top of page
logo.png

How can dandruff on the scalp be prevented

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 11
  • 5 min read

डोक्यात कोंडा होणे कसं टाळता येईल

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - - - डोक्यातील कोंडा ही एक मोठी समस्या बनत चाललेली आहे - - - - -   जगामध्ये साधारणतः ५०% व्यक्ती थोड्या अधिक प्रमाणात - - - - --  या समस्येला तोंड देत आहेत - - - - - -  त्या विषयी बघणार आहोत

पुरुष असो अथवा स्त्री - - -  डोक्यातील कोंडा ही एक सामान्य वैद्यकीय स्थिती आहे

जी जवळपास सर्व लोकांना    

त्यांच्या आयुष्यात

कधीतरी अनुभवावी लागते

अगदी लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत ही स्थिती येत असते

प्रामुख्याने हिवाळ्यातील अत्यंत कडक थंडी म्हणजेच

कोरडे वातावरण

केस स्वच्छ न करणे

सोरायसिस नावाचा आजार

बॅक्टेरियल इन्फेक्शन

फंगल इन्फेक्शन

काही हार्मोनल घटक हे त्याला कारण भूत असू शकतात

वायु प्रदूषण प्रामुख्याने - - -  पेट्रोल / / / डिझेलचे धूर हे देखील

याचं प्रमाण वाढवू शकतात

त्वचेचा वरचा थर मृतपेशींनी बनलेला असतो आणि

त्याखाली असलेल्या नाजूक पेशींचं ते संरक्षण करत असतात परंतु

तो थर अधिक प्रमाणात तयार होणे म्हणजेच

कोंडा तयार होणार

हा डोक्यावरील कोंडा

कपाळावर भुवयांवर

नाकाच्या बाजूने

मानेच्या मागे

अधिक प्रमाणात पडतो आणि सौंदर्याला बाधा निर्माण होत असते 

यात डोक्याला खाज हे एक लक्षण असल्यामुळे

कित्येक व्यक्ती चारचौघात जाणे टाळतात 

मुरूम किंवा तेलकट त्वचा असणाऱ्यांना कोंडा होण्याची समस्या अधिक प्रमाणात असते

डोक्यात कोंडा होऊ नये म्हणून

काय करता येईल ते पाहू या - - -  

आणि याच उपायांनी कोंडा झालेला असेल तर तो नष्ट देखील होतो

आठवड्यातून १ वेळा २ वेळा किंवा ३ वेळा डोकं स्वच्छ धुणे गरजेचे आहे

आता या ठिकाणी १ वेळा २ वेळा किंवा ३ वेळा असं म्हटलं आहे कारण

असं आहे की जर आपण

आपल्या डोक्याला आच्छादन करत असाल तर

आठवड्यातून एकदा डोकं धुणं सामान्य आहे म्हणजे

बाहेर जातांना डोक्यावर टोपी घालत असाल किंवा

बंदिस्त वाहनातूनच प्रवास करीत असाल आणि

आपल्याला विशेष घाम येत नसेल तर

आठवड्यातून एकदा डोकं धुणे गरजेचे आहे

जे व्यक्ती दुचाकीवरून भरपूर प्रवास करतात

धूर / / /  धूळ यांच्या संपर्कात असतात तसेच

ज्यांना भरपूर घाम येत असतो अशा व्यक्तींनी

आठवड्यातून २ किंवा ३ वेळेला केस धुणं हे अत्यंत गरजेचे आहे

डोके धुण्यासाठी खूप महागड्या शाम्पूंचा वापर करणे गरजेचे नसून

आपण कशा पद्धतीने डोक्याची निगा राहतो हे महत्त्वपूर्ण आहे

डोके धुण्यासाठी आयुर्वेदामध्ये - - - -

शिकेकाई / / रिठा / / संत्रा साल / / लिंबू साल / / आवळा इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो

कित्येक व्यक्ती लिंबू रसाचा वापर केस धुण्यासाठी करतात - - - -

त्यापेक्षाही लिंबूच्या सालीचा आणि संत्र्याच्या सालीचा वापर उत्तम किंवा श्रेष्ठ ठरतो

केस धुण्यासाठी - - -   

लिंबू ची साल / / / संत्र्याची साल / / / शिकेकाई / / /  रिठा / / /  आवळा यांना समभाग प्रमाणात घेऊन काढा करावा आणि

तो काढा आंघोळीच्या वेळी १० ते २० सेकंदात थोडा थोडा डोक्यावर टाकून डोके आणि केस भिजवावे

असे ७ ते ८ मिनिटे डोके आणि केस भिजवल्यानंतर

पाणी टाकून स्वच्छ डोके धुवावे

अशा पद्धतीने या काढ्याचा वापर केल्यास

निश्चितच बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन असेल तरी देखील

ते कमी होण्यास मदत होते

काही व्यक्ती

दही / / /  कडुनिंबाची पानं / / / कोरफड यांचा देखील वापर केस धुण्यासाठी करतात आणि ते देखील योग्य आहे

