top of page
logo.png

Bitter Neem Health Benefits Traditional Uses and Safe Ways to Consume It

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

कडू निम्ब 

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कडू निम्ब या वनस्पती विषयी बघणार आहोत - - - - - - - - -  -   

सर्वांनाच परिचीत, नुतन वर्षाच्या प्रारंभीचे दिवशीच म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा - गुढीपाडवा - - - - या दिवशी प्रत्येक घरी कडू निंबाची पाने वापरात आणली जातात, त्या दिवशी २ ते ३ पान चाऊन खाण्याची प्रथा आहे. - - - - -   

शरीर स्वास्थ्यासाठी आपल्या पुर्वाजांनी जाणीवपुर्वक केलेली प्रथा आहे.

कित्येक लोकं –

गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, - - - -   लहान कोवळी फळे, जिरे, मिरे, सैन्धव मीठ, - - - - -   ओवा, गूळ, - - - -  हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.

"कडूपणा' हा कडुलिंबाचा विशेष गुणधर्म असला तरी या झाडाचे सर्व अवयव औषधी आहेत.

पानांची पावडर उटण्यात वापरतात. त्यामुळे त्वचारोग बरे होतात. 

कडुलिंब या झाडाचा प्रत्येक भाग कोणत्या न कोणत्या आजारावर गुणकारी आहे. कडुलिंबाच्या असाधारण औषधी गुणधर्मामुळे अनेक शारीरिक आजार नाहीसे होतात.

जुन्या कडूलिंबाच्या खोडातून जे पाणी निघतं ते त्वचा रोगांवर उपयोगी आहे. 

जुनं खोड कापलं तर त्याला चंदनाच्या वासासारखा मंद सुवास येतो.

फुलं विषारी असली तरी ती जंतुघ्न असल्यामुळे जखमांवर त्याचा लेप लावल्यास त्या लवकर बऱ्या होतात.

या वृक्षात त्याच्या परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे.

निम्ब चविला कडू-तुरट असून गुणाने थंड आहे.

पित्त आणि कफ दोषाला कमी करणारा निम्ब अधीक सेवन केल्यास वात दोष वाढवीतो.

जखम धुण्यासाठी निम्बसालीचा काढा उत्तम असतो.

जुन्या जखमेत निम्ब बीज तेल वापरावे.

कृमी दंत म्हणजे दात किडणे या प्रकारात कडुनिंब पानांच्या काढयाने गुळण्या कराव्यात.

घरातील किटक व जंतुंचा नाश करण्यासाठी निम्बपाला घरात जाळून धूर करावा.

केसात कोंडा, बारीक जखमा इ. असल्यास निम्ब तेल लावावे.

रक्तदुष्टीचे विकार जसे त्वचा विकार, चेह-यावरील मुरुम, नागीण इ. असल्यास निम्ब पान किंवा साल उपयुक्त आहे.

अतिसारात निम्बसाल काढा उपयुक्त असतो.

मलात कृमी असल्यास निम्ब पाना सोबत हिंग-वावडींग-ओवा दिल्यास फायदा होतो.

लघवी अधीक होत असल्यास तसेच घश्याला कोरड अधीक पडत असल्यास निम्ब सिद्ध जल द्यावे, निम्ब सिद्ध जल म्हणजे १० ते १५ निम्ब पान आणि २ ग्लास पाणी घेऊन त्यांना थोडे उकळायचे व गाळून ठेवावे किंवा - - - - -   

माठात पाण्यात निम्ब पान टाकून ठेवतात आणि तेच पाणी दिवसभर पितात.

अनेक प्रकारच्या विष बाधेत निम्बपानांचे काढ्याने वमन केले जाते.

सर्व प्रकारच्या तापात कडू निम्ब पानांचा किंवा सालीचा काढा उपयुक्त आहे.

