top of page
logo.png

Ashoka Tree in Ayurveda Benefits Uses and Ramayana History

Writer: Satish Shindadkar
Satish Shindadkar
Aug 10
4 min read

Updated: Sep 12


अशोक वृक्ष

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - -  आयुर्वेदात वर्णन केलेल्या अशोक या वृक्षाच्या बद्दलची माहिती घेणार आहोत

आपण ज्या वनस्पतीला अशोक या नावाने ओळखतो ती

खऱ्या अर्थाने अशोक नसून आयुर्वेदात त्या वनस्पतीला काष्ट दारू किंवा अशोक भेद असे नाव आहे

आज आपण आयुर्वेदात वर्णन केलेल्या अशोकाच्या बद्दलचे वर्णन बघणार आहोत

खऱ्या अशोकाचे झाड आंब्याप्रमाणे दिसणारे असते

साधारणता आठ ते दहा मीटर उंचीचे - -  सरळ दाट आणि नेहमी हिरवे असणारे हे वृक्ष रामायणातील कथेनुसार ह्याच वृक्षाखाली रावणाने सीतादेवीला ठेवले होते

या वृक्षाची साल किंचित लाल भुरकट रंगाची असते

आंब्याच्या पानांप्रमाणे याची पाने असून कोवळी पालवी तांबड्या रंगाची असते

याला फुले वसंत ऋतू देतात तर फळांच्या शेंगा शरद ऋतूमध्ये येतात

या शेंगांमध्ये चार ते आठ बिया असतात

अशोकाचे - -   साल / / बीज आणि पुष्प अनेक व्याधींमध्ये उपचारासाठी उपयुक्त ठरत असतात

हे वृक्ष अत्यंत मनमोहक असल्याने घराच्या अंगणात आणि रस्त्याच्या कडेने लावल्यास शोभेत भर पडते

या वनस्पतीचा घरगुती औषधोपचारात कसा वापर करता येईल ते आपण बघू या - -

अशोकाची ताजी साल आणून तिचा रस काढावा आणि हा रस त्वचेवर लावल्यास त्वचा सुंदर आणि सतेज बनते

वातरक्त म्हणजेच गाऊट नावाच्या व्याधीत दोन ग्रॅम अशोक सालीचे चूर्ण + चार कप पाणी हे गॅसवर मंद आचेवर उकळावे = = = =  अंदाजे एक कप शिल्लक राहिल्यावर कोमट झाल्यानंतर गाळून घ्यावे - - - - त्यात १० ml एरंड तेल टाकून रोज सकाळ संध्याकाळ घेतल्यास रक्तातील यूरिक ॲसिड चे प्रमाण कमी होते

रक्त जाणाऱ्या मुळव्याध या आजारामध्ये अशोक सालीचा काढा २० ते ४० ml मात्रेत सकाळ संध्याकाळ घेतल्यास रक्त थांबते

संडास मधून रक्त जात असल्यास अशोकाच्या सालीचा काढा १० ml मात्रेत दिवसातून पाच ते दहा वेळा रोगाच्या गंभीरतेनुसार घ्यावा किंवा अशोकाची चार-चार फुले वाटून दिवसातून तीन ते चार वेळेला सेवन करावी याने तात्काळ फरक पडतो

नाकातून रक्त येत असल्यास अशोकाच्या फुलांचा दोन दोन थेंब रस नाकात टाकल्यास रक्त येणे बंद होते

याच अशोक वृक्षापासून बनविलेले अशोकारिष्ट नावाचे गर्भाशयाची क्रिया नियमित करणारे औषध बाजारात उपलब्ध असते

या औषधामुळे मासिक पाळी नियमित येते यासोबत

अश्वगंधारिष्ट सेवन केल्यास ते गर्भाशयाला बल देणारे ठरते

रोज सकाळ संध्याकाळ जेवणानंतर पाच ते दहा ml समभाग पाण्यासोबत वैद्यकीय सल्ल्याने घेतल्यास महिलांसाठी रामबाण औषधी आहे

अशा प्रकारे खऱ्या अशोकाचे गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी आपण प्राप्त करू शकतो

 

 

Ashoka Tree in Ayurveda Benefits Uses and Ramayana History

The Ashoka tree is more than an ornamental tree with bright flowers. In Ayurveda, Ashoka, also called Kastadaru or Ashoka Bhed, is valued for its cooling, astringent, and balancing qualities, especially in conditions linked with inflammation and menstrual discomfort.

