top of page
logo.png

Understanding Burping When It Is Normal and When to Seek Help

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 4 min read

ढेकर रोखण्याचे दुष्परिणाम

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण ढेकर ही संवेदना रोखल्यास काय होऊ शकतं आणि त्याच्यावर उपाय काय हे बघणार आहोत

सर्वप्रथम ढेकर येण्याची कारण काय असू शकतात याविषयी बघू या सामान्य आहार घेतल्यानंतर काही वेळात दोन ते तीन ढेकर येणे ही अगदी सामान्य बाब आहे मात्र सतत ढेकर येत असतील - - -  उपाशीपोटी ढेकर येत असतील - - - - त्यातून दुर्गंध येत असेल तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करू नये - - - ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा प्रामुख्याने पचनास जड पदार्थ सेवनामुळे अपचन ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्त गॅसेस पोटफुगी इत्यादी लक्षणे दिसतात आणि ह्याच लक्षणांमध्ये पोटात गॅस किंवा हवा साचून राहते आणि ही हवा ढेकरच्या रूपात थोडी थोडी बाहेर जात असते जोपर्यंत पोटातील हवा पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत ढेकर येत राहतात

सामान्यतः ढेकर तेव्हाच येतात जेव्हा पोटात जास्त प्रमाणात गेलेल्या हवेमुळे पोट पसरते किंवा विस्तारते म्हणजेच ढेकर येणे हा अन्ननलिकेमध्ये किंवा अन्ननलिकेद्वारे गेलेला हवेचा परिणाम असतो त्याच्या प्रमुख कारणांमध्ये अधिक मद्यपान करणे यामुळे पोटात गॅस वाढतो - - - - दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे खूप फास्ट जेवण करणे अनेक वेळेला कमी जाऊन किंवा काही व्यक्ती अक्षरशः वरण-भात गिळतात दातांद्वारे ते चावतच नाहीत अशावेळी सुद्धा पोटात गॅसेस बनतात जेवण करीत असताना अधिक बोलणे अधिक हसणे हे देखील ढेकर येण्याचे प्रमुख कारण आहे म्हणूनच पूर्वीच्या काळी न बोलता जेवण करा असा सल्ला देत असत जेवणामध्ये अधिक प्रमाणात थंड पेय यांचे सेवन केल्यास देखील त्याद्वारे गॅस तयार होऊन ढेकर येत असतात धूम्रपान हे देखील एक प्रमुख कारण आहे पोटामध्ये विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंचा संक्रमण झाल्यास देखील सामान्य पेक्षा अधिक प्रमाणात ध्येकर येऊ शकतात तसेच मसालेदार किंवा अधिक आम्लयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास ऍसिडिटी निर्माण होऊन ढेकर येऊ शकतात अपचन जी इ आर डी नावाचा आजार मधुमेह इत्यादी देखील महत्त्वपूर्ण कारणे आहेत

अन्य पण महत्त्वाच्या कारणांमध्ये पित्ताशयाचे आजार पित्ताशयात खडे असणे नेहमी वेदनाशामक औषधींची सेवन अकारण वैद्यकीय सल्ल्याखेरीज कॅल्शियम सप्लीमेंट्स घेत राहणं ही देखील ढेकर येण्याची कारणे आहेत

अनेक वेळ असे ढेकर चारचौघांमध्ये येत असतील तर व्यक्ती ते म्हणजेच ती संवेदना दाबण्याचा प्रयत्न करते म्हणजेच ढेकर येऊ नये अशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया असते असे केल्यास उचकी लागणे श्वास लागणे धाप लागणे तोंडाची चव जाणे हृदय कंप म्हणजेच थरथर होणे हृदय आणि छातीमध्ये जखडल्यासारखे वाटणे इत्यादी लक्षणे निर्माण होतात तसेच पोट सातत्याने भरल्यासारखे वाटणे पोटात आवाज येणे तसेच पोटात वायू धरल्यासारखे वाटणे आणि गळ्यामध्ये खरखर होणे इत्यादी लक्षणे देखील आढळतात

अशी लक्षणे दिसल्यास कोमट पाणी प्यावे तसेच पाचक औषधी घ्याव्यात नियमित व्यायाम करावा शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी योग इत्यादी गोष्टींचा अवलंब करावा तंबाखू मद्यपान इत्यादी व्यसने असतील तर ती बंद करावीत वारंवार चहा कॉफी सारखी उत्तेजक पेय घेणे टाळावे आहारानंतर लगेच झोप घेऊ नये तसेच दिवसा झोप आणि रात्री जागरण असे करू नये भोजन सावकाश तसेच वेळेवर घ्यावे आणि प्रत्येक घास चाऊन घ्यावा. 

