions of the meat of every animal
bird and aquatic creature found in this world
While consuming non-vegetarian food, it is said to be roasted
cooked properly
made light for digestion and along with
specific types of spices
Non-vegetarian food prepared in this manner is described in Ayurveda as being excellent for various diseases and
for eliminating some symptoms of
diseases, and it is also said that if a person does not consume non-vegetarian food
and if it is necessary to give them that particular type of meat
then the patient should be given that meat
hidden in the diet and instructed to consume it as well
That is, Ayurveda has advised that non-vegetarian food should be
consumed only in medicinal form
If we look at it this way, should a human being consume non-vegetarian food ? or should they not ? about this
I will not say more, but based on the way nature is
structured
we can reason that human beings should be herbivorous
and consuming non-vegetarian food only during the period considered appropriate by Ayurveda is beneficial
Among non-vegetarian foods, Ayurveda has described flying birds
and aquatic creatures, for example fish etc., as excellent, and it has also
described the diseases caused by consuming non-vegetarian food in excessive quantities
If aquatic creatures that live in water are consumed in excessive quantities
disorders such as diabetes, that is, diabetes, occur, as
Ayurveda has also stated
For our body and mind to remain sattvic
a vegetarian diet is the best diet, this is the firm opinion of Ayurveda and mine, therefore if we consume the diet
that is appropriate according to Ayurveda
then it is certainly easily possible to attain 100 years of healthy longevity

Comments