डोके आणि केस योग्य पद्धतीने धुतल्यानंतर ते

कोरडे करणं अत्यंत आवश्यक आहे जर

त्यात दमटपणा राहिला तर डोक्यात कोंडा होणे आणि

इतर त्वचा संदर्भातील समस्या होऊ शकतात

ज्या व्यक्तींना

डोक्यात कोंडा नाही

अशांनी वेळोवेळी आयुर्वेदात सांगितलेल्या

शिरो अभ्यंग म्हणजे डोक्याची मसाज चा वापर

वैद्यकीय सल्ल्याने वेळोवेळी करून घ्यावा म्हणजे

पुढे डोक्यात कोंडा होण्याची समस्या निर्माण होणार नाही

जे व्यक्ती नेहमी धूर / / / धूळ यांच्या संपर्कात असतात त्यांनी

डोक्यावर आवरण ठेवणे म्हणजेच टोपी व तत्सम वस्त्र आच्छादन करणे गरजेचे आहे म्हणजे केसांच्या कोणत्याही समस्या दूर राहण्यास मदत होईल

अशा प्रकारे आपण डोक्याची आणि केसांची काळजी घेतली तर

कोंडा होणंच शक्य नाही

 

 

How can dandruff on the scalp be prevented

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to look at - - - - - - dandruff on the scalp is becoming a major problem - - - - -   approximately 50% of people in the world, to a greater or lesser extent - - - - --  are facing this problem - - - - - -  we are going to look at it

Whether male or female - - -  dandruff on the scalp is a common medical condition

which almost all people    

have to experience    

at some point in their lives

This condition can occur from very young children to the elderly

Primarily, the extremely harsh cold of winter, that is

a dry environment

not cleaning the hair

a disease called psoriasis

bacterial infection

fungal infection

some hormonal factors may be responsible for it

air pollution, mainly - - -  petrol / / / diesel fumes, can also

increase its severity

The upper layer of the skin is made up of dead cells and

they protect the delicate cells underneath, but

when that layer is produced in excessive amounts, that means

dandruff will form

This dandruff on the scalp

falls more on the forehead, eyebrows

along the sides of the nose

behind the neck

in greater amounts and affects one's appearance

Since itching of the scalp is one of the symptoms in this

many people avoid going out in public 

People with acne or oily skin have a greater tendency to develop dandruff

To prevent dandruff on the scalp

let us see what can be done - - -  

and these same measures can also eliminate dandruff if it has already developed

It is necessary to wash the scalp 1 time, 2 times, or 3 times a week

Now, 1 time, 2 times, or 3 times has been mentioned here because

the thing is that if we

cover our head

washing the head once a week is normal, meaning

if you wear a hat on your head when going outside or

if you travel only in an enclosed vehicle and

you do not sweat particularly much, then

washing the head once a week is necessary

People who travel extensively on two-wheelers

are exposed to smoke / / /  dust and also

people who sweat a lot

must wash their hair 2 or 3 times a week

It is not necessary to use very expensive shampoos to wash the head

how we take care of the scalp is important

For washing the head, in Ayurveda - - - -

shikakai / / reetha / / orange peel / / lemon peel / / amla, etc., many things are used

Many people use lemon juice to wash their hair - - - -

even better or superior than that is the use of lemon peel and orange peel

For washing the hair - - -   

lemon peel / / / orange peel / / / shikakai / / /  reetha / / /  amla should be taken in equal proportions to prepare a decoction and

during bathing, a little of this decoction should be poured over the head every 10 to 20 seconds to wet the head and hair

after keeping the head and hair wet in this way for 7 to 8 minutes

pour water over it and wash the head clean

If this decoction is used in this manner

even if there is definitely a bacterial or fungal infection

it helps to reduce it

Some people

also use curd / / /  neem leaves / / / aloe vera to wash their hair and that is also appropriate

After washing the head and hair properly, it is

extremely important to dry them. If

moisture remains in them, dandruff on the scalp and

other skin-related problems can occur

Those people who

do not have dandruff

should from time to time, as advised in Ayurveda,

use shiro abhyanga, meaning scalp massage,

from time to time under medical advice, meaning

the problem of developing dandruff on the scalp in the future will not arise

People who are always exposed to smoke / / / dust should

keep their head covered, that is, wear a hat or similar covering garment, so that

it will help keep away any hair-related problems

In this way, if we take care of the scalp and hair

it is not possible for dandruff to occur

Recent Posts

See All
A problem of dry hair

केसांची रुक्षता एक समस्या नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर - - - - - - आज आपण केस रूक्ष का होतात - - - - - - रूक्ष झाल्यास काय करावे - - - - - - - - काय पथ्य पाळावेत - - - - - - या विषयी बघणार आहो

 
 
 
How Often Should You Wash Your Hair Weekly for Healthy Hair

आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - महिला असो वा पुरुष यांनी आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत - - - याविषयी बघणार आहोत केसांची सौंदर्य असणे म्हणजेच आप

 
 
 
How to Prevent Premature Graying with Diet Hair Care and Healthy Habits

केस पांढरे होऊ नये म्हणून - - नमस्कार मी डॉ सतीश वसंत शिंदाडकर- - - आज आपण केस लवकर पांढरे होऊ नयेत - - - यासाठी काय काय करता येईल हे बघणार आहोत - - - निसर्ग नियमानुसार वयाच्या पस्तीस नंतर

 
 
 

Comments


bottom of page