What the Ashoka tree looks like

Ashoka is an evergreen tree, commonly identified as Saraca asoca. It usually grows around 6 to 9 metres tall, though mature trees may grow higher in favourable conditions.

Its leaves are long, narrow, and glossy, with a slightly drooping appearance. New leaves often appear coppery or reddish before turning deep green. The flowers grow in dense clusters and change from yellow-orange to red as they mature. In many parts of India, flowering is seen from late winter to spring, roughly February to April.

Ashoka in the Ramayana

The Ashoka tree also has a strong cultural memory. In the Ramayana, Sita is kept in the Ashoka Vatika in Lanka. The word “Ashoka” is often interpreted as “that which removes sorrow”, which gives the tree both emotional and spiritual meaning in Indian tradition.

This link between relief, resilience, and feminine strength also appears in its Ayurvedic use.

Ayurvedic uses of bark, seeds, and flowers

Ashoka bark is the most used part. It is traditionally prepared as a decoction for menstrual regulation, heavy bleeding, and cramps.

Simple bark decoction

Boil 1 teaspoon dried Ashoka bark in 2 cups water until it reduces to 1 cup. Strain and drink warm. Use only with guidance if pregnant, trying to conceive, or taking medicines.

Ashoka flowers are used in gentle skin care. A mild flower infusion may help soothe irritated skin.

Flower skin rinse

Soak a small handful of clean dried flowers in hot water for 15 minutes. Cool, strain, and use as a face rinse.

Ashoka seeds are used traditionally for pain and swelling, including gout-like discomfort.

Seed paste for local application

Grind clean dried seeds with a little water into a paste. Apply externally on swollen joints for a short time, then wash off.

Key benefits in Ayurveda

Ashoka is best known for:

Menstrual regulation - Supports cycle balance and comfort in traditional formulations.

Skin health - Flower infusions are used for redness, heat, and minor irritation.

Gout and swelling - Seed paste is used externally for inflamed joints.

This article is for general information only. For persistent menstrual issues, gout, skin disease, pregnancy, or ongoing medication, consult a qualified Ayurvedic doctor or physician.

FAQ

Is Ashoka safe for daily use?

Not for everyone. Daily use should be guided by a practitioner, especially for hormonal, pregnancy, or bleeding-related concerns.

Which part of Ashoka is most medicinal?

The bark is the most widely used part in Ayurveda, especially for menstrual health.

Can Ashoka cure gout?

No. It is traditionally used to support swelling and pain, but gout needs proper diagnosis and treatment.

Can Ashoka be used on the skin?

Yes, mild flower infusions are used externally, but patch test first.

The Ashoka tree carries medicine, mythology, and meaning in one graceful form. Used wisely, it remains one of Ayurveda’s most respected trees.

 

Recent Posts

See All
Nagaveli Leaves Benefits for Oral Health Digestion and Ayurveda Tips

विड्याचे / नागवेलीचे पानं आरोग्यवर्धक नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मुखशुद्धीसाठी वापरली जाणारी नागवेलीची पानं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये मुख शुद्धीसाठी / / / पचनासाठी भोजनानं

 
 
 
Shatavari in Pregnancy Benefits Nutrition and Gestational Diabetes Guide

प्रेग्नेंसीत शतावरी किती महत्त्वाचीनमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण प्रेग्नेंसीत शतावरी / शतावरी कल्प किती महत्त्वाचा आहे या विषयी बघणारा आहोत जवळपास प्रत्येकालाच माहीत आहे की प्रेग्नेंसी

 
 
 
Nirgundi Oil Benefits Uses for Vata Relief Pain Relief and Hair Care

निर्गुंडी तेल आणि त्याचे फायदे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण निर्गुंडी च्या तेलाचे काय काय फायदे असतात या विषयी बघणार आहोतनिर्गुंडीची झाडी अनेक व्यक्तींच्या घराच्या कुंपणासाठी लावली जात

 
 
 

Comments


bottom of page