A problem of dry hair
- Satish Shindadkar
- Aug 10
- 7 min read
केसांची रुक्षता एक समस्या
नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर - - - - - - आज आपण केस रूक्ष का होतात - - - - - - रूक्ष झाल्यास काय करावे - - - - - - - - काय पथ्य पाळावेत - - - - - - या विषयी बघणार आहोत - - - - -
मनुष्याच्या डोक्यावरील केस हे कोणत्याही दागिन्यांपेक्षा कमी नाहीत - - - - प्रकृतीने दिलेलं ते एक आभूषण आहे - - - - - -
महिला असो वा पुरुष प्रत्येकालाच आपल्या डोक्यावर सुंदर - - - मुलायम - --
काळे क्षार - - - - केस असावेत असे वाटते
कित्येक व्यक्तींचे रुक्ष असणारे परंतु
दाट असलेले केस देखील सुंदरता प्रदान करीत असतात
रुक्ष असलेले परंतु दाट असलेले केस - - - - काही काळानंतर रुक्षतेमुळे गळतात
आणि लवकरच सुंदरता नष्ट होत असते त्यामुळे
केसांना रुक्षता आल्यास तात्काळ चिकित्सा करावी किंवा
रुक्षता येऊच नये म्हणून प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत
सध्याचे राहणीमान
दिनचर्या
प्रदूषण
आहार = = = आहारातील बदल = = = सवयी इत्यादी कारणांनी
मनुष्याचे केस रुक्ष व्हायला सुरुवात झालेली आहे
आयुर्वेदाचा विचार केल्यास प्रामुख्याने केसांमध्ये
जी रुक्षता येते ती वात दोष वाढल्याने येत असते
जेव्हा शरीरामध्ये वातदोष वाढतो आणि
असा वाढलेला वातदोष केसांचे पोषण होऊ देत नाही तेव्हा
केस रुक्ष बनतात तसेच
जे व्यक्ती योग्य प्रकारे आहाराचे सेवन करत नाही किंवा
केसांच्या पोषणासाठी आवश्यक असणारे तत्व आहारा मार्फत न मिळाल्यास
शरीरात वातदोष अधिक वाढतो आणि
हा वात केसांमध्ये रुक्षता उत्पन्न करत असतो
आजच्या जीवनशैलीमध्ये अनेक व्यक्तींकडून केसांसाठी
हेअर ड्रायरचा वापर अधिक प्रमाणात केला जात आहे आणि
यामुळे केस तुटणे / / / रुक्ष बनणे घडत आहे
कित्येक व्यक्ती
केसांचा रंग बदलण्यासाठी
विविध रसायनांचा वापर करत आहेत
केस - - - हिरवे / / / सोनेरी / / / चंदेरी असे वेगवेगळ्या रंगाचे बनवत असतांना विविध रसायनांचा वापर केला जात आहे आणि
या रसायनांमुळे देखील केस रुक्ष होत आहेत
कित्येक व्यक्ती रोज केसांना फेसाळ शाम्पू द्वारे स्वच्छ करत आहेत आणि
अशा शाम्पू मध्ये अनेक रसायनं आणि सोडा असतो
ज्यामुळे डोक्यावरील त्वचा आणि केस हे रुक्ष बनत आहेत
कित्येक व्यक्ती तीन तीन आठवडे केस धुत नाहीत
केस स्वच्छ करीत नाही त्यांचे देखील
केस रुक्ष होण्याची संभावना असते म्हणून
आठवड्यातून एक वेळेला केस स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे
जे व्यक्ती उष्णतेच्या संपर्कात असतात त्यांचे
केस देखील रुक्ष बनतात म्हणून
उन्हातून जात असतांना डोक्यावर आच्छादन असणं अत्यंत गरजेचं आहे
काही प्रकारच्या औषधी देखील
केसांना रुक्ष आणि पातळ बनवतात त्यात प्रामुख्याने
अँटिबायोटिक्सचा अतिवापर
अँटी फंगल औषधींचा अधिक वापर
केमोथेरपीत वापरली जाणारी औषधी तसेच
वैद्यकीय सल्ल्याखेरीज वेदनाशामक आणि अन्य औषधी सेवन हे देखील महत्त्वपूर्ण कारण ठरतात
कित्येक व्यक्ती स्नानासाठी अत्यंत गरम पाण्याचा उपयोग करतात तसेच
केस धुण्यासाठी देखील अत्यंत गरम पाणी वापरल्यास केस रुक्ष होऊ शकतात
क्लोरीन युक्त पाणी तसेच अधिक क्षार असणारे पाणी देखील
डोक्यावरील त्वचा आणि केस दोघांमध्ये रुक्षता आणत असतात
Hypothyroidism या आजारात देखील केस हे रुक्ष होत असतात
आता आपण
केसांना रुक्षता येऊ नये म्हणून
आपली जीवनशैली कशी असावी या विषयी बघू या - - - - -
आठवड्यातून १ वेळा आणि किंवा २ वेळेला केस स्वच्छ करणे गरजेचे आहे
केसांसाठी शिकेकाई / / रिठा / / आवळा / / संत्रा साल इत्यादी अनेक वनस्पती पासून बनवलेले शाम्पू बाजारामध्ये उपलब्ध आहेत
त्यांचा वापर करावा शक्यतो
ह्या औषधींच्या चूर्णांना घरी तयार करून
काढा स्वरूपात केसांना धुण्यासाठी वापर केल्यास