ढेकर ही संवेदना नैसर्गिक असल्याने शक्यतो रोखू नये ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे परंतु अधिक प्रमाणात सतत ढेकर येत असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा  

 

 

 

Understanding Burping When It Is Normal and When to Seek Help

Holding back a burp may feel polite in the moment, but your body is usually trying to release trapped air. Burping, also called belching, is a normal part of digestion, especially after meals.

Most burps are harmless. The concern starts when burping becomes frequent, uncomfortable, foul-smelling, or comes with other symptoms.

Why burping happens after meals

When you eat or drink, you also swallow small amounts of air. This air collects in the stomach and moves back up through the food pipe as a burp.

Burping is common after:

Eating a large meal

Eating too quickly

Drinking fizzy drinks

Chewing gum

Talking while eating

Drinking through a straw

Spicy, oily, or very heavy foods can also make some people burp more, especially if digestion feels slow.

What happens when you suppress burps

Suppressing a burp once in a while is usually not harmful. But regularly holding it in may make you feel more bloated or uncomfortable.

Trapped gas can cause:

Pressure in the upper abdomen

A tight or full feeling

Mild chest or throat discomfort

Gurgling sounds

More burping later

If the pressure is strong, it may also worsen acidity or reflux in some people.

When burping becomes a concern

Burping needs attention when it is persistent, unusually frequent, or has a bad smell like rotten eggs. Foul-smelling burps may sometimes be linked to indigestion, infection, food intolerance, or other digestive issues.

Seek medical advice if burping comes with:

Severe stomach pain

Vomiting

Unexplained weight loss

Blood in vomit or stool

Difficulty swallowing

Ongoing acidity or heartburn

This article is for general information only and does not replace medical advice.

Simple ways to manage excessive burping

Small habits often help reduce burping.

Eat slowly and chew well

Avoid overeating

Limit carbonated drinks

Drink warm water after meals

Take digestive aids only as advised by a doctor or pharmacist

Practise gentle yoga poses that support digestion

Walk for a few minutes after meals

FAQs

Is burping after every meal normal?

Yes, mild burping after meals is usually normal, especially after a heavy meal or fizzy drink.

Can suppressing burps cause serious harm?

Occasional suppression is unlikely to cause harm, but doing it often may increase bloating, pressure, and discomfort.

Why do some burps smell bad?

Foul-smelling burps may be linked to certain foods, slow digestion, or digestive problems. If it keeps happening, speak to a healthcare professional.

The takeaway

Burping is a natural way for the body to release swallowed air. Do not worry about occasional burps, but do not ignore ongoing, painful, or foul-smelling burping. If symptoms persist, a healthcare professional can help find the cause and guide the right treatment.

 

 

Recent Posts

See All
Should rock salt be consumed?

सैंधव मीठ सेवन करावे का ? नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण मीठाच्या गुणधर्मा विषयी तसेच कोणत्या प्रकारचं मीठ आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं या विषयी बघणार आहोत आयुर्वेदामध्ये पाच प्रकारचे मी

 
 
 
Do this for your health on a holiday

सुट्टीच्या दिवशी आरोग्यसाठी हे कराच संगणकीय म्हणजे कॉम्प्युटर युगातून आपण ए आय आर्टिफिशल इंटेलिजंटच्या युगात प्रवेश केला आहे पूर्वीपेक्षा शारीरिक श्रम कमी असतील पण मानसिक श्रम वाढणार आहेत अजून काय असे

 
 
 
Puffed rice

साळीच्या लाह्यानमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण साळीच्या लाह्या याविषयी बघणार आहोतलाह्यांचे अनेक प्रकार बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी ज्वारीच्या लाह्या मक्याच्या लाह्या साळीच्या लाह्या ग

 
 
 

Comments


bottom of page