top of page
logo.png

Paralysis - - Paralysis

  • Writer: Satish Shindadkar
    Satish Shindadkar
  • Aug 2
  • 6 min read

पक्षाघात - - पॅरालिसीस

नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण - - - - - पक्षाघात म्हणजेच पॅरालिसीस या विषयी बघणार आहोत - - - - - - -

पक्षाघात //  पक्षवध //  अर्धांग वायू //  एकांग वात हे सर्व पर्यायवाची शब्द आहेत असे आपण मानू या - - - -

शरीराच्या अर्ध्या भागात निष्क्रियत्व येणे म्हणजे अर्धांगवात किंवा पक्षाघात होय - - - -शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूचे अर्धे अंग पूर्णतः निष्क्रिय होते - - - लुळे पडते आणि म्हणून त्या बाजूच्या हालचाली पूर्णतः नष्ट होतात - - - -  हे अर्धांग वायूचे प्रमुख लक्षण असते

रुक्ष म्हणजे कोरडे पदार्थ - - - सोडा असणारे पदार्थ - - - कडू // तिखट // तुरट अधिक प्रमाणात - - - नेहमी सेवन करणे - - - अति जागरण - - -  अति प्रमाणात आणि अयोग्यवेळी पंचकर्म करणे - - - अति व्यायाम जसे पोहणे चालणे इत्यादी - - - अति श्रम - अति चिंता - -  एखाद्या मोठ्या आजारानंतर येणारा थकवा आणि वातदोष वाढणे - - - शिंक // संडास // लघवी इत्यादींना रोखणे - - - - शरीरावर विशेषतः डोक्याला मार लागणे इत्यादी कारणांनी शरीरात वात दोष वाढतो - - -  तसेच निसर्गतः वर्षा ऋतू म्हणजे पावसाळा - - -  अन्नाचे पचन झाल्यानंतर पहाटे आणि सायंकाळच्या प्रथम प्रहरी स्वभावतः शरीरात वात दोष वाढलेला असतो - - - - आहार विहारातील कारण आणि शरीरात निसर्गत: स्वभाव गुणांनी वात वाढण्याच्या काळात - - -   पक्षाघाताचा आजार उद्भवण्याची शक्यता अधिक असते.

अशा प्रकारे वातदोष वाढवणाऱ्या कारणांनी प्रकुपित झालेला वातदोष - - - - शरीराच्या अर्ध्या भागात संचार करून त्या भागातील शिरा आणि स्नायू यांना शुष्क करतो - - --  सांध्यांची बंधने शिथिल होतात आणि शरीर अवयव लुळे पडतात - - - - - आपल्या शरीराचे नियंत्रण त्या भागावर न राहिल्याने - - - - - हातपाय हलविणे अशक्य होते - - - - बोलणे अस्पष्ट होते - - - - मल मूत्र यावर देखील नियंत्रण नष्ट होते

अर्धांग वायूमध्ये एका बाजूच्या हात पाय यांच्यात विकृती - - - - सोबत चेहऱ्याचा देखील अर्धा भाग विकृत होऊ शकतो - - - -  प्रत्येक रुग्णांमध्ये असे होईलच असे नाही - - - - काही रुग्णांमध्ये केवळ चेहऱ्याच्या एका बाजूला ही लक्षणे दिसतात - - - - - हात पाय या ठिकाणी निष्क्रियत्व नसते - - - तेव्हा याला अर्दित म्हणजेच फेशियल पॅरॅलिसिस असे म्हणतात

पक्षाघात हा खरे पाहता अत्यंत क्लिष्ट व्याधी असून - - - चिकाटी आणि पथ्या पथ्यद्वारे बरा होऊ शकतो - - - -  अनेक रुग्णांमध्ये काही लक्षणे कमी होतात तर काही उणीवा शरीरात कायम स्वरूपी शिल्लक राहतात

चिकित्सेचा विचार करतांना यात प्रामुख्याने मालीश क्रियेचा उल्लेख प्रथम करणे आवश्यक वाटते - - - - विविध औषधी तेलाची मालिश यामध्ये हितकर असते - - - - मालिश साठी महानारायण तेल - - - - - नागफणी तेल - - बला तेल - - - पंचगुण तेल - - एरंड तेल यांचा वापर करता येतो - - - - पंचकर्मामध्ये बस्ती ही क्रिया वात दोषास कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आणि श्रेष्ठ असते - - - बस्ती हा प्रकार वैद्यच्या मार्गदर्शनामध्येच करावा - - -  तसेच मालिश म्हणजे अभ्यंग हा प्रकार देखील तज्ञ व्यक्तीकडूनच करणे उत्तम असते - - - बस्ती आणि मालिश याद्वारे शरीरातील काही भागांचे निष्क्रियत्व कमी करता येते - - - विविध औषधांमध्ये महायोगराज गुगुळ - - - महावात विध्वंस रस - -  - एकांगवीर रस बृहतवात चिंतामणी - - - कवच बीज - - - अश्वगंधा - - - दशमुलारिष्ट - - - महारास्नादी काढा - - - - -  इत्यादींचा वापर वैद्यकीय सल्ल्याने करावा

पथ्य अपथ्य पालन हे या व्याधीत अत्यंत आवश्यक बाब आहे - - - - पचण्यास हलका आहार - - - - गाईचे दूध तूप लोणी - - - मुगडाळ - - ज्वारी बाजरी गहू - - - जुना तांदूळ इत्यादी घ्यावे

फळांमध्ये द्राक्ष - - - मनुका - अंजीर - - आवळा - - पपई - - अननस इत्यादी घ्यावे भाज्यांमध्ये मेथी - - - गिलके - दोडके - कारले - भोपळा - गंगाफळ इत्यादी द्यावेत - -  शक्यतो दही - - -  क्षारयुक्त पदार्थ - - - पचण्यास जड पदार्थ - - - तुरट पदार्थ आणि चिंता इ. वर्ज्य कराव्यात