तो उत्तम इलाज समजला जातो परंतु असे शक्य नसल्यास
बाजारात मिळणारे हर्बल शाम्पूंचा वापर करण्यास हरकत नाही परंतु
हा वापर आठवड्यातून दोन पेक्षा अधिक वेळा नसावा
ज्या व्यक्तींची डोक्याची त्वचा नेहमी तेलगट असते अशांनी
डोक्याच्या त्वचेवर तेल लावण्यापेक्षा केवळ केसांना तेल लावल्यास केस रुक्ष होण्यापासून वाचतात परंतु
ज्या व्यक्तींची डोक्यावरील त्वचा थोडी रुक्ष असते अशांनी
डोक्यावरील त्वचेवर रात्री झोपताना - - - पूर्ण डोक्यासाठी - - - ४ ते ८ थेंब तेल जिरवणे आवश्यक आहे
केमिकल्स असणारे शाम्पू तसेच केसांना कलरिंग करणे टाळावे
ओल्या केसांमध्ये तेल लावू नये तसेच
केस ओले असताना विंचरु नयेत
हेअर ड्रायर चा उपयोग २ ते ३ महिन्यातून एकदा करायला हरकत नाही परंतु
नेहमी नेहमी चा वापर निश्चितच केसांना रुक्षता आणतो
केसांना रुक्षता आली असल्यास
नारळाचे दूध उत्तम उपाय आहे
कोरफड चा गर देखील केसांची रुक्षता कमी करून केसांना चमक आणण्यात प्रधान आहे
दही / / मध / / केळीची पेस्ट हे देखील केसांची रुक्षता कमी करून चमक आणण्यासाठी उपयुक्त असतात
आहाराच्या बाबतीत विचार केल्यास
आहाराच्या योग्य वेळा - - -- - योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन - - -- योग्य प्रमाणामध्ये मीठ / / / साखर / // तिखट यांचे सेवन केसांना रुक्षता येऊ देत नाही परंतु अधिक प्रमाणात यांचा सेवन झाल्यास निश्चितच केस रुक्ष होतात
आहारामध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्व असणे, मनुका, अक्रोड, ब्रोकोली,
टमाटे, गाजर असावेत यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते
प्रदूषण असणाऱ्या वातावरणात तसेच उन्हात जात असताना डोक्याला आच्छादन करणं अत्यंत गरजेचं आहे
अशा प्रकारे आपण योग्य आहार आणि विहार ठेवल्यास आपले केस रुक्षते पासून दूर राहतील
A problem of dry hair
Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar - - - - - - today we are going to see why hair becomes dry - - - - - - what to do if it becomes dry - - - - - - - - what precautions should be followed - - - - - - regarding this we will see - - - - -
The hair on a person's head is no less than any ornament - - - - it is an adornment given by nature - - - - - -
Whether a woman or a man, everyone wants beautiful - - - soft - --
black shiny - - - - hair on their head
The dry but
thick hair of many people also provides beauty
Dry but thick hair - - - - after some time falls due to dryness
and soon the beauty is lost, therefore
if the hair becomes dry, treatment should be taken immediately or
everyone should try to prevent dryness from occurring in the first place
The current lifestyle
daily routine
pollution
diet = = = changes in diet = = = habits, etc., are the reasons why
people's hair has started becoming dry
From the Ayurvedic perspective, primarily the dryness that
occurs in the hair is caused by an increase in the Vata dosha
When the Vata dosha increases in the body and
when this increased Vata dosha does not allow the hair to receive nourishment,
the hair becomes dry, as well as
when a person does not consume food properly or
does not receive the nutrients necessary for nourishing the hair through the diet,
the Vata dosha increases further in the body and
this Vata causes dryness in the hair
In today's lifestyle, many people use
hair dryers excessively for their hair and
this causes hair breakage / / / and dryness
Many people
to change the color of their hair
use various chemicals