कावीळ मध्ये कुटकी, गुळवेल आणि अविपत्तिकर सोबत निम्ब पान रस दिल्यास लवकर फायदा होतो.

खरुज रोगात निम्ब बीयांचा वाटून लेप केला जातो.

अंगात मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा महत्वाच गुणधर्म कडूनिंबात आहे.

उन्हाळ्यात गोवर, कांजिण्या इ. रोग उद्भवतात, अश्या वेळी रोग्याला कडूनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवतात, त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.

पूर्वी स्त्रियांना प्रसूती नंतर तीन दिवस जेवणाच्या आधी कडूनिंबाच्या पानांचा रस देत असत. त्यामुळे बाळंतरोग होण्याची भीती नसे आणि मातेला दूध हि जास्त येत असे.

निम्ब वैदयकिय सल्ल्या खेरीज वापरु नये कारण अति प्रमाणात सेवन हे वंधत्व निर्माण करु शकते तसेच वात दोष शरीरात वाढु शकतो.      

 

Bitter Neem Health Benefits Traditional Uses and Safe Ways to Consume It

Bitter neem, or kadu nimb, is one of those plants that sits at the crossroads of tradition and home care. Its sharp taste may not be pleasant, but in Indian households, especially in Maharashtra, it has long been valued for cleansing, cooling, and protective qualities.

This post is for general information only. Neem can affect the body strongly, so use it with care and speak to a doctor if you have a medical condition.

Why bitter neem matters in tradition

On Gudi Padwa, many families eat a small mix of neem leaves with jaggery, tamarind, or spices. The meaning is simple and beautiful, life brings both bitter and sweet experiences.

Traditionally, neem is also seen as a seasonal cleanser. Around the start of the new year, when heat begins to rise, small amounts of tender neem are used to support digestion and general wellbeing.

Medicinal uses of neem leaves, flowers, and bark

Neem leaves are the most commonly used part. They are often made into a paste for itchy skin, minor rashes, and acne-prone skin. Neem water is also used for bathing when the skin feels irritated.

Neem flowers are milder than the leaves. In some homes, dried flowers are added to food in tiny amounts to support appetite and digestion.

Neem bark, or the stem bark, has a strong astringent quality. Traditionally, it is used in decoctions for oral hygiene and minor gum discomfort. It should not be overused.

Skin, wounds, and body concerns

Neem is known for its antimicrobial and anti-inflammatory properties. For small cuts, insect bites, dandruff, or mild fungal-looking patches, a diluted neem wash may help keep the area clean.

Do not apply neem paste on deep wounds, burns, or infected skin without medical advice. If swelling, pus, fever, or spreading redness appears, get proper treatment.

Safe ways to consume bitter neem

For adults, a safe traditional amount is usually small, such as 1 to 3 tender leaves occasionally, not large daily doses. Neem juice, capsules, and concentrated extracts can be much stronger.

Avoid neem consumption during pregnancy, while breastfeeding, for small children, and if you have liver, kidney, or autoimmune conditions unless a doctor approves it. Neem oil should not be swallowed.

Practical tips for using neem

Wash leaves well before use.

Start with a very small amount.

Use fresh paste only on a small skin patch first.

Do not mix neem with multiple herbal remedies at once.

Stop use if nausea, dizziness, rash, or stomach upset occurs.

FAQ

Can I eat neem leaves every day?

Daily use is not ideal for everyone. Occasional small amounts are safer than regular high intake.

Is neem good for acne?

Neem paste or neem water may help mild acne, but severe acne needs proper skin care and medical guidance.

Can neem cure infections?

Neem may support cleanliness, but it is not a replacement for antibiotics or medical treatment.

Is neem safe for children?

Oral neem use is not recommended for young children. Ask a paediatrician first.

Neem is powerful because it is bitter, active, and concentrated in nature. Respect the plant, use it in small amounts, and treat it as a supportive remedy, not a cure-all.

 

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जात

 
 
 

Comments


bottom of page