पक्षाघात हा आजार पूर्वीच्या काळी कमी प्रमाणात आढळत होता - - - - परंतु सध्याच्या जीवनशैलीच्या दृष्टीने हा अधिक प्रमाणामध्ये आढळून येत आहे - - - - म्हणून प्रत्येक मनुष्याने शरीरात वातदोष वाढणार नाही अशी काळजी घ्यावी

 

 

Paralysis - - Paralysis

 

Hello, I am Dr. Satish Vasant Shindadkar. Today we are going to discuss - - - - - paralysis - - - - - - -

 

Paralysis // Pakshavadha // Hemiplegia // Ekanga Vata are all considered synonymous terms - - - -

 

Loss of function in one half of the body is called hemiplegia or paralysis - - - - One half of the body, either the right or the left side, becomes completely inactive - - - It becomes limp, and therefore all movements on that side are completely lost - - - - This is the main symptom of hemiplegia.

 

Dry foods - - - foods containing soda - - - excessive consumption of bitter // spicy // astringent foods - - - habitual intake - - - excessive staying awake at night - - - undergoing Panchakarma excessively or at inappropriate times - - - excessive exercise such as swimming, walking, etc. - - - excessive physical exertion - excessive worry - - fatigue following a major illness and aggravation of the Vata dosha - - suppressing sneezing // bowel movements // urination, etc. - - - injuries to the body, especially to the head, and similar causes increase the Vata dosha in the body - - - Also, naturally during the rainy season - - - after food has been digested, during early morning and the first part of the evening, the Vata dosha naturally increases in the body - - - - Due to dietary and lifestyle factors, and during the periods when Vata naturally increases because of its inherent qualities - - - the likelihood of developing paralysis is higher.

 

In this way, the aggravated Vata dosha caused by factors that increase Vata - - - - spreads to one half of the body and dries up the veins and muscles in that area - - - the ligaments of the joints become loose, and the body parts become limp - - - - - since the body loses control over that part - - - - - it becomes impossible to move the hands and legs - - - - speech becomes unclear - - - - control over bowel and bladder functions is also lost.

 

In hemiplegia, along with deformity or impairment in the hand and leg on one side - - - - half of the face may also become affected - - - - However, this does not occur in every patient - - - - In some patients, these symptoms appear only on one side of the face - - - - - there is no inactivity in the hands and legs - - - In such cases, it is called Ardita, that is, facial paralysis.

 

In reality, paralysis is a highly complex disease - - - - It can improve with perseverance and proper dietary and lifestyle discipline - - - - In many patients, some symptoms reduce, while some deficits remain permanently.

 

While considering treatment, it is important to first mention massage therapy - - - - Massage with various medicated oils is beneficial - - - - Oils such as Mahanarayana oil - - - Nagphani oil - - Bala oil - - Panchaguna oil - - Castor oil can be used - - - - Among Panchakarma therapies, Basti (medicated enema) is the most important and superior treatment for reducing Vata dosha - - - Basti should only be performed under the guidance of an Ayurvedic physician - - - Likewise, massage (Abhyanga) should also be done only by a trained expert - - - Through Basti and massage, the inactivity of certain body parts can be reduced - - - Various medicines such as Mahayogaraj Guggulu - - - Mahavat Vidhwans Ras - - Ekangveer Ras - Brihat Vata Chintamani - - - Kapikacchu seeds - - - Ashwagandha - - - Dashamularishta - - - Maharasnadi decoction - - - - - etc. should be taken only under medical supervision.

 

Following the recommended and avoiding the prohibited diet is extremely important in this disease - - - - Eat easily digestible food - - - - Cow's milk, ghee, butter - - - green gram (mung dal) - - sorghum, pearl millet, wheat - - - aged rice, etc. should be consumed.

 

Among fruits, grapes - - - raisins - - figs - - Indian gooseberry (amla) - - papaya - - pineapple, etc. should be eaten. Among vegetables, fenugreek - - - ridge gourd - - sponge gourd - - bitter gourd - - pumpkin - - Gangaphal, etc. should be consumed - - If possible, avoid curd - - - alkaline foods - - - heavy-to-digest foods - - - astringent foods, and excessive worry.

 

In the past, paralysis was seen less frequently - - - - However, with today's lifestyle, it is occurring more commonly - - - - Therefore, every person should take care to prevent an increase in the Vata dosha in the body.

Recent Posts

See All
Causes of Heart Attack

हार्ट अटॅक येण्याची कारणे नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण तरुण वयात हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढलेले आहे आणि त्याबद्दलच माझ्या अनेक वर्षाच्या आयुर्वेदाच्या माध्यमातून आलेल्या अनुभवाचे

 
 
 
Prevent Cancer Through a Positive Lifestyle

सकारात्मक जीवन शैलीद्वारे कर्करोग टाळा नमस्कार मी डॉ. सतीश वसंत शिंदाडकर आज आपण कर्करोग म्हणजे cancer कसा टाळता येईल या बद्दल बघणार आहोत - - - काही वर्षां पूर्वी कर्करोग जीव घेणारा आजार गणला जात होता.

 
 
 
Strengthen the blood vessels in the body

शरीरातील रक्तवाहिन्यांची मजबुती निर्माण करा नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण शरीरातील रक्तवाहिन्यांची कार्ये सुरळीत होण्यासाठी रक्तवाहिन्या लवचिक राहण्यासाठी त्यांच्यात कशा प्रकारे मजबुती न

 
 
 

Comments


bottom of page