while making the hair - - - green / / / golden / / / silver in different colors, various chemicals are being used and
these chemicals also make the hair dry
Many people clean their hair every day with foaming shampoo and
such shampoos contain many chemicals and soda
which make the scalp and hair dry
Many people do not wash their hair for three weeks at a time
and do not clean their hair; they too
have a possibility of developing dry hair, therefore
it is extremely necessary to clean the hair once a week
People who are exposed to heat also have
dry hair, therefore
when going out in the sun, it is extremely necessary to cover the head
Some types of medicines also
make the hair dry and thin, among them primarily
excessive use of antibiotics
excessive use of antifungal medicines
medicines used in chemotherapy, as well as
taking painkillers and other medicines without medical advice are also important causes
Many people use extremely hot water for bathing, as well as
if extremely hot water is used to wash the hair, the hair can become dry
Chlorinated water as well as water containing more salts also
cause dryness in both the scalp and hair
Hair also becomes dry in the disease Hypothyroidism
Now let us
see what our lifestyle should be like
so that the hair does not become dry - - - - -
It is necessary to clean the hair once or twice a week
Shampoos made from many plants such as shikakai / / reetha / / amla / / orange peel, etc. are available in the market for hair
they should be used preferably
if these medicinal powders are prepared at home
and used in decoction form to wash the hair,
it is considered an excellent treatment, but if this is not possible,
there is no objection to using herbal shampoos available in the market, but
this use should not be more than twice a week
People whose scalp is always oily
rather than applying oil to the scalp, if they apply oil only to the hair, the hair can be protected from becoming dry, but
people whose scalp is somewhat dry
should, while sleeping at night, - - - for the entire head - - - 4 to 8 drops of oil be absorbed into the scalp
Shampoos containing chemicals as well as coloring the hair should be avoided
Do not apply oil to wet hair, and
do not comb the hair while it is wet
There is no harm in using a hair dryer once every 2 to 3 months, but
frequent use definitely causes dryness in the hair
If the hair has become dry,
coconut milk is an excellent remedy
Aloe vera pulp is also excellent for reducing hair dryness and bringing shine to the hair
curd / / honey / / banana paste are also useful for reducing hair dryness and bringing shine
Regarding diet,
proper meal timings - - -- - consuming an appropriate amount of water - - -- consuming salt / / / sugar / // spicy food in the proper amount does not allow the hair to become dry, but excessive consumption of these definitely makes the hair dry
The diet should contain all types of vitamins, raisins, walnuts, broccoli,
tomatoes, carrots; this helps keep the hair healthy
It is extremely necessary to cover the head when going into a polluted environment as well as in the sun
In this way, if we maintain a proper diet and lifestyle, our hair will remain free from dryness